MarathiMati.com - Android App on Google Play Store

३१ मे दिनविशेष

द्वारे | प्रकाशक संपादक मंडळ | ३१ मे २०१३

३१ मे दिनविशेष(May 31 in History) ठळक घटना, घडामोडी, जन्म(वाढदिवस), मृत्यू(पुण्यतिथी, स्मृतीदिन) आणि जागतिक दिवस.

भाऊ दाजी लाड - रामकृष्ण विठ्ठल लाड

जागतिक दिवस


  • जागतिक तंबाखूसेवन विरोधी दिन.
  • स्वातंत्र्य दिन : दक्षिण आफ्रिका.

ठळक घटना, घडामोडी


  • १२२३ : कालका नदीची लढाई : चंगीझ खान व पूर्व स्लाव्हिक सैन्यांमध्ये चकमक. मोंगोल सैन्याचा विजय.
  • १७५९ : अमेरिकेच्या पेनसिल्व्हेनिया प्रांतात नाटकांवर बंदी.
  • १७९० : अमेरिकेत १७९०चा कॉपीराईट कायदा लागू.
  • १८६२ : अमेरिकन यादवी युद्ध : सेव्हेन पाईन्सची लढाई.
  • १८६४ : अमेरिकन यादवी युद्ध : कोल्ड हार्बरची लढाई.
  • १८८४ : जॉन हार्वे केलॉगने कॉर्न फ्लेक्सचा पेटंट मिळवला.
  • १८८९ : जॉन्सटाउनचा पूर : अमेरिकेच्या पेनसिल्व्हेनिया राज्यातील कॉनेमॉ सरोवरावरचा बांध फुटला. जॉन्सटाउन शहरात ६० फूट पाणी. २,००० ठार.
  • १९०२ : दुसरे बोअर युद्ध:प्रिटोरियाचा तह : उरलेल्या आफ्रिकानर सैन्याने पराभव मान्य केला व दक्षिण आफ्रिकेवरील ब्रिटीश वर्चस्व कायम झाले.
  • १९१० : दक्षिण आफ्रिकेला स्वातंत्र्य.
  • १९१३ : अमेरिकेच्या संविधानातील १३वा बदल संमत.
  • १९२१ : अमेरिकेतील तल्सा शहरात वांशिक दंगे. ३९हून अधिक ठार.
  • १९२४ : सोवियेत संघाने बाह्य मोंगोलियावरील चीनचे आधिपत्य मान्य केले.
  • १९२७ : फोर्ड मोटर कंपनीची मॉडेल टी प्रकारची शेवटची कार तयार झाली. या प्रकारच्या एकूण १,५०,०७,००३ कार तयार केल्या गेल्या.
  • १९४२ : दुसरे महायुद्ध : जपानच्या पाणबुड्यांनी सिडनीवर हल्ला केला.
  • १९४२ : दुसरे महायुद्ध : लुफ्तवाफेने इंग्लंडमधील कोव्हेन्ट्री गावावर बॉम्बफेक केली.
  • १९५२ : जनरल ड्वाइट डी. आयझेनहॉवर अमेरिकन सैन्यातून निवृत्त.
  • १९६१ : दक्षिण आफ्रिका प्रजासत्ताक झाले.
  • १९६२ : वेस्ट ईंडीझ संघाचे विघटन.
  • १९७० : पेरू मध्ये भूकंप. डोंगर कोसळून युंगे गाव नष्ट. ४७,००० ठार.
  • १९७४ : यॉम किप्पुर युद्ध इस्रायेल व सिरीयामध्ये तह.
  • २००५ : वॉटरगेट कुभांड : डब्ल्यु. मार्क फेल्टने आपणच डीप थ्रोट नावाने ओळखला जाणारा गुप्त बातमीदार असल्याचे कबूल केले.

जन्म, वाढदिवस


  • १४६९ : मनुएल पहिला, पोर्तुगालचा राजा.
  • १५५७ : फियोदोर पहिला, रशियाचा झार.
  • १६४० : मिकाल विस्नियोवीकी, पोलंडचा राजा.
  • १८५२ : फ्रान्सिस्को मोरेनो, आर्जेन्टिनाचा शोधक.
  • १८५७ : पोप पायस अकरावा.
  • १८८३ : लॉरी क्रिस्चियन रिलॅन्डर, फिनलंडचा राष्ट्राध्यक्ष.
  • १९१० : भा. रा. भागवत, मराठी बालसाहित्यकार आणि विज्ञान कथाकार.
  • १९२३ : रैनिये तिसरा, मोनॅकोचा राजा.
  • १९२८ : पंकज रॉय, भारतीय क्रिकेट खेळाडू.
  • १९३० : क्लिंट ईस्टवूड, अमेरिकन अभिनेता, चित्रपट निर्माता, दिग्दर्शक.
  • १९३१ : जॉन रॉबर्ट श्रीफर, अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ.
  • १९३५ : जिम बॉल्जर, न्यू झीलँडचा पंतप्रधान.
  • १९३८ : जॉन प्रेस्कॉट, युनायटेड किंग्डमचा पंतप्रधान.
  • १९४३ : ज्यो नेमथ, अमेरिकन 'फूटबॉल'पटू.
  • १९६६ : रोशन महानामा, श्रीलंकेचा क्रिकेट खेळाडू.

मृत्यू, पुण्यतिथी, स्मृतीदिन


  • १४०८ : आशिकागा योशिमित्सु, जपानी शोगन.
  • १४१० : मार्टिन पहिला, अरागॉनचा राजा.
  • १७४० : फ्रीडरीक पहिला, प्रशियाचा राजा.
  • १७९९ : पिएर लेमॉनिये, फ्रेंच अंतरिक्षशास्त्रज्ञ.
  • १८७४ : भाऊ दाजी लाड(रामकृष्ण विठ्ठल लाड), प्राच्यविद्यापंडित आणि समाजसेवक.
  • १९६२ : एडॉल्फ आइकमन, नाझी अधिकारी.
  • २००२ : सुभाष गुप्ते, भारतीय क्रिकेट खेळाडू, लेग स्पिनर गोलंदाज, त्रिनिदाद येथे.
MarathiMati.com - Android App on Google Play Store