४ मार्च दिनविशेष

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | ४ मार्च २०१८
४ मार्च दिनविशेष | March 4 in History
विक्रांत जहाज. छायाचित्र: मराठीमाती डॉट कॉम आर्काईव्ह

विक्रांत जहाज - आय.एन.एस विक्रांत (४ मार्च १९६१ - ३१ जानेवारी १९९७) हे भारतीय नौदलाचे मॅजेस्टिक-वर्गातील, हलके विमानवाहू जहाज होते. हे जहाज सप्टेंबर २२, १९४५ रोजी त्याचे उद्घाटन करण्यात आले. जानेवारी १९५७ च्या सुमारास ते ब्रिटिश नौदलाकडून भारताने विकत घेतले. मार्च ४ इ.स. १९६१ रोजी ते उत्तर आयर्लंडात बेलफास्ट येथे असताना युनायटेड किंग्डमातील भारतीय उच्चायुक्त विजयालक्ष्मी पंडित यांनी आय.एन.एस. विक्रांत या नावाने भारतीय नौदलाच्या ताफ्यात दाखल करून घेतले. या जहाजाने इ.स. १९६५ व १९७१ सालांच्या दोन्ही भारत-पाकिस्तान युद्धांत भारतीय नौदलासाठी महत्त्वाची कामगिरी बजावली. जानेवारी ३१, १९९७ रोजी ते भारतीय नौदलातून सेवानिवृत्त करण्यात आले. सध्या ते वस्तुसंग्रहालयात बदलवण्यात आले आहे.

जागतिक दिवस


 • औद्योगिक सुरक्षा दिवस.
 • राष्ट्रीय दिन.

ठळक घटना/घडामोडी


 • १३५१: रामातिबोदी पहिला सयामच्या राजेपदी.
 • १३८६: व्लादिस्लॉ दुसरा जोगैला पोलंडच्या राजेपदी.
 • १४६१: वॉर ऑफ द रोझेस - एडवर्ड चौथ्याने इंग्लंडचा राजा हेन्री सहाव्याला पदच्युत केले.
 • १५१९: कॉँकिस्तादोर हर्नान कोर्तेझ मेक्सिकोत येउन पोचला.
 • १६६५: दुसर्‍या अँग्लो-डच युद्धाला सुरुवात.
 • १७८९: न्यूयॉर्क शहरात अमेरिकन काँग्रेसने अमेरिकेचे संविधान अमलात आल्याचे जाहीर केले.
 • १७९१: व्हर्मॉँट अमेरिकेचे बारावे राज्य झाले.
 • १८३७: शिकागो शहराची स्थापना.
 • १८६१: अब्राहम लिंकन अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी.
 • १८९४: चीनच्या शांघाय शहरात लागलेल्या प्रचंड आगीत १,००० इमारती भस्मसात.
 • १९०२: शिकागो शहरात अमेरिकन ऑटोमोबाइल असोसिएशन तथा ट्रिपल-ए ची स्थापना.
 • १९३०: दांडीयात्रेच्या सफलतेने प्रभावित भारतातील ब्रिटीश व्हाइसरॉय एडवर्ड फ्रेडरिक लिंडली वूड व महात्मा गांधींच्यात बैठक. भारतात देशी मिठाचा मुक्त वापर करू देण्याचा सरकारचा निर्णय तसेच दांडीयात्रेदरम्यान पकडललेल्या राजकैद्यांची मुक्तता करण्याचे आश्वासन.
 • १९३६: हिंडेनबर्गचे प्रथम उड्डाण.
 • १९४५: दुसरे महायुद्ध - फिनलंडने जर्मनीविरुद्ध युद्ध पुकारले.
 • १९५१: प्रथम आशियाई खेळांचे उद्घाटन.
 • १९६०: हवानाच्या बंदरात फ्रेंच मालवाहू जहाज ला कूबरवर स्फोट. १०० ठार.
 • १९६१: भारतीय नौदलात १ ले विमानवाहू जहाज `विक्रांत' दाखल झाले.
 • १९६६: केनेडियन पॅसिफिक एरलाइन्सचे विमान टोक्यो येथे उतरताना कोसळले. ६४ ठार.
 • १९८४: महाराष्ट्रात वीजनिर्मितीचा नवा विक्रम याच दिवशी झाला.
 • २००१: पोर्तुगालच्या कास्तेलो दि पैव्हा शहरातील पूल कोसळला. ७० ठार.

जन्म/वाढदिवस


 • १६७८: अँतोनियो विवाल्डी, इटालियन संगीतकार.
 • १८४७: कार्ल बेयर, ऑस्ट्रियन रसायनशास्त्रज्ञ.
 • १८७५: मिहालि कॅरोल्यी, हंगेरीचा पंतप्रधान व राष्ट्राध्यक्ष.
 • १९०१: चार्ल्स गोरेन, अमेरिकन ब्रिज खेळाडू व लेखक.
 • १९०६: चार्ल्स रुडॉल्फ वॉलग्रीन, जुनियर, अमेरिकन उद्योगपती.
 • १९२२: दीना पाठक, गुजराती व हिंदी अभिनेत्री.
 • १९३७: ग्रॅहाम डाउलिंग, न्यू झीलँडचा क्रिकेट खेळाडू.

मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन


 • २५१: पोप लुशियस पहिला.
 • ५६१: पोप पेलाजियस पहिला.
 • ११७२: स्टीवन तिसरा, हंगेरीचा राजा.
 • ११९३: सलादिन, तुर्कस्तानचा सुलतान.
 • १४९६: सिगिस्मंड, ऑस्ट्रियाचा राजा.
 • १९४८: बाळकृष्ण शिवराम मुंजे, भारतीय-मराठी राजकारणी, हिंदू महासभेचे संस्थापक.
 • १९७७: लुट्झ ग्राफ श्वेरिन फोन क्रोसिक, जर्मनीचा चान्सेलर.
 • १९९७: रॉबर्ट एच. डिक, अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ.
 • १९९९: कारेल व्हान हेट रीव्ह, डच लेखक.
 • २००४: जॉर्ज पेक, अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ.
 • २०११: अर्जुन सिंग, भारतीय राजकारणी.