१५ मार्च दिनविशेष

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | १५ मार्च २०१८
१५ मार्च दिनविशेष | March 15 in History
बापूराव पेंढारकर. छायाचित्र: मराठीमाती डॉट कॉम आर्काईव्ह

बापूराव पेंढारकर - (१० डिसेंबर १८९२ - १५ मार्च १९३७) हे मराठी रंगभूमीवर स्त्रीभूमिका करणारे प्रसिद्ध नट, गायक आणि वादक होते. बापूराव हे केशवराव भोसले ह्यांनी स्थापन केलेल्या ललित कलादर्श ह्या नाट्यसंस्थेचे अध्वर्यू होते.केशवराव भोसले यांनी स्थापन केलेल्या ललित कलादर्श या नाट्यसंस्थेचे कार्य बापूराव पेंढारकर आणि त्याच्या नंतर भालचंद्र पेंढारकर यांनी पुढे चालू ठेवले. त्यांना या कामात अनेक वेळा आर्थिक समस्यांनी ग्रासले, पण त्यांनी ललित कलादर्शचे काम तडफेने पुढे चालूच ठेवले.

जागतिक दिवस


 • आंतरराष्ट्रीय ग्राहक दिन
 • नियोजन दिन
 • जागतिक अपंगत्व दिन

ठळक घटना/घडामोडी


 • ४४: रोमन सेनेटमध्ये मार्कस जुनियस ब्रुटस डेसिमस जुनियस ब्रुटस व इतर सेनेटरांनी जुलियस सीझरची हत्या केली.
 • १५४५: ट्रेंटच्या समितीची पहिली बैठक.
 • १७८१: अमेरिकन क्रांती - उत्तर कॅरोलिना राज्यातील सध्याच्या ग्रीनबोरो शहराजवळ चार्ल्स कॉर्नवॉलिसच्या १,९०० ब्रिटीश सैनिकांनी ४,४०० अमेरिकन सैनिकांना हरवले.
 • १८२०: मेन अमेरिकेचे २३वे राज्य झाले.
 • १८२७: टोरोंटो विद्यापीठाची स्थापना.
 • १८३१: मराठीतील पहिले पंचाग छापले गेले.
 • १८७७: इंग्लंड व ऑस्ट्रेलियात पहिला क्रिकेट कसोटी सामना सुरू झाला.
 • १९०६: रोल्स रॉइस कंपनीची स्थापना.
 • १९१६: अमेरिकेने मेक्सिकोच्या क्रांतिकारी पांचो व्हियाला पकडण्यासाठी आपले १२,००० सैनिक मेक्सिकोत घुसवले.
 • १९१७: रशियाच्या झार निकोलस दुसर्‍याने सिंहासन सोडले.
 • १९२२: फ्वाद पहिला इजिप्तच्या राजेपदी.
 • १९२६: थियोडोरोस पँगालोसची ग्रीसच्या राष्ट्राध्यक्षपदी बिनविरोध निवड.
 • १९३९: दुसरे महायुद्ध - जर्मनीने उरलेले चेकोस्लोव्हेकिया गिळंकृत केले.
 • १९४३: दुसरे महायुद्ध-खार्कोव्हची लढाई - खार्कोव्ह शहर परत जर्मनीच्या ताब्यात.
 • १९४४: दुसरे महायुद्ध-मॉँते कॅसिनोची लढाई - दोस्त राष्ट्रांनी मॉँते कॅसिनोच्या मठावर तुफान बॉम्बफेक केली व नंतर हल्ला चढवला.
 • १९५२: रियुनियन बेटावरील सिलाओस गावात आजच्या एका दिवसात १,८७० मिलिमीटर (७३ इंच) इतका उच्चांकी पाउस पडला.
 • १९६१: दक्षिण आफ्रिकाने ब्रिटीश राष्ट्रकुलातून अंग काढून घेतले.
 • १९९०: मिखाईल गोर्बाचेव्ह सोवियेत संघाच्या राष्ट्राध्यक्षपदी.
 • १९९०: सोवियेत संघाने लिथुएनियाचे स्वातंत्र्य नाकारले.
 • १९९१: सोवियेत संघ, मिखाईल गोर्बाचेव्ह व दोस्त राष्ट्रांनी जर्मनीवरील आपला हक्क सोडला. जर्मनीला अधिकृतरीत्या स्वातंत्र्य.

जन्म/वाढदिवस


 • १६३८: शुंझी, चीनी सम्राट.
 • १७६७: अँड्र्यू जॅक्सन, अमेरिकेचा ७वा राष्ट्राध्यक्ष.
 • १७७९: विल्यम लॅम्ब, युनायटेड किंग्डमचा पंतप्रधान.
 • १९२०: आर. फ़्रान्सिस, हॉकीपटू.

मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन


 • ४४: जुलियस सीझर, रोमन सम्राट.
 • ४९३: ओड्वासर, इटलीचा राजा.
 • ११४५: पोप लुशियस दुसरा.
 • १९३७: व्यंकटेश बळवंत पेंढारकर, मराठी नाट्य-अभिनेते, गायक.
 • १९७५: एरिस्टॉटल ओनासिस, ग्रीक उद्योगपती.
 • १९९८: डॉ. बेन्जामिन स्पॉक, अमेरिकन बालरोगतज्ञ.
 • २००६: जॉर्ज रॅलिस, ग्रीसचा पंतप्रधान.