१२ नोव्हेंबर दिनविशेष

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | १२ नोव्हेंबर २०१३

१२ नोव्हेंबर दिनविशेष(November 12 in History) ठळक घटना, घडामोडी, जन्म(वाढदिवस), मृत्यू(पुण्यतिथी, स्मृतीदिन) आणि जागतिक दिवस.

डॉ सलिम अली - ( सलिम मोईझुद्दीन अली- जन्म १२ नोव्हेंबर १८९६- म्रुत्यु- २७ जुलै १९८७) भारतातील आद्य पक्षिशास्त्रज्ञ होते तसेच भारताचे आद्य पर्यावरणवादी होते. भारतातील पक्षी निरिक्षक सलिम अली यांना आद्य गुरु मानतात.

जागतिक दिवस


 • -

ठळक घटना/घडामोडी


 • १९५२ : ‘युनेस्को’च्या अध्यक्षपदी सर्वपल्ली राधाकृष्णन्‌ यांची निवड.

जन्म/वाढदिवस


 • १७२९ : लुई आंत्वान दि बोगेनव्हिल, फ्रेंच शोधक.
 • १८३३ : अलेक्झांडर बोरोदिन, रशियन संगीतकार व रसायनशास्त्रज्ञ.
 • १८४२ : जॉन स्ट्रट, नोबेल पारितोषिकविजेता भौतिकशास्त्रज्ञ.
 • १८६६ : सुन यात्सेन, चीनचा राष्ट्राध्यक्ष.
 • १८८० : सेनापती बापट, सशस्त्र क्रांतिकारक, समाजसेवक, तत्वचिंतक.
 • १८९६ : सलीम अली, भारतीय पक्षीतज्ज्ञ.
 • १९०४ : एस.एम. जोशी, भारतीय स्वातंत्र्यसैनिक.
 • १९१० : डडली नर्स, दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू.
 • १९६१ : नादिया कोमानेची, रोमेनियाची जिम्नॅस्ट.
 • १९६८ : सॅमी सोसा, अमेरिकन बेसबॉल खेळाडू.
 • १९७३ : राधा मिचेल, ऑस्ट्रेलियाची अभिनेत्री.

मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन


 • १९४६ : पं. मदन मोहन मालवीय, बनारस हिंदू विद्यापीठाचे निर्माते.
 • १९६९ : इस्कंदर मिर्झा, पाकिस्तानचा पहिला राष्ट्राध्यक्ष.
 • २००५ : प्रा.मधू दंडवते, माजी केंद्रीय मंत्री, ज्येष्ठ समाजवादी नेते.