३० मार्च दिनविशेष

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | ३० मार्च २०१८
३० मार्च दिनविशेष | March 30 in History
आनंद बक्षी. छायाचित्र: मराठीमाती डॉट कॉम आर्काईव्ह

आनंद बक्षी - (२१ जुलै १९३० - ३० मार्च २००२) हे एक हिंदी गीतकार व कवी होते.बक्षी यांचा जन्म आताच्या पाकिस्तानमधील रावळपिंडी येथे काश्मीरी मोहयाल ब्राह्मण कुटुंबात झाला. त्यांची आई सुमित्रा आनंद बक्षी पाच वर्षांचे असताना वारली. त्यांचे कुटुंब भारताच्या फाळणी दरम्यान २ ऑक्टोबर, १९४७ रोजी भारतात आले. डकोटा विमानातून दिल्लीला आल्यावर बक्षी कुटुंब पुणे, मेरठ आणि शेवटी परत दिल्लीत येउन स्थायी झाले.

जागतिक दिवस


 • -

ठळक घटना/घडामोडी


 • १६९९: शिख धर्मगुरू श्री.गुरू गोबिंद सिंघ यांनी खालसा पंथ ची स्थापना केली.
 • २००९: बारा दहशतवाद्यांनी पाकिस्तानच्या लाहोर शहरातील मनावन पोलिस अकादमीवर हल्ला केला. सहा हल्लेखोरांसह १८ ठार.

जन्म/वाढदिवस


 • १७४६: फ्रांसिस गोया, स्पॅनिश चित्रकार.
 • १८३२: व्हिंसेंट व्हान गॉ, डच चित्रकार.

मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन


 • १६६५: मुरारबाजी देशपांडे, छत्रपती शिवाजी महाराज यांचे विश्वासू सरदार.
 • १९४४: सर चार्ल्स व्हर्नान बॉयस, विख्यात ब्रिटिश पदार्थविज्ञानशास्त्रज्ञ.
 • १९७६: रंगसम्राट रघुवीर शंकर मुळगावकर, भारतीय चित्रकार.
 • १९९३: एस. एम. पंडित, भारतीय चित्रकार.
 • १९९८: फर्डिनंड पोर्श, पोर्श, ए.जी. या जर्मन कंपनीचा संस्थापक.
 • २००२: आनंद बक्षी, हिंदी चित्रपटगीतकार.
 • २००२: क्वीन मदर एलिझाबेथ, इंग्लंडची राणी एलिझाबेथ दुसरीची आई.