२७ मे दिनविशेष

लेखन: |प्रकाशन: संपादक मंडळ| २७ मे २०१३

२७ मे दिनविशेष(May 27 in History) ठळक घटना, घडामोडी, जन्म(वाढदिवस), मृत्यू(पुण्यतिथी, स्मृतीदिन) आणि जागतिक दिवस.

डॉ. भालचंद्र वनाजी नेमाडे - (२७ मे १९३८) हे मराठी लेखक व टीकाकार आहेत. कोसला हे पुस्तक त्यांच्या वयाच्या २५व्या वर्षी प्रकाशित झाले. कोसलाच्या यशानंतर नेमाडेंनी बिढार(१९६७), जरीला(१९७७) व झूल(१९७९) या "चांगदेव पाटील" या काल्पनिक नायकाच्या जीवनावरील कादंबऱ्या लिहिल्या. हिंदू नावाची कादंबरी नेमाडे लिहिली असून ती जुलै १५, इ.स. २०१० ला पॉप्युलर प्रकाशनातर्फे प्रसिद्ध झाली आहे. कादंबऱ्यांसोबतच त्यांचे 'देखणी'आणि 'मेलडी’(१९७०) हे काव्यसंग्रहही प्रसिद्ध आहेत. या कवितासंग्रहातील कवितांची हिंदी आणि इंग्रजी भाषांतरेही प्रकाशित झाली आहेत.१९६० नंतरचे मराठीतील श्रेष्ठ लेखक अशी भालचंद्र नेमाडे यांची प्रतिमा आहे.

जागतिक दिवस


 • मातृ दिन : बॉलिव्हिया.
 • बाल दिन : नायजेरिया.

ठळक घटना/घडामोडी


 • ११५३ : माल्कम चौथा स्कॉटलंडच्या राजेपदी
 • १३२८ : फिलिप सहावा फ्रांसच्या राजेपदी
 • १७०३ : झार पीटर द ग्रेटने सेंट पीटर्सबर्ग शहराची स्थापना केली
 • १८१२ : ला कोरोनियाची लढाई.
 • १८१३ : १८१२चे युद्ध - अमेरिकेच्या सैन्याने फोर्ट जॉर्ज किल्ला जिंकला.
 • १८८३ : अलेक्झांडर तिसरा, रशियाच्या झारपदी.
 • १८९६ : अमेरिकेच्या सेंट लुईस शहरात एफ.४ टोर्नेडो. २५५ ठार.
 • १९०५ : त्सुशिमाची लढाई.
 • १९०७ : सान फ्रांसिस्को मध्ये प्लेगचा प्रादुर्भाव.
 • १९२७ : फोर्ड मोटर कंपनीने मॉडेल टी कारचे उत्पादन बंद केले व मॉडेल ए तयार करणे सुरू केले.
 • १९३० : न्यू यॉर्कमध्ये क्रायस्लर बिल्डिंग या ३१९ मीटर (१,०४६ फूट) उंचीची त्या काळची सगळ्यात उंच इमारतीचे उद्घाटन.
 • १९३३ : न्यू डील - यु.एस. फेडरल सिक्युरिटीझ ऍक्ट हा कायदा लागू झाला. अमेरिकेतील सगळ्या कंपन्यांना फेडरल ट्रेड कमिशनकडे आपल्या समभागांची नोंदणी करणे सक्तीचे झाले.
 • १९३७ : सान फ्रांसिस्को व मरीन काउंटीला जोडणारा गोल्डन गेट ब्रिज हा पूल पादचार्‍यांना खुला झाला.
 • १९३९ : डी.सी. कॉमिक्सने बॅटमॅनची पहिली चित्रकथा प्रकाशित केली.
 • १९४० : दुसरे महायुद्ध-ले पॅरेडिसची कत्तल - रॉयल नॉरफोक रेजिमेंटच्या ९९ सैनिकांच्या व्यक्तीने शरणागती पत्करल्यावर जर्मन सैनिकांनी त्यातील ९७ सैनिकांना ठार मारले.
 • १९४१ : दुसरे महायुद्ध - अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष रूझवेल्टने आणीबाणी जाहीर केली.
 • १९४१ : दुसरे महायुद्ध - जर्मनीच्या बिस्मार्क या बलाढ्य युद्धनौकेला जलसमाधी. २,१०० खलाशी व सैनिक ठार.
 • १९५८ : एफ.४ फँटम या विमानाचे प्रथम उड्डाण.
 • १९६० : तुर्कस्तानमध्ये लश्करी उठाव. राष्ट्राध्यक्ष सेलाल बयारची उचलबांगडी.
 • १९६७ : ऑस्ट्रेलियाने स्थानिक ऍबोरिजिन लोकांना लोकसंख्यागणनेत मोजण्याचे ठरवले.
 • १९७१ : पश्चिम जर्मनीच्या वुप्पेर्टाल शहराजवळ रेल्वे अपघात. ४६ ठार, २५ जखमी.
 • १९७५ : इंग्लंडच्या ग्रासिंग्टन शहराजवळ बसला अपघात. ३२ ठार.
 • १९८० : ग्वांग्जुची कत्तल - दक्षिण कोरियाच्या सैन्याने ग्वांग्जु शहर घेतले. २०७ ठार.
 • १९९५ : सुपरमॅनची भूमिका करणारा क्रिस्टोफर रीव कलपेपर, व्हर्जिनिया येथे घोडेसवारी करताना पडला व गळ्याखालील स्नायू वापरण्याची शक्ती गमावून बसला.
 • १९९७ : जॅरेल, टेक्सास येथे एफ.५ टोर्नेडो २७ ठार.
 • १९९९ : आंतरराष्ट्रीय न्यायालयाने हेग येथे स्लोबोदान मिलोसेविचवर कोसोवो मध्ये माणुसकीविरुद्ध अत्याचारांबद्दल गुन्हा दाखल केला.
 • २००६ : जावाच्या योग्यकर्ता शहरात भूकंप. ६,६०० ठार.

जन्म/वाढदिवस


मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन