१७ नोव्हेंबर दिनविशेष

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | १७ नोव्हेंबर २०१३

१७ नोव्हेंबर दिनविशेष(November 17 in History) ठळक घटना, घडामोडी, जन्म(वाढदिवस), मृत्यू(पुण्यतिथी, स्मृतीदिन) आणि जागतिक दिवस.

बाळ केशव ठाकरे - ऊर्फ बाळासाहेब ठाकरे (जानेवारी २३, इ.स. १९२६; पुणे - नोव्हेंबर १७, इ.स. २०१२;मुंबई) हे महाराष्ट्रातील शिवसेना पक्षाचे संस्थापक, राजकारणी, व्यंगचित्रकार, संपादक होते. सामना या मराठी दैनिकाचे हे संस्थापक, तसेच प्रमुख संपादक होते.

जागतिक दिवस


 • आंतरराष्ट्रीय विद्यार्थी दिन.

ठळक घटना/घडामोडी


 • १९३२ : कॉंग्रेसने बहिष्कार घातलेल्या तिसर्‍या गोलमेज परुषदेची सुरुवात.

जन्म/वाढदिवस


 • ९ : व्हेस्पासियन, रोमन सम्राट.
 • १५०२ : अताहुआल्पा, शेवटचा इंका सम्राट.
 • १७५५ : लुई अठरावा, फ्रांसचा राजा.
 • १७९० : ऑगस्ट फर्डिनांड मोबियस, जर्मन गणितज्ञ.
 • १८८३ : हॅरोल्ड बॉमगार्टनर, दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू.
 • १९०५ : ऍस्ट्रीड, बेल्जियमची राणी.
 • १९०५ : आर्थर चिप्परफील्ड, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
 • १९२३ : बर्ट सटक्लिफ, न्यू झीलँडचा क्रिकेट खेळाडू.
 • १९२५ : रॉक हडसन, अमेरिकन अभिनेता.
 • १९२८ : कॉलिन मॅकडोनाल्ड, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
 • १९३८ : रत्नाकर मतकरी, मराठी लेखक, नाटककार.
 • १९४९ : न्विन टॅन डुंग, व्हियेतनामचा पंतप्रधान.
 • १९५६ : स्टॅन्ली डिसिल्व्हा, श्रीलंकेचा क्रिकेट खेळाडू.
 • १९६० : मँडी याचाड, दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू.
 • १९८१ : मराठीमाती डॉट कॉम चे निर्माते हर्षद खंदारे.

मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन


 • ३७५ : व्हॅलेन्टिनियन पहिला, रोमन सम्राट.
 • ५९४ : तूर्सचा ग्रेगरी, इतिहासकार.
 • ६४१ : जोमेइ, जपानी सम्राट.
 • १५५८ : मेरी पहिली, इंग्लंडची राणी.
 • १५९२ : योहान तिसरा, स्वीडनचा राजा.
 • १७६८ : थॉमस पेलहाम-होल्स, युनायटेड किंग्डमचा पंतप्रधान.
 • १७९६ : कॅथेरिन दुसरी, रशियाची सम्राज्ञी.
 • १९०५ : एडोल्फ, लक्झेम्बर्गचा राजा.
 • १९२८ : लाला लजपतराय, पंजाबी, भारतीय राजकारणी व लेखक.
 • १९५७ : जॅक वोराल, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
 • २०१२ : बाळासाहेब ठाकरे, शिवसेनेचे संस्थापक, शिवसेनाप्रमुख, व्यंगचित्रकार, सामना वृत्तपत्राचे संपादक.