२१ मार्च दिनविशेष

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | २१ मार्च २०१८
२१ मार्च दिनविशेष | March 21 in History
बिस्मिल्ला ख़ॉं. छायाचित्र: मराठीमाती डॉट कॉम आर्काईव्ह

बिस्मिल्ला ख़ॉं - (२१ मार्च १९१६ - २१ ऑगस्ट २००६) हे ख्यातनाम भारतीय सनईवादक होते.बिस्मिल्ला ख़ॉं यांच्या जीवनावर एक लघुपट आहे. डॉ. के. प्रभाकर यांनी तो दिग्दर्शित केला आहे.

जागतिक दिवस


 • जागतिक वनदिन.
 • विश्व वंशभेद निर्मूलन दिवस.
 • पृथ्वी दिन.
 • सलोखा दिन: ऑस्ट्रेलिया.
 • मातृ दिन: इजिप्त, लेबेनॉन, जॉर्डन.
 • स्वातंत्र्य दिन: नामिबिया.
 • मानवी हक्क दिन: दक्षिण आफ्रिका.
 • वंशभेद निर्मूलन दिन: संयुक्त राष्ट्रे.

ठळक घटना/घडामोडी


 • १४२१: बीग युद्धात इंग्रजांचा फ्रेंचांकडून पराभव.
 • १४९२: अलोंझो पेट्रो हा खलाशी कोलंबससोबत सागरसफरीला निघाला.
 • १६१०: राजा जेम्स प्रथम याचे इंग्लंडच्या लोकसभेला उद्देशून भाषण.
 • १६९७: झार पीटर महान यांच्या पश्चिम युरोप दौऱ्याची सुरुवात.
 • १७८८: गुस्टास व्हेसा यांची चार्लोट राणीकडे आफ्रिकन गुलामांना मुक्त करण्याची याचिका.
 • १७९०: थॉमस जेफरसन यांनी राष्ट्रपती जॉर्ज वॉशिंग्टन यांच्याकडे न्युयॉर्क येथे राज्याचे सचिव म्हणून पदभार स्वीकारला.
 • १८०४: नेपोलियनचा फ्रेंच नागरी कायदा स्वीकृत.
 • १८५१: कॅलिफोर्नियामध्ये योसेमिटी दरीचा शोध लागला.
 • १८५७: जपानची राजधानी टोक्योत भूकंप. १,०७,००० ठार.
 • १८५९: एडिनबर्ग येथे स्कॉटिश नॅशनल गॅलरीची स्थापना.
 • १८५९: झूऑलॉजिकल सोसायटी ऑफ फिलाडेल्फिया ही अमेरिकेतील पहिली प्राणिशास्त्रीय संघटनेची स्थापना.
 • १८६०: अमेरिकेचा स्वीडन सोबत हस्तांतरण करार.
 • १८६४: लुईझियाना मधील हेंडरसन पर्वतावर युद्ध.
 • १८६६: राष्ट्रीय सैनिक निवासांना अमेरिकन काँग्रेसची मान्यता.
 • १८६८: सोरोसिस या अमेरिकेतील पहिल्या व्यावसायिक महिला क्लबची न्यूयॉर्क येथे स्थापना.
 • १८८५: फेरीच्या दुसऱ्या फ्रेंच सरकारचा राजीनामा.
 • १८८८: लंडन येथे आर्थर पिनेरो यांच्या स्वीट लव्हेंडर चा पहिला खेळ.
 • १८९०: ऑस्ट्रियन ज्यू समाजाला कायदेशीर मान्यता.
 • १९०९: अमेरिकेचे मोरान व मॅकफरलॅण्ड युरोपच्या पहिल्या सहा दिवसीय सायकल स्पर्धेचे विजेते.
 • १९१८: पहिले महायुद्ध - सॉमची दुसरी लढाई सुरू.
 • १९२५: एडिनबर्गमधील मरेफिल्ड क्रीडांगणाचे उद्घाटन.
 • १९२५: इराणने खोर्शिदी सौर हिज्राह दिनदर्शिका स्वीकारली.
 • १९३३: अ‍ॅडॉल्फ हिटलर, गोरिंग, ब्रुनिंग व जर्मन सैन्याच्या इतर उच्च अधिकाऱ्यांची बर्लिन येथे बैठक.
 • १९४०: पॉल रेनॉ फ्रांसच्या पंतप्रधानपदी.
 • १९५८: सोवियेत संघाची वातावरणीय अण्वस्त्र चाचणी.
 • १९६२: स्वनातीत गतीने प्रवास करणारा अस्वल हा पहिला प्राणी.
 • १९६८: इस्रायली सैन्याने पॅलेस्टिनी मुक्ती संघटनेवरील हल्ल्यासाठी जॉर्डन नदी ओलांडली.
 • १९६९: अमेरिकेची नेव्हाडा केंद्रावर अण्वस्त्र चाचणी.
 • १९७१: क्रिकेट खेळात जॉर्जटाऊन येथे भारताच्या सुनील गावस्करचे त्याच्या विक्रमी ३४ कसोटी शतकांपैकी पहिलेवहिले शतक, ११६ धावा.
 • १९८०: अमेरिकेने सोवियेत संघाच्या मॉस्को शहरात होऊ घातलेल्या बाविसाव्या ऑलिंपिक खेळांवर बहिष्कार टाकला.
 • १९९०: नामिबिया दक्षिण आफ्रिकेपासून स्वतंत्र झाले; सॅम नुजाना राष्ट्राध्यक्ष.
 • १९९१: अमेरिकन नौदलाच्या दोन पाणबुडीविरोधी विमानांच्या टकरीत २७ जण समुद्रात बेपत्ता.
 • १९९३: डन्स स्कोट्सला पोप जॉन पॉल द्वितीयने संतपद बहाल केले.
 • २००५: मिनेसोटाच्या रेड लेक गावातील हायस्कूलमध्ये एका विद्यार्थ्याने १० व्यक्तींना गोळ्या घालून ठार मारले.

जन्म/वाढदिवस


 • १८५४: ऍलिक बॅनरमन, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
 • १९१६: बिस्मिल्ला ख़ॉं, भारतीय सनईवादक.
 • १९४६: टिमोथी डाल्टन, इंग्लिश अभिनेता.
 • १९७८: राणी मुखर्जी, भारतीय अभिनेत्री.

मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन


 • १६१७: पोकाहोन्टास, मूळ अमेरिकन स्त्री, पोव्हाटनची मुलगी.
 • १८४३: ग्वादालुपे व्हिक्टोरिया, मेक्सिकोचा पहिला राष्ट्राध्यक्ष.