२२ मार्च दिनविशेष

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | २२ मार्च २०१८
२२ मार्च दिनविशेष | March 22 in History
श्रीपाद पेंडसे. छायाचित्र: मराठीमाती डॉट कॉम आर्काईव्ह

श्रीपाद पेंडसे - (५ जानेवारी १९१९ - २२ मार्च २००७) हे मराठी भाषेतील एक कथालेखक व कादंबरीकार होते.कादंबरी, कथा, नाटक, व्यक्तिचित्रण, आत्मचरित्र अशा विविध वाङ्मयप्रकारांत लेखन केलेल्या पेंडसेंची मराठी साहित्यात ओळख आहे ती कादंबरीकार म्हणूनच श्री.ना.पेंडसे यांची ‘जीवनकला’ ही पहिली कथा १९३८ मधे प्रसिद्ध झाली. नंतर काही व्यक्तिचित्रे त्यांनी लिहिली. ‘खडकावरील हिरवळ’ हे त्यांचे व्यक्तिचित्रणात्मक पुस्तक १९४१ साली प्रकाशित झाले. हे त्यांचे प्रकाशित झालेले पहिले आणि शेवटचे व्यक्तिचित्रणात्मक पुस्तक.

जागतिक दिवस


 • जागतिक जलजीवन दिवस.

ठळक घटना/घडामोडी


 • -

जन्म/वाढदिवस


 • १२१२: गो-होरिकावा, जपानी सम्राट.
 • १४५९: मॅक्सिमिलियन पहिला, पवित्र रोमन सम्राट.
 • १५०३: अँतोनियो फ्रांसेस्को ग्राझिनी, इटालियन लेखक.
 • १६०९: जॉन दुसरा कॅसिमिर, पोलंडचा राजा.
 • १७१२: एडवर्ड मूर, इंग्लिश लेखक.
 • १७५९: हेडविग एलिझाबेथ शार्लोट, स्वीडन व नॉर्वेची राणी.
 • १७९७: विल्हेल्म पहिला, जर्मनीचा राजा.
 • १८१७: ब्रॅक्स्टन ब्रॅग, कॉन्फेडरेट सेनापती.
 • १८५७: पॉल डुमेर, फ्रांसचा राष्ट्राध्यक्ष.
 • १८६८: रॉबर्ट मिलिकेन, नोबेल पारितोषिक विजेता अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ.
 • १८६९: एमिलियो अग्विनाल्डो, फिलिपाईन्सचा पहिला राष्ट्राध्यक्ष.
 • १९०८: लुई लामूर, अमेरिकन लेखक.
 • १९१८: छेदी जगन, गयानाचा राष्ट्राध्यक्ष.
 • १९२३: मार्सेल मार्सू, फ्रेंच मूक-कलाकार.
 • १९३१: बर्टन रिश्टर, नोबेल पारितोषिक विजेता अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ.
 • १९३१: विल्यम शॅटनर, इंग्लिश चित्रपट अभिनेता.
 • १९३३: अबोलहसन बनीसद्र, इराणचा राष्ट्राध्यक्ष.
 • १९३४: ओरिन हॅच, अमेरिकेचा सेनेटर.
 • १९५५: व्हाल्दिस झॅटलर्स, लात्व्हियाचा राष्ट्राध्यक्ष.

मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन


 • १९८४: प्रभाकर आत्माराम पाध्ये, मराठी पत्रकार, लेखक.
 • २००७: श्रीपाद नारायण पेंडसे, मराठी साहित्यिक.