१६ मार्च दिनविशेष

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | १६ मार्च २०१८
१६ मार्च दिनविशेष | March 16 in History
गणेश सावरकर. छायाचित्र: मराठीमाती डॉट कॉम आर्काईव्ह

गणेश सावरकर - ( १३ जून १८७९ - १६ मार्च १९४५) हे भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील एक महत्त्वपूर्ण व्यक्तिमत्त्व होते.सावरकर घराणे मूळचे महाराष्ट्र राज्याच्या रत्‍नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यात असलेल्या गुहागर पेट्यामधील पालशेत येथील होते. त्या परिसरातील सांवरीच्या झाडांवरून काही जणांना सांवरवाडीकर म्हणून ओळखले जाऊ लागले. कालांतराने सांवरवाडीकर चे सावरकर झाले. पुढे कामानिमित्त काही मंडळी कोकण सोडून घाटावर स्थाईक झाली. बाळाजी बाजीराव पेशवे यांच्या काळात केलेल्या पराक्रमामुळे पेशव्यांनी नारायण दीक्षित (सावरकर) आणि त्यांचे स्नेही धोपावकर यांना नाशिक जिल्ह्यातील भगूर गावाच्या जवळ असलेल्या राहुरी गावाची जहागीर दिली. घाटावर स्थाईक झालेल्या सावरकर घराण्यातील नारायण दीक्षित (सावरकर) यांच्यापासून दामोदरपंत सावरकर हे सातव्या पिढीतील वंशज होते. दामोदरपंतांचे शिक्षण मॅट्रिकपर्यंत झाले होते. भगूर परिसरात त्यांच्या इतके शिकलेले अन्य कोणीही नसल्याने त्यांना विशेष मान होता. पिढीजात जहागीर सांभाळणे आणि सावकारी हे त्यांचे व्यवसाय होते.

जागतिक दिवस


 • -

ठळक घटना/घडामोडी


 • १८१५: विल्यम पहिल्याने स्वतःला नेदरलँड्सचा राजा घोषित केले.
 • १८१८: कांचा रायादाची लढाई - होजे दि सान मार्टिनच्या स्पॅनिश सैन्याने चिलीचा पराभव केला.
 • १९२६: रॉबर्ट गॉडार्डने पहिले द्रव-इंधनचालित रॉकेट प्रक्षेपित केले.
 • १९४५: दुसरे महायुद्ध - रॉयल एअर फोर्सने तुफानी बॉम्बफेक करून जर्मनीच्या वुर्झबर्ग शहराचा २० मिनीटांत विनाश केला.
 • १९६२: १०७ प्रवासी असलेले सुपर कॉन्स्टेलेशन प्रकारचे विमान पॅसिफिक महासागरात गायब झाले.
 • १९६३: बाली बेटावरील माउंट अगुंग या ज्वालामुखीचा उद्रेक. ११,००० ठार.
 • १९६८: व्हियेतनाम युद्ध-माय लाईची कत्तल - अमेरिकेच्या सैन्याने ३५० ते ५०० व्हियेतनामी नागरिकांची हत्या केली.
 • १९६९: व्हेनेझुएलाच्या माराकैबो विमानतळावर डी.सी. ९ प्रकारचे विमान उड्डाण करताच कोसळले.
 • १५५ ठार.
 • १९७६: युनायटेड किंग्डमच्या पंतप्रधान हॅरोल्ड विल्सनने राजीनामा दिला.
 • १९७८: तेलवाहू जहाज अमोको कॅडिझ फ्रांसच्या किनाऱ्याजवळ खडकांवर आदळले. काही वेळाने या प्रचंड जहाजाचे दोन तुकडे झाले.
 • १९८८: इराकने हलाब्जा या कुर्दिस्तानमधील शहरावर विषारी वायुने हल्ला केला. हजारो मृत्युमुखी.
 • १९९३: अमेरिकेच्या पूर्व किनाऱ्यावर प्रचंड हिमवादळ. १८४ ठार.
 • १९९५: अमेरिकेच्या मिसिसिपी राज्याने अधिकृतरीत्या गुलामगिरीची प्रथा बेकायदा ठरवली.
 • १९९८: दुसऱ्या महायुद्धाच्या काळात ज्यूंचे शिरकाण सुरू असताना त्याविरुद्ध आवाज न उठवल्याबद्दल पोप जॉन पॉल दुसऱ्याने ख्रिश्चन धर्मीयांच्या वतीने जाहीर माफी मागितली.
 • २००५: सम्राट कनिष्क या एर इंडियाच्या विमानावर बॉम्बहल्ला करून ३२९ प्रवासी व कर्मचाऱ्यांना मारल्याच्या आरोपातून रिपुदमनसिंग मलिक व अजायबसिंग बागरी यांची कॅनडाच्या न्यायालयाने सुटका केली.
 • २००७: २००७च्या विश्वचषक स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेच्या हर्शल गिब्सने नेदरलँड्सच्या डान व्हान बुंगेच्या एका षटकात ६ षटकार मारले. हा विश्वचषक तसेच एकदिवसीय सामन्यांच्या इतिहासातील उच्चांक आहे.

जन्म/वाढदिवस


 • १७५१: जेम्स मॅडिसन, अमेरिकेचा चौथा राष्ट्राध्यक्ष.
 • १७८९: गेऑर्ग झिमॉन ओम, जर्मन भौतिकशास्त्रज्ञ.
 • १८००: निंको, जपानी सम्राट.
 • १८७७: मोहम्मद रझा शाह पेहलवी, इराणचा शहा.
 • १९४१: रॉबर्ट ग्वेई, कोटे दि'आयव्होरचा हुकुमशहा.
 • १९५९: जेन्स स्टोल्टेनबर्ग, नॉर्वेचा पंतप्रधान.

मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन


 • ४५५: व्हॅलेन्टिनियन तिसरा, रोमन सम्राट.
 • १९४५: गणेश दामोदर सावरकर, भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील एक महत्त्वपूर्ण व्यक्तिमत्त्व.