१९ मार्च दिनविशेष

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | १९ मार्च २०१८
१९ मार्च दिनविशेष | March 19 in History
अटलबिहारी वाजपेयी. छायाचित्र: मराठीमाती डॉट कॉम आर्काईव्ह

अटलबिहारी वाजपेयी - (२५ डिसेंबर १९२४) हे माजी भारतीय पंतप्रधान आणि हिंदी कवी आहेत. ते १९९१ ते २००९ दरम्यान भारतीय जनता पक्षाचे लखनौ येथील खासदार होते. केवळ १३ दिवस टिकलेल्या ११ व्या लोकसभेत तसेच त्यानंतरच्या १२ व्या लोकसभेत (१९ मार्च १९९८ ते १९ मे २००४) ते पंतप्रधान होते. यासोबतच त्यांनी जनसंघाचे संस्थापक सदस्य, भारतीय जनसंघाचे अध्यक्ष (१९६८-१९७३), जनसंघाच्या संसदीय दलाचे नेते (१९५५-१९७७), जनता पक्षाचे संस्थापक सदस्य (१९७७-१९८०), भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष (१९८०-१९८६) आणि भारतीय जनता पक्ष संसदीय दलाचे नेते (१९८०-१९८४, १९८६, १९९३-१९९६), ११ व्या लोकसभेतील विरोधी पक्षाचे नेते तसेच २४ मार्च १९७७ ते २८ जुलै १९७९ दरम्यान भारतीय परराष्ट्रमंत्री ही पदे भूषविली आहेत.

जागतिक दिवस


 • -

ठळक घटना/घडामोडी


 • १९९८: भारताचे पंतप्रधानम्हणून अटलबिहारी वाजपेयी यांचा शपथविधी.
 • २००२: अफगाणिस्तानमध्ये ऑपरेशन ॲनाकाँडा सुरू. ५०० तालिबान व अल कायदा सैनिक तर मित्र राष्ट्रांचे ११ सैनिक मृत्युमुखी.
 • २००४: आनाकोस्की, फिनलंड शहरात बस व ट्रकची धडक. २४ ठार, १३ जखमी.
 • २००४: तैवानच्या राष्ट्राध्यक्ष चेन शुइ-बियान वर हल्ला.
 • २०१३: राष्ट्रीय महामार्ग १७वरील खेडजवळ जगबुडी नदीवरील पुलावरुन बस नदीपात्रात कोळून ३७ ठार, १५ जखमी.

जन्म/वाढदिवस


 • १८१३: डेव्हिड लिविंग्स्टन, स्कॉटलंडचा शोधक व धर्मप्रसारक.
 • १८४८: वायट अर्प, अमेरिकन पोलिस अधिकारी.
 • १८४९: आल्फ्रेड फोन टिर्पिट्झ, जर्मनीचा दर्यासारंग.
 • १८६०: विल्यम जेनिंग्स ब्रायन, अमेरिकेचा ४१वा परराष्ट्रसचिव.
 • १८७१: शोफिल्ड हे, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
 • १८८३: वॉल्टर हॅवोर्थ, नोबेल पारितोषिक विजेता इंग्लिश रसायनशास्त्रज्ञ.
 • १८८३: जोसेफ स्टिलवेल, अमेरिकेचा सेनापती.
 • १८८९: मनुएल दुसरा, पोर्तुगालचा राजा.
 • १९००: फ्रेडरिक जोलियो, नोबेल पारितोषिक विजेता फ्रेंच भौतिकशास्त्रज्ञ.
 • १९०५: आल्बर्ट स्पीयर, नाझी अधिकारी.
 • १९०६: आडोल्फ आइकमन, नाझी अधिकारी.
 • १९३७: एगॉन क्रेंझ, पूर्व जर्मनीचा राष्ट्राध्यक्ष.
 • १९४३: मारियो जे. मोलिना, नोबेल पारितोषिक विजेता मेक्सिकोचा रसायनशास्त्रज्ञ.
 • १९४४: सैद मुसा, बेलीझचा पंतप्रधान.
 • १९५२: वॉरेन लीस, न्यू झीलँडचा क्रिकेट खेळाडू.
 • १९५४: इंदू शहानी, भारतीय शिक्षणतज्ञ.
 • १९५६: येगोर गैदार, रशियन राजकारणी व अर्थशास्त्रज्ञ.
 • १९८४: तनुश्री दत्ता, हिंदी चित्रपट अभिनेत्री.

मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन


 • -