११ मार्च दिनविशेष

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | ११ मार्च २०१८
११ मार्च दिनविशेष | March 11 in History
आनंदीबाई जोशी. छायाचित्र: मराठीमाती डॉट कॉम आर्काईव्ह

आनंदीबाई जोशी - (३१ मार्च १८६५ - २७ फेब्रुवारी १८८७) ११ मार्च १८८६ रोजी पहिल्या भारतीय महिला डॉक्टर आनंदीबाई जोशी यांना ‘डॉक्टर’ ही पदवी मिळाली. एम.डी. साठी त्यांनी जो प्रबंध सादर केला त्याचा विषय होता, ‘हिंदू आर्य लोकांमधील प्रसूतिशास्त्र’. एम.डी. झाल्यावर व्हिक्टोरिया राणीकडूनसुद्धा त्यांचे अभिनंदन झाले होते.

जागतिक दिवस


 • -

ठळक घटना/घडामोडी


 • ४१७: पोप झोसिमस रोमच्या बिशपपदी.
 • ८४३: अया सोफिया कॉन्स्टॅन्टिनोपलमध्ये मूर्तिपुजा अधिकृतरित्या पुनर्स्थापित.
 • १३०२: शेक्सपिअरच्या नाटकातील रोमिओ व ज्युलियट यांचा विवाहदिन.
 • १५०२: पर्शियाच्या शाह इस्माईल, पहिल्याचा तब्रिझमध्ये राज्याभिषेक.
 • १५१३: जियोव्हानी दि मेदिची पोप लिओ दहावा नावाने पोपपदी.
 • १६६५: न्यूयॉर्कमध्ये प्रोटेस्टंट पथींयांना धार्मिक अधिकार बहाल.
 • १६६९: इटलीत एटना ज्वालामुखीचा उद्रेक, १५,००० ठार.
 • १७०२: पहिले इंग्लिश भाषा दैनिक 'डेली कौरंट' प्रकाशित.
 • १८५०: पहिले वैद्यकिय महिला महाविद्यालय 'विमेन्स मेडिकल कॉलेज ऑफ पेनसिल्वेनिया' स्थापित.
 • १८८६: पहिली भारतीय महिला डॉक्टर आनंदीबाई जोशी यांना डॉक्टर ही पदवी मिळाली.
 • २००७: २००७च्या क्रिकेट विश्वचषक स्पर्धेचे उद्घाटन.
 • २०११: जपानजवळ समुद्रात रिश्टर मापनपद्धतीनुसार ८.९ तीव्रतेचा भूकंप. यात आणि यानंतरच्या त्सुनामीमध्ये शेकडो ठार.

जन्म/वाढदिवस


 • १५९६: आयझॅक इल्सेव्हिअर, पुस्तक प्रकाशक.
 • १६८३: जियोव्हॅनी व्हेनेझियानो, रचनाकार.
 • १८११: अर्बेन जिन जोसेफ ली व्हेरिअर, नेपच्युन ग्रहाचा सहसंशोधक.
 • १८१२: जेम्स स्पीड, ऍटोर्नी जनरल.
 • १८९०: व्हॅनेव्हर बुश, पहिल्या ऍनॉलाग इलेक्ट्रॉनिक संगणकाचा निर्माता.
 • १८९२: राऊल वॉल्श, दिग्दर्शक, थिफ ऑफ बगदाद, बॅटल क्राय चे दिग्दर्शन.
 • १८९८: डोरोथी गिश, नाट्य व मूकचित्रपट अभिनेत्री.
 • १९१५: विजय हजारे, भारतीय क्रिकेटपटू फलंदाज.
 • १९१८: अल् इबेन, फिलाडेल्फियाचा अभिनेता.
 • १९१९: मर्सर एलिंग्टन, नेता व ड्युक एलिंग्टनचा पुत्र.
 • १९२०: एन्राइट, इंग्रजी कवि व कादंबरीकार, ‘सम मेन आर ब्रदर्स’ चा लेखक.
 • १९२१: फ्रान्सिस मॅरियन बस्बी, कनिष्ठ, अमेरिकेचा विज्ञानलेखक, ‘स्टार रिबेल’ चा लेखक .
 • १९६४: रायमो हेलमिनेन, फिनलंडचा आघाडीचा हॉकीपटू.
 • १९६५: एरिक जेलेन, जर्मन टेनिसपटू.
 • १९६६: पॅव्हेल पॅट्रोव्हिक मुखोर्टोव्ह, रशियन अंतराळवीर.
 • १९७०: ब्रेट लिडल, दक्षिण आफ्रिकेचा गोल्फपटू.
 • १९७०: इव्हगेनी कोरेश्कोव्ह, हॉकीपटू.
 • १९७१: जिरी व्याकौकाइ, चेकोस्लोव्हाकियाचा हॉकी खेळाडू.
 • १९७३: केनेडी ओटिएनो, केनियाचा यष्टिरक्षक क्रिकेटपटू.
 • १९८२: हसन रझा, क्रिकेटपटू, वयाच्या १४व्या वर्षी कसोटीपटू झाला.

मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन


 • -