MarathiMati.com - Android App on Google Play Store

२५ मे दिनविशेष

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | २५ मे २०१३

२५ मे दिनविशेष(May 25 in History) ठळक घटना, घडामोडी, जन्म(वाढदिवस), मृत्यू(पुण्यतिथी, स्मृतीदिन) आणि जागतिक दिवस.

सुनील दत्त - (६ जून १९२९ - २५ मे २००५) खरे नाव बलराज दत्त, ते प्रसिद्ध भारतीय चित्रपट अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक. सुनील दत्त यांनी काही पंजाबी चित्रपटांत देखील अभिनय केला आहे, या व्यतिरिक्त त्यांची भारतीय राजकारणात सार्थक भूमीका राहिली आहे. मनमोहन सिंह यांच्या सरकार मध्ये २००४ ते २००५ पर्यंत ते खेळ आणि युवा विषयक कॅबिनेट मंत्री होते.

जागतिक दिवस


  • मे क्रांती दिन : आर्जेन्टिना, लिब्या.
  • राष्ट्र दिन : जॉर्डन, सुदान, आर्जेन्टिना.
  • आफ्रिका मुक्ती दिन : चाड, लायबेरिया, माली, मॉरिटानिया, नामिबिया, झांबिया, झिम्बाब्वे.
  • मुक्ती दिन : लेबेनॉन.
  • युवा दिन : युगोस्लाव्हिया.

ठळक घटना, घडामोडी


  • १०८५ : कॅस्टिलचा राजा आल्फोन्सो सहाव्याने स्पेनमधील टोलेडो शहर मूरांकडून जिंकले.
  • १६५९ : रिचर्ड क्रॉमवेलने इंग्लंडच्या रक्षकपदाचा राजीनामा दिला.
  • १८१० : सेमाना दि मेयो - आर्जेन्टिनात नागरिकांनी बोयनोस एर्समधून स्पेनच्या व्हाइसरॉयला हाकलले.
  • १८६५ : अमेरिकन यादवी युद्ध - अलाबामात मोबिल शहराजवळ शस्त्रसाठ्यात स्फोट. ३०० ठार.
  • १८९५ : फोर्मोसाच्या प्रजासत्ताक ची स्थापना.
  • १९२६ : युक्रेनच्या परागंदा सरकारच्या अध्यक्ष सिमोन पेटलियुराची हत्या.
  • १९३५ : जेसी ओवेन्सने ४५ मिनिटात वेगवेकळ्या शर्यतींमध्ये चार विश्वविक्रम नोंदवले.
  • १९३८ : स्पॅनिश गृहयुद्ध - अलिकान्ते शहरावर बॉम्बफेक. ३१३ ठार.
  • १९४० : दुसरे महायुद्ध - डंकर्कची लढाई सुरू.
  • १९४६ : अब्दुल्ला जॉर्डनच्या राजेपदी.
  • १९५३ : अमेरिकेच्या सैन्याने परमाणुशस्त्रे असलेल्या तोफगोळ्यांची चाचणी केली.
  • १९५५ : जगातील उंचीनुसार तिसरे शिखर कांचनगंगा जॉर्ज बॅंड आणि जो ब्राऊन यांनी प्रथमच सर केले.
  • १९६१ : अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष जॉन एफ. केनेडीने "दशक संपायच्या आत चंद्रावर माणूस" पाठवण्याची घोषणा केली.
  • १९६३ : इथियोपियाची राजधानी अदिस अबाबामध्ये आफ्रिकन एकता संघटनेची स्थापना.
  • १९७९ : अमेरिकन एरलाइन्स फ्लाइट १९१ हे डी.सी.१० जातीचे विमान शिकागोच्या ओहेर विमानतळावरून निघाल्यावर कोसळले. जमीनीवरील दोघांसह २७३ ठार.
  • १९८१ : सौदी अरेबियाची राजधानी रियाधमध्ये अखाती सहकार समितीची स्थापना.
  • १९८२ : फॉकलंड युद्ध - आर्जेन्टिनाने युनायटेड किंग्डमची युद्धनौका एच.एम.एस. कोव्हेन्ट्री बुडवली.
  • १९८५ : बांगलादेशमध्ये वादळ. १०,०००हून अधिक ठार.
  • १९९५ : बॉस्नियाच्या सर्ब सैन्याने ७२ तरुणांना ठार मारले.
  • १९९७ : सियेरा लिओनमध्ये उठाव. मेजर जॉन पॉली कोरोमाहने सत्ता बळकावली.
  • २००१ : कॉलोराडोतील बोल्डर शहराचा एरिक वाइहेनमायर हा एव्हरेस्ट सर करणारा प्रथम अंध व्यक्ती ठरला. त्याच्या बरोबरचा न्यू कनान, कॉनेटिकटचा शेरमान बुल सगळ्यात वयस्कर व्यक्ती (६४ वर्षे) ठरला.
  • २००२ : चायना एरलाइन्स फ्लाइट ६११ हे बोईंग ७४७ जातीचे विमान तैवानच्या सामुद्रधुनीत कोसळले. २२५ ठार.
  • २००२ : मोझाम्बिकच्या तेंगा शहराजवळ रेल्वे गाडीला अपघात १९७ ठार.
  • २००३ : नेस्टर कर्चनर आर्जेन्टिनाच्या राष्ट्राध्यक्षपदी.

जन्म, वाढदिवस


  • १०४८ : शेन्झॉँग, चीनी सम्राट.
  • १३३४ : सुको, जपानी सम्राट.
  • १४५८ : महमुद बेगडा, गुजरातचा सुलतान.
  • १७१३ : जॉन स्टुअर्ट, युनायटेड किंग्डमचा पंतप्रधान.
  • १८०३ : राल्फ वाल्डो एमर्सन, अमेरिकन लेखक व तत्त्वज्ञानी.
  • १९०७ : उ नु, म्यानमारचा राजकारणी.
  • १९३६ : रुसी सुरती, भारतीय क्रिकेटपटू.
  • १९७० : मॉरिस क्रॉफ्ट, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.

मृत्यू, पुण्यतिथी, स्मृतीदिन


MarathiMati.com - Android App on Google Play Store