५ मार्च दिनविशेष

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | ५ मार्च २०१८
५ मार्च दिनविशेष | March 5 in History
नानासाहेब चाफेकर. छायाचित्र: मराठीमाती डॉट कॉम आर्काईव्ह

नानासाहेब चाफेकर - (५ ऑगस्ट १८६९ - ५ मार्च १९६८) हे मराठीतले ऐतिहासिक विषयावर लिहिणारे एक भाषातज्ज्ञ संशोधक लेखक व समीक्षक होते. पैसा, राज्यकारभार, समाज-नियंत्रण ह्यांसारख्या विषयांवरही त्यांनी ग्रंथ लिहिले असून ते त्यांच्या चौफेर विचारांचे द्योतक आहेत. वैदिक वाङ्‌मयाविषयीचे चिंतन व शोधन हा त्यांच्या विचाराचा आणखी एक विषय होता. १९३४ साली बडोद्यात भरलेल्या मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते.

जागतिक दिवस


 • -

ठळक घटना/घडामोडी


 • १०४६: पर्शियन कवी व प्रवासी नसीर खुश्रोने आपल्या सात वर्षांच्या मध्य-पूर्वेच्या भ्रमंतीची सुरुवात केल. या प्रवासाचे वर्णन त्याने सफरनामा या आपल्या पुस्तकात करून ठेवलेले आहे.
 • १८२४: युनायटेड किंग्डमने बर्माविरुद्ध युद्ध पुकारले.
 • १९०२: तीन दिवसांत १,००,००० सैनिक गमावल्यावर रशियाने मांचुरियातून माघार घेतली.
 • १९२४: शफकेत व्हेलार्सी आल्बेनियाच्या पंतप्रधानपदी.
 • १९३१: महात्मा गांधी व ब्रिटीशांचे भारतातील व्हाईसरॉय लॉर्ड आयर्विन यांच्यात गांधी-आयर्विन करार करार झाला.
 • १९३१: डॅनियेल सालामांका उरे उरुग्वेच्या राष्ट्राध्यक्षपदी.
 • १९३३: अमेरिकन राष्ट्राध्यक्ष फ्रँकलिन डिलानो रूझवेल्टने देशातील सगळ्या बँका काही दिवसांसाठी बंद केल्या व आर्थिक व्यवहार करण्यास बंदी घातली.
 • १९४०: सोवियेत पॉलिटब्युरोने पोलंडच्या १४,७०० युद्धकैद्यांसह २५,७०० पोलिश बुद्धीजीवींची हत्या करण्याचा आदेश मंजूर केला.
 • १९४५: दुसरे महायुद्ध- रुह्रची लढाई सुरू.
 • १९६४: श्रीलंकेत आणीबाणी.
 • १९८३: बॉब हॉक ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानपदी.
 • १९८८: टर्क्स व कैकोस द्वीपांनी आपल्या संविधानाची नवीन आवृत्ती अंगिकारली.
 • १९९१: पहिले अखाती युद्ध - इराकने सगळ्या युद्धकैद्यांची मुक्तता केली.
 • २००१: मक्केत हज सुरू असताना ३५ भाविकांचा चेंगरुन मृत्यू.

जन्म/वाढदिवस


 • ११३३: हेन्री दुसरा, इंग्लंडचा राजा.
 • १३२४: डेव्हिड दुसरा, स्कॉटलंडचा राजा.
 • १५१२: जेरार्डस मर्केटर, फ्लेमिश नकाशेतज्ञ.
 • १८९८: चाउ एन-लाय, चीनचा राष्ट्राध्यक्ष.
 • १९३७: ओलुसेगुन ओबासांजो, नायजेरियाचा राष्ट्राध्यक्ष.
 • १९४२: फेलिपे गॉन्झालेझ, स्पेनचा पंतप्रधान.
 • १९५९: वाझ्गेन सर्ग्स्यान, आर्मेनियाचा पंतप्रधान.

मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन


 • १५३९: नुनो दा कुन्हा, भारतातील पोर्तुगीझ गव्हर्नर.
 • १८१५: फ्रांझ मेस्मेर, संमोहनविद्येचा ऑस्ट्रियन प्रवर्तक.
 • १८२७: पिएर-सिमोन लाप्लास, फ्रेंच गणितज्ञ.
 • १८२७: अलेस्सांद्रो व्होल्टा, इटालियन भौतिकशास्त्रज्ञ.
 • १९५३: जोसेफ स्टालिन, सोवियेत राष्ट्राध्यक्ष.
 • १९५५: अंतानास मर्किस, लिथुएनियाचा राष्ट्राध्यक्ष.
 • १९६३: पॅट्सी क्लाइन, अमेरिकन गायिका.
 • १९६८: नारायण गोविंद चाफेकर, मराठीचे संशोधक.