१३ मार्च दिनविशेष

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | १३ मार्च २०१८
१३ मार्च दिनविशेष | March 13 in History
नाना फडणवीस. छायाचित्र: मराठीमाती डॉट कॉम आर्काईव्ह

नाना फडणवीस - ( १२ फेब्रुवारी १७४२ - १३ मार्च १८००) पेशव्यांच्या दरबारी असणारे मराठा साम्राज्यातील मुत्सद्दी होते. पेशवाईतील साडेतीन शहाण्यांपैकी हे अर्धे शहाणे समजले जात.नाना फडणवीस यांचे मूळ घराणे कोकणातल्या रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन येथील होते. त्यांचा जन्म १२ फेब्रुवारी १७४२ रोजी सातारा येथे झाला. बालवयातच नानासाहेब पेशव्यांच्या सान्निध्यात आल्यामुळे राज्यकारभाराचे शिक्षण त्यांना मिळाले. वयाच्या २० व्या वर्षी थोरल्या माधवरावांकडून त्यांना फडणिशीची वस्त्रे मिळाली. एवढे मोठे पद नानांनी आपल्या कर्तृत्वाने आणि मुत्सद्दीपणाने सांभाळले.आपल्या चातुर्याच्या बळावर नानांनी राजकीय घडी बसवलीच होती पण त्यांची कामाची तडफ, त्यांच्या वागण्यातला समतोलपणा या बरोबरच पेशवाई आणि राजसत्तेचा दबदबा आणि दरारासुद्धा त्यांनी वाढवला. इंग्रजांचा पाडाव करण्यातही ते यशस्वी झाले.

जागतिक दिवस


  • -

ठळक घटना/घडामोडी


  • ४८३: संत फेलिक्स पोपपदी.
  • १८५४: नागपूर रियासतीची समाप्ती झाली.
  • १९२८: कुमारी नॅन्सी मिलरचा हिंदू धर्मात प्रवेश झाला.
  • १९६३: अर्जुन पुरस्कार याच सुरुवात.
  • १९९७: कोलकात्यातील मिशनरीज् ऑफ चॅरिटीने मदर तेरेसांची वारस म्हणून सिस्टर निर्मला यांची निवड केली.

जन्म/वाढदिवस


  • १९२६: रविंद्र पिंगे, मराठी लेखक.

मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन


  • १८००: नाना फडणवीस, पेशवे दरबारातील एक मंत्री.
  • १९६९: मोहिनीराज लक्ष्मण दत्तात्रेय,भारतीय गणितशास्त्रज्ञ.