६ मार्च दिनविशेष

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | ६ मार्च २०१८
६ मार्च दिनविशेष | March 6 in History
श्यामची आई - मराठी चित्रपट. छायाचित्र: मराठीमाती डॉट कॉम आर्काईव्ह

श्यामची आई - मराठी चित्रपट - (१९५३) श्यामची आई हा पांडुरंग सदाशिव साने यांनी लिहिलेल्या याच नावाच्या कादंबरीवर आधारित आणि इ.स. १९५३ साली पडद्यांवर झळकलेला मराठी भाषेतील चित्रपट आहे. हा चित्रपट प्रल्हाद केशव अत्रे यांनी दिग्दर्शिला असून माधव वझे, वनमाला व दामूअण्णा जोशी या अभिनेत्यांनी प्रमुख भूमिका रंगवल्या आहेत. इ.स. १९५४ साली या चित्रपटाला भारतीय केंद्रशासनातर्फे दिला जाणारा पहिला राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला.

जागतिक दिवस


 • स्वांतत्र्य दिन: घाना.
 • अलामो दिन: टेक्सास.

ठळक घटना/घडामोडी


 • १४४७: निकोलस पाचवा पोपपदी.
 • १८३६: टेक्सासचे प्रजासत्ताक - अलामोचा प्रतिकार थांबला. मेक्सिकोच्या १,६०० सैनिकांविरुद्ध १३ दिवस किल्ला लढवणारे १८९ टेक्सासचे सैनिक पराभूत.
 • १८६९: दिमित्री मेन्डेलीफने मूलभूत घटकपदार्थांची आवर्त सारणी प्रकाशित केली.
 • १९०१: जर्मनीच्या कैसर विल्हेम दुसर्‍यावरील प्राणघातक हल्ला निष्फळ.
 • १९४०: रशिया व फिनलंडमध्ये शस्त्रसंधी.
 • १९५३: मराठीतील श्रेष्ठ नाटककार आचार्य अत्रे यांनी ‘श्यामची आई’ हा चित्रपट पडद्यावर आणला.
 • १९५३: जोसेफ स्टालिननंतर जॉर्जी मॅक्सिमिलानोविच रशियाच्या अध्यक्षपदी.
 • १९६४: कॅशियस क्लेने मुहम्मद अली हे नाव धारण केले.
 • १९६४: कॉन्स्टन्टाईन दुसरा ग्रीसच्या राजेपदी.
 • १९७५: अल्जियर्सचा तह - ईराण व इराकने सीमाप्रश्नी संधी केली.
 • १९८७: एस.एस. हेराल्ड ऑफ फ्री एंटरप्राइझ ही ब्रिटीश फेरीबोट बेल्जियमच्या झीब्रुग बंदरात बुडाली. १९३ ठार.
 • १९९४: मोल्डोव्हा च्या जनतेने निवडणुकीत रोमेनियात सामील होण्यास नकार दिला.

जन्म/वाढदिवस


 • १७०६: जॉर्ज पोकॉक, इंग्लिश दर्यासारंग.
 • १९२९: डेव्हिड शेपर्ड, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
 • १९३३: किम एल्जी, दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू.
 • १९३७: व्हॅलेन्तिना तेरेश्कोव्हा, रशियन अंतराळयात्री.
 • १९४९: शौकत अझीझ, पाकिस्तानी पंतप्रधान.
 • १९५७: अशोक पटेल, भारतीय क्रिकेट खेळाडू.
 • १९६९: झफर इकबाल, पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू.
 • १९७२: शकिल ओ'नील, अमेरिकन बास्केटबॉल खेळाडू.
 • १९७७: नांटी हेवर्ड, दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू.

मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन


 • १७५४: हेन्री पेल्हाम, इंग्लंडचा पंतप्रधान.
 • १८९९: व्हिक्टोरिया कैउलानी, हवाईची राजकुमारी.
 • १९३२: जॉन फिलिप सूसा, अमेरिकन संगीतकार.
 • १९५४: पॉल, ग्रीसचा राजा.
 • १९७३: पर्ल बक, अमेरिकन लेखिका.
 • १९८१: जॉर्ज गियरी, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
 • १९८२: आयन रँड, रशियन-अमेरिकन लेखक.
 • १९८६: जॉर्जिया ओ'कीफ, अमेरिकन चित्रकार.
 • १९९२: रणजित देसाई, सुप्रसिद्ध मराठी लेखक.
 • १९९७: छेदी जगन, गुयानाचा राष्ट्राध्यक्ष.
 • १९९७: मायकेल मॅन्ली, जमैकाचा पंतप्रधान.
 • १९९९: इसा इब्न सलमान अल खलिफा, बहरैनचा अमीर.