१२ मार्च दिनविशेष

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | १२ मार्च २०१८
१२ मार्च दिनविशेष | March 12 in History
यशवंतराव चव्हाण. छायाचित्र: मराठीमाती डॉट कॉम आर्काईव्ह

यशवंतराव चव्हाण - (१२ मार्च १९१३ - २५ नोव्हेंबर १९८४) हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. त्यांनी काही काळ भारताचे उपपंतप्रधान म्हणून काम केले होते. तर काही काळ ते भारताचे संरक्षणमंत्री सुद्धा होते. यशवंतराव बळवंतराव चव्हाण यांचा जन्म१२ मार्च, १९१३ रोजी सांगली जिल्ह्यातील देवराष्ट्रे या गावी झाला. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री व महाराष्ट्राचे शिल्पकार म्हणून ते ओळखले जातात. ते प्रागतिक विचारसरणीचे होते. उत्कृष्ट संसदपटू, उदारमतवादी व अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ख्याती आहे. ते रसिक व साहित्यिकही होते. “युगांतर”, “सह्याद्रीचे वारे”, “कृष्णाकाठ”, “ऋणानुबंध” ही त्यांची साहित्यसंपदा आहे.

जागतिक दिवस


 • राष्ट्र दिन: मॉरिशियस.
 • समता दिन: महाराष्ट्र.

ठळक घटना/घडामोडी


 • १९१८: रशियाने आपली राजधानी सेंट पीटर्सबर्गहून मॉस्कोला हलवली.
 • १९२८: कॅलिफोर्नियातील सेंट फ्रांसिस धरण फुटून आलेल्या पुरात ४०० मृत्युमुखी.
 • १९३०: ब्रिटीश सरकारने भारतात तयार केलेल्या मीठावर लादलेल्या कराविरुद्ध महात्मा गांधींनी दांडी यात्रा सुरू केली.
 • १९३८: जर्मनीचे सैन्य ऑस्ट्रियात घुसले.
 • १९४०: फिनलंडने सोवियेत संघाशी तह करून फिनिश कारेलिया देउन टाकले व आपले सैन्य व जनता तेथून हलवली.
 • १९५८: सुप्रसिध्द गायिकांजनी मालपेकर यांना ‘संगीत नाटक पुरस्कार’ मिळाला.
 • १९६०: दक्षिण कोरियाच्या पुसान शहरातील रसायन कारखान्याला आग. ६८ ठार.
 • १९६७: सुहार्तो इंडोनेशियाच्या राष्ट्राध्यक्षपदी.
 • १९६८: मॉरिशसला युनायटेड किंग्डमपासून स्वातंत्र्य.
 • १९९२: मॉरिशस प्रजासत्ताक राष्ट्र झाले.
 • १९९३: मुंबईत १२ ठिकाणी बॉम्बस्फोट. ३०० ठार (अधिकृत आकडा), हजारो जखमी.
 • १९९९: चेक प्रजासत्ताक, हंगेरी व पोलंड युरोपीय संघात दाखल.
 • २००३: सर्बियाच्या पंतप्रधान झोरान डिंडिकची हत्या.
 • २००४: दक्षिण कोरियाच्या राष्ट्राध्यक्ष रोह मू-ह्युनवर तेथील संसदेने महाभियोग सुरू केला.
 • २००६: क्रिकेटच्या एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियाने केलेल्या ४३४ धावांना दक्षिण आफ्रिकेचा ९ बाद ४३८ असे उच्चांकी प्रत्युत्तर.

जन्म/वाढदिवस


 • १९१३: यशवंतराव चव्हान जन्म.
 • १८२१: सर जॉन ऍबट, कॅनडाचा तिसरा पंतप्रधान.
 • १८८१: मुस्तफा कमाल अतातुर्क, तुर्कस्तानचा पहिला राष्ट्राध्यक्ष.

मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन


 • ६०४: पोप ग्रेगोरी पहिला.
 • १३७४: गो-कोगोन, जपानी सम्राट.
 • १४४७: शाह रुख, पर्शियाचा राजा.
 • १८८९: योहानेस चौथा, इथियोपियाचा सम्राट.
 • १९८०: वसंतराव आचरेकर, सुप्रसिध्द तबलावादक.
 • १९९९: यहूदी मेनुहिन, अमेरिकन-ब्रिटीश संगीतकार.
 • २००१: रॉबर्ट लुडलुम, अमेरिकन लेखक.
 • २००३: झोरान डिंडिक, सर्बियाचा पंतप्रधान.