१८ मार्च दिनविशेष

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | १८ मार्च २०१८
१८ मार्च दिनविशेष | March 18 in History
शशी कपूर. छायाचित्र: मराठीमाती डॉट कॉम आर्काईव्ह

शशी कपूर - ( १८ मार्च १९३८ - ४ डिसेंबर २०१७) हे हिंदी चित्रपटसृष्टीतले एक अभिनेते आणि दिग्दर्शक होते. त्यांचे वडील पृथ्वीराज कपूर आणि मोठे बंधू राज कपूर यांच्यामुळे त्यांच्या घरात पहिल्यापासून सिनेमा होताच.शशी कपूर यांचे खरे नाव बलबीरराज कपूर होते. त्यांचे शिक्षण मुंबईत डॉन बॉस्को शाळेत झाले. त्यांनी १९४० पासून बालकलाकार म्हणून चित्रपटांत काम करायला सुरुवात केली. १९४०मध्ये शशीराज, १९४१मध्ये मीना आणि १९४५मध्ये बचपन या चित्रपटांत त्यांनी काम केले. त्यांतील महत्त्वाचे चित्रपट म्हणजे १९४८मध्ये आलेला आग आणि १९५१मध्ये आलेला आवारा. १९४० ते १९५४ या काळात त्यांनी १९ चित्रपटांत बालकालाकार म्हणून काम केल्यानंतर १९६१मध्ये आलेल्या धर्मपुत्र या चित्रपटात त्यांना नायकाची भूमिका मिळाली. त्यांनी आयुष्यभरात सुमारे ११६ सिनेमांमध्ये काम केले, त्यांपैकी तब्बल ६१ सिनेमांमध्ये त्यांनी मुख्य भूमिका साकारल्या.२०११मध्ये त्यांना भारत सरकारने पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित केले होते. २०१५मध्ये त्यांना दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. याआधी त्यांचे वडील पृथ्वीराज कपूर आणि बंधू राज कपूर यांनाही हा सन्मान मिळाला होता. चित्रपट सृष्टीतील हा महत्त्वाचा सन्मान मिळवणारे कपूर परिवारातील ते तिसरे सदस्य ठरले होते.

जागतिक दिवस


  • -

ठळक घटना/घडामोडी


  • ३७: रोमन सेनेटने सीझर तिबेरियसचे मृत्यूपत्र अवैध ठरवले व कालिगुलाची सीझर पदी नियुक्ती केली.
  • १९२२: महात्मा गांधींना असहकार आंदोलनाबद्दल ६ वर्षे तुरुंगवास.

जन्म/वाढदिवस


  • १९३८: शशी कपूर हिंदी चित्रपट अभिनेता.

मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन


  • २००१: विश्वनाथ नागेशकर, भारतीय,गोवेकर चित्रकार.