२७ मार्च दिनविशेष

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | २७ मार्च २०१८
२७ मार्च दिनविशेष | March 27 in History
भार्गवराम आचरेकर. छायाचित्र: मराठीमाती डॉट कॉम आर्काईव्ह

भार्गवराम आचरेकर - (१० जुलै १९१० - २७ मार्च १९९७) हे एक संगीत नाटकांमध्ये काम करणारे मराठी गायक अभिनेते होते. ते स्त्री-भूमिकाही करीत.भार्गवराम आचरेकरांचा जन्म आचरे गावात झाला. त्यांचे आईवडील लहानपणीच वारले. थोरले बंधू अवधूत आचरेकर यांनी त्यांचा सांभाळ केला. अवधूत आचरेकर यांच्याकडे आईपासूनच चालत आलेला संगीताचा वारसा होता. त्यांनीच भार्गवरामांना संगीताचे धडे दिले.

जागतिक दिवस


 • जागतिक रंगभूमी दिवस

ठळक घटना/घडामोडी


 • १५१३: स्पॅनिश कॉँकिस्तादोर हुआन पॉन्से दे लेओन फ्लोरिडाला पोचणारा प्रथम युरोपीय झाला.
 • १७८२: चार्ल्स वॅट्सन-वेंटवर्थ युनायटेड किंग्डमच्या पंतप्रधानपदी.
 • १७९४: अमेरिकन नौदलाची स्थापना.
 • १७९४: स्वीडन व डेन्मार्कमध्ये मित्रत्त्वाचा तह.
 • १८३६: टेक्सासची क्रांती-गोलियाडची कत्तल - जनरल अँतोनियो लोपेझ दि सांता ऍनाने मेक्सिकन सैन्याला ४०० टेक्सासी व्यक्तींची कत्तल करण्यास फरमावले.
 • १८४६: मेक्सिकन-अमेरिकन युद्ध - फोर्ट टेक्सासचा वेढा सुरू.
 • १८५४: क्रिमियन युद्ध - युनायटेड किंग्डमने रशियाविरुद्ध युद्ध पुकारले.
 • १८९३: केशवसुत यांनी तुतारी, ही कविता लिहिली.
 • १९९२: ख्यातनाम गायक पंडित भीमसेन जोशी यांना मध्य प्रदेश सरकारचा तानसेन पुरस्कार प्रदान.
 • १९५८: निकिता ख्रुश्चेव्ह सोवियेत संघाच्या राष्ट्राध्यक्षपदी.
 • १९८०: अलेक्झांडर कीलँड हा खनिज तेलाचे उत्खनन करणारा तराफा समुद्रात बुडाला. १२३ ठार.
 • १९८८: मौदुद अहमद बांगलादेशच्या पंतप्रधानपदी.
 • १९९३: जियांग झेमिन चीनच्या राष्ट्राध्यक्षपदी.
 • १९९३: आल्बर्ट झफी मादागास्करच्या राष्ट्राध्यक्षपदी.
 • १९९३: महामने उस्माने नायजरच्या राष्ट्राध्यक्षपदी.
 • २०००: वेस्ट इंडीझचा खेळाडू कोर्टनी वॉल्श याने कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक बळींचा विश्वविक्रम प्रस्थापित केला.
 • २०००: चित्रपट निर्माता-चित्रपट दिग्दर्शक बी. आर. चोप्रा यांना फाय फाउंडेशनतर्फे राष्ट्रभूषण पुरस्कार जाहीर.
 • २००१: लेफ्टनंट जनरल हरिप्रसाद यांनी फॉरवर्ड कॉर्प्सच्या प्रमुखपदाची सूत्रे हाती घेतली.
 • २००४: नासा या अमेरिकेच्या संशोधन संस्थेने एक्स-४३ या सर्वाधिक वेगवान चालकरहित जेट विमानाची निर्मिती केली.

जन्म/वाढदिवस


 • ९७२: रॉबर्ट पहिला, फ्रांसचा राजा.
 • १७८५: लुई सतरावा, फ्रांसचा राजा.
 • १८४५: विल्हेम राँटजेन, जर्मन भौतिकशास्त्रज्ञ, क्ष-किरणांचा शोधक.
 • १८५९: जॉर्ज गिफेन, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
 • १८६३: हेन्री रॉइस, इंग्लिश कार तंत्रज्ञ.
 • १८८८: जॉर्ज ए. हर्न, दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू.
 • १८९१: व्हॅलेन्स जुप, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
 • १९०१: ऐसाकु साटो, जपानी पंतप्रधान.
 • १८१०: फ्रँक स्मेइल्स, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
 • १९१०: आय छिंग, चिनी भाषेमधील कवी.
 • १९१२: जेम्स कॅलाहान, युनायटेड किंग्डमचा पंतप्रधान.
 • १९४१: इव्हान गास्पारोविच, स्लोव्हेकियाचा राष्ट्राध्यक्ष.
 • १९६३: क्वेंटिन टारान्टिनो, अमेरिकन चित्रपट निर्माता, दिग्दर्शक व लेखक.
 • १९७०: मरायाह केरी, अमेरिकन गायिका.
 • १९७३: रॉजर टेलिमाकस, दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू.
 • १९८६: झेवियर मार्शल, वेस्ट ईंडीझचा क्रिकेट खेळाडू.

मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन


 • ११९१: पोप क्लेमेंट तिसरा.
 • १३७८: पोप ग्रेगोरी अकरावा.
 • १६२५: जेम्स पहिला, इंग्लंडचा राजा.
 • १८९८: सर सय्यद अहमद खान, भारतीय शिक्षणतज्ञ आणि समाजसुधारक.
 • १९४०: मायकेल जोसेफ सॅव्हेज, न्यू झीलँडचा पंतप्रधान.
 • १९६८: युरी गागारीन, पृथ्वीप्रदक्षिणा करणारा रशियाचा पहिला अंतराळवीर.
 • १९८१: माओ दुन, चिनी भाषेमधील कादंबरीकार, पत्रकार.
 • १९९२: प्रा. शरच्चंद्र वासुदेव चिरमुले, मराठी साहित्यिक, प्राचार्य, गरवारे वाणिज्य महाविद्यालय.
 • १९९७: भार्गवराम आचरेकर, मराठी रंगभूमीवरील गायक-अभिनेता.