१७ मार्च दिनविशेष

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | १७ मार्च २०१८
१७ मार्च दिनविशेष | March 17 in History
विष्णुशास्त्री चिपळूणकर. छायाचित्र: मराठीमाती डॉट कॉम आर्काईव्ह

विष्णुशास्त्री चिपळूणकर - (२० मे १८५० - १७ मार्च १८८२) हे मराठी निबंधकार, लेखक, पत्रकार, देशभक्त होते. त्यांचे वडील कृष्णशास्त्री चिपळूणकर हेदेखील नामवंत लेखक होते.त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण पुण्यातील पूना कॉलेज व डेक्कन कॉलेज या महाविद्यालयांमध्ये झाले. १८७१ साली चिपळूणकरांनी पदवीचा अभ्यासक्रम पुरा केला. विष्णुशास्त्री यांनी इतिहास, अर्थशास्त्र, तर्कशास्त्र व नीतिशास्त्र या विषयांचा तसेच इंग्रजी, संस्कृत व मराठी या भाषांतील उत्तमोत्तम ग्रंथाचा सखोल अभ्यास केला होता. बी.ए. होण्यापूर्वी विष्णुशास्त्री आपल्या वडिलांच्या ’शालापत्रक’ या मासिकाचे कामकाज पहात असत. शालापत्रकातून केलेल्या ब्रिटिश सरकारचे धोरण व ख्रिश्चन मिशनरी यांवरील टीकेमुळे, ते मासिक ब्रिटिशांनी इ.स.१८७५मध्ये बंद पाडले. पण त्यापूर्वीच विष्णुशास्त्री चिपळूणकरांनी एकहाती मजकूर असलेले निबंधमाला हे मासिक (पहिला अंक : २५ जानेवारी १८७४) सुरू केले होते. ते सात वर्षे अखंड चालले.

जागतिक दिवस


 • सेंट पॅट्रिक दिन:आयर्लंड.

ठळक घटना/घडामोडी


 • १९६९: गोल्डा मायर या इस्त्रायलच्या पहिल्या महिला पंतप्रधान बनल्या.

जन्म/वाढदिवस


 • १२३१: शिजो, जपानी सम्राट.
 • १४७३: जेम्स चौथा, स्कॉटलंडचा राजा.
 • १८२०: जीन इंगेलो, इंग्लिश कवी.
 • १८३४: गॉटलीब डाइमलर, जर्मनीचा अभियंता.
 • १९२०: शेख मुजीबुर रहमान, बांगलादेशचा राष्ट्राध्यक्ष.
 • १९२६: सीगफ्रीड लेन्झ, जर्मन लेखक.
 • १९४५: मायकेल हेडन, सी.आय.ए. चा निदेशक.

मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन


 • १८०: मार्कस ऑरेलियस, रोमन सम्राट.
 • १०४०: हॅरोल्ड द हेरफूट, इंग्लंडचा राजा.
 • १०५८: लुलाच, स्कॉटलंडचा राजा.
 • १२७२: गो-सागा, जपानी सम्राट.
 • १५१६: जुलियानो दि लोरेंझो दे मेदिची, फ्लोरेंसचा राजा.
 • १६८०: फ्रांस्वा दि ला रोशेफूकॉल्ड, फ्रेंच लेखक.
 • १७४१: ज्याँ-बॅप्टिस्ट रॉसू, फ्रेंच कवी.
 • १८४९: विल्यम दुसरा, नेदरलँड्सचा राजा.
 • १८८२: विष्णुशास्त्री चिपळूणकर, आधुनिक मराठी गद्याचे जनक, ग्रंथकार.
 • १९५६: आयरिन जोलिये-क्युरी, फ्रेंच भौतिकशास्त्रज्ञ.
 • १९५७: रमोन मॅग्सेसे, फिलिपाईन्सचा राष्ट्राध्यक्ष.