१ मे दिनविशेष

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | १ मे २०१३

१ मे दिनविशेष(May 1 in History) ठळक घटना, घडामोडी, जन्म(वाढदिवस), मृत्यू(पुण्यतिथी, स्मृतीदिन) आणि जागतिक दिवस.

ओशो रजनीश -

जागतिक दिवस


 • महाराष्ट्र दिन : महाराष्ट्र.
 • गुजरात दिन : गुजरात.
 • कामगार दिन : अमेरिका व अमेरिकाप्रभावित देश वगळता जगभर.
 • लेइ दिन : हवाई.
 • बेल्टेन : आयर्लंड.
 • राष्ट्रीय प्रेम दिन : चेक प्रजासत्ताक.
 • कायदा दिन : अमेरिकेची संयुक्त संस्थाने.

ठळक घटना/घडामोडी


 • १८६२ : मुंबई विद्यापिठाचा पहिला पदवीदान समारंभ.
 • १८८६ : या दिवशी अमेरिकेत आठ तासाचे काम हे एक दिवसाचे काम असे प्रमाणित करण्यासाठी संप सुरू झाला. हा दिवस जगभर (अमेरिका सोडून) कामगार दिन म्हणून पाळला जातो.
 • १८९७ : स्वामी विवेकानंद यांनी रामकृष्ण मिशन या संस्थेची स्थापना
 • १९३० : सूर्यमालेतील नवव्या ग्रहाचे प्लुटो असे नामकरण करण्यात आले.
 • १९५६ – पोलियोची लस जनतेस उपलब्ध.
 • १९६० : द्वैभाषिक मुंबई राज्याचे विभाजन होऊन महाराष्ट्र आणि गुजरात ही दोन राज्ये निर्माण केली गेली.
 • १९८१ : सिंधुदुर्ग जिल्ह्याची निर्मिती
 • १९७२ : कोळसा खाणीचे राष्ट्रीतीकरण करण्यात आले.
 • १७३९ : चिमाजीअप्पांनी सैन्यासह वसईवर हल्ला केला.

जन्म/वाढदिवस


मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन


 • १९७२ : कमलनयन बजाज, भारतीय उद्योगपती.
 • १९९३ : नानासाहेब गोरे उर्फ ना. ग. गोरे, समाजवादी विचारवंत.
 • १९९८ : गंगुताई पटवर्धन, शिक्षणतज्ञ.
 • २००२ : पंडित आवळीकर, मराठी वाङ्मयाचे अभ्यासक.