MarathiMati.com - Android App on Google Play Store

१४ नोव्हेंबर दिनविशेष

द्वारे | प्रकाशक संपादक मंडळ | १४ नोव्हेंबर २०१३

१४ नोव्हेंबर दिनविशेष(November 14 in History) ठळक घटना, घडामोडी, जन्म(वाढदिवस), मृत्यू(पुण्यतिथी, स्मृतीदिन) आणि जागतिक दिवस.

जवाहरलाल नेहरू - (१४ नोव्हेंबर १८८९ - २७ मे १९६४) हे भारताचे पहिले पंतप्रधान व भारतीय स्वातंत्र्य चळवळीत अग्रणी असलेले काँग्रेसचे लोकप्रिय नेते होते.

जागतिक दिवस


  • बालदिन : भारत.

ठळक घटना, घडामोडी


  • १९१८ : चेकोस्लोव्हाकिया प्रजासत्ताक झाले.
  • १९२२ : बी.बी.सी.चे रेडियो प्रसारण सुरू झाले.
  • १९४० : दुसरे महायुद्ध - इंग्लंडच्या कोव्हेंट्री शहरावर लुफ्तवाफेने तुफान बॉम्बफेक करून शहर जवळजवळ नष्ट केले.
  • १९४१ : दुसरे महायुद्ध - जर्मनीच्या पाणबुडीने युनायटेड किंग्डमची एच.एम.एस. आर्क रॉयल ही विमावाहू नौका बुडवली.
  • १९६९ : अपोलो १२चे प्रक्षेपण.
  • १९७० : सदर्न एरवेझ फ्लाइट ९३२ हे विमान हंटिंग्टन, वेस्ट व्हर्जिनिया शहराजवळ कोसळले. मार्शल युनिव्हर्सिटीच्या फुटबॉल संघासह ७५ ठार.
  • १९७१ : मरीनर ९ हे अंतराळयान मंगळाच्या कक्षेत पोचले.
  • १९७५ : रॉयल ओक, मिशिगन शहरात कामावरून काढून टाकलेल्या पोस्टमनने चार व्यक्तींना ठार केले व पाच इतरांना जखमी करून आत्महत्या केली.
  • २००१ : उत्तरेतील सैन्याने काबूल जिंकले.
  • २००२ : आर्जेन्टिनाने जागतिक बँकेचे ८०.५ कोटी अमेरिकन डॉलरचे देणे परत करण्यास असमर्थता दर्शवली.
  • २०१३ : सचिन तेंडुलकर याची क्रिकेट निवृत्ती.

जन्म, वाढदिवस


  • १६५० : विल्यम दुसरा, इंग्लंडचा राजा.
  • १८४० : क्लोद मोने, फ्रेंच चित्रकार.
  • १८४३ : ऍलन हिल, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
  • १८८९ : जवाहरलाल नेहरू, प्रथम भारतीय पंतप्रधान
  • १८९१ : बिरबल साहनी, पुरावनस्पती शास्त्रज्ञ.
  • १९०४ : हॅरोल्ड लारवूड, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
  • १९०८ : जोसेफ मॅककार्थी, अमेरिकन साम्यवाद-द्वेष्टा.
  • १९२२ : बुट्रोस बुट्रोस-घाली, संयुक्त राष्ट्रांचा सरचिटणीस.
  • १९२४ : रोहिणी भाटे, मराठी कथकनर्तिका.
  • १९३० : ऍलन मॉस, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
  • १९३५ : हुसेन, जॉर्डनचा राजा.
  • १९४२ : इंदिरा गोस्वामी, आसामी साहित्यिक, कवयित्री, संपादिका.
  • १९४२ : जॅकी दु प्रीझ, दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू.
  • १९४७ : सिंधुताई सपकाळ, सामाजिक कार्यकर्त्या.
  • १९४८ : चार्ल्स, वेल्सचा राजकुमार.
  • १९५३ : दॉमिनक दि व्हियेपाँ, फ्रांसचा पंतप्रधान.
  • १९५४ : यानी, ग्रीक संगीतकार.
  • १९७१ : ऍडम गिलक्रिस्ट, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
  • १९७४ : ह्रषिकेश कानिटकर, भारतीय क्रिकेट खेळाडू.
  • १९७६ : हेमांग बदाणी, भारतीय क्रिकेट खेळाडू.
  • १९७७ : ब्रिजल पटेल, केन्याचा क्रिकेट खेळाडू.

मृत्यू, पुण्यतिथी, स्मृतीदिन


  • ५६५ : जस्टिनियन, बायझेन्टाईन सम्राट.
  • १८६६ : मिगेल, पोर्तुगालचा राजा.
  • १९०८ : गुआंग्क्सु, चीनी सम्राट.
  • १९१४ : वेंगायिल कुन्हीरामन नयनार, मल्याळम लेखक, पत्रकार.
  • १९१५ : बूकर टी. वॉशिंग्टन, अमेरिकन संशोधक, शिक्षणतज्ञ, लेखक.
  • १९७७ : ए.सी. भक्तिवेदांत स्वामी प्रभुपाद, भारतीय तत्त्वज्ञानी.
  • १९७७ : नारायण हरी आपटे, मराठी लेखक, मराठी चित्रपटांचे पटकथाकार.
MarathiMati.com - Android App on Google Play Store