१ मार्च दिनविशेष

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | १ मार्च २०१८
१ मार्च दिनविशेष | March 1 in History
वसंतराव दादा पाटील. छायाचित्र: मराठीमाती डॉट कॉम आर्काईव्ह

वसंतराव दादा पाटील - (१३ नोव्हेंबर १९१७ - १ मार्च १९८९) महाराष्ट्रातील सहकार क्षेत्राला एक वेगळे, निर्णायक वळण देऊन विकास साधणारे नेते म्हणजे वसंतदादा बंडूजी पाटील होते. क्रांतिकारक, स्वातंत्र्यसैनिक ते विधायक कार्य करणारे, पक्ष संघटना वाढवणारे राजकीय नेते, प्रभावी मुख्यमंत्री व सहकार महर्षी - असा त्यांचा जीवन प्रवास आपल्याला थक्क करतो.महाराष्ट्राचे नेतृत्व करताना दादांनी अनेक समाजहितकारक, दूरगामी परिणाम साधणारे निर्णय घेतले. १९८३ मध्ये त्यांनी वैद्यकीय, अभियांत्रिकी महाविद्यालये व तंत्रनिकेतन विद्यालये विनाअनुदान तत्त्वावर स्थापन करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाने शैक्षणिक क्षेत्रात क्रांती घडवली. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना संधी उपलब्ध होण्याबरोबरच, या निर्णयामुळे शैक्षणिक व (पर्यायाने) औद्योगिक विकासालाही चालना मिळाली.

जागतिक दिवस


 • जागतिक नागरी संरक्षण दिवस

ठळक घटना/घडामोडी


 • ८६: लुसियस कोर्नेलियस सुलाच्या नेतृत्त्वाखाली रोमन सैन्य अथेन्समध्ये घुसले व तेथील राज्यकर्ता ऍरिस्टियोनला पदच्युत केले.
 • १५६२: फ्रांसमधील वासी शहरात कॅथोलिक जमावाने १,००हून अधिक हुगेनो व्यक्तिंना मारले.
 • १५६५: ब्राझिलमध्ये रियो दि जानेरो शहराची स्थापना.
 • १८०३: ओहायो अमेरिकेचे १७वे राज्य झाले.
 • १८१५: एल्बाहून सुटका करून घेउन नेपोलियन बोनापार्ट फ्रांसला परतला.
 • १८१८: सिंहगड किल्ला इंग्रजांनी ताब्यात घेतला.
 • १८४०: ऍडोल्फ थियेर्स फ्रांसच्या पंतप्रधानपदी.
 • १८६७: नेब्रास्का अमेरिकेचे ३७वे राज्य झाले.
 • १८७२: यलोस्टोन नॅशनल पार्क जगातील पहिले राष्ट्रीय उद्यान झाले.
 • १८७३: ई. रेमिंग्टन अँड सन्सनी पहिले टंकलेखन यंत्र विकण्यास सुरूवात केली.
 • १८९६: अडोवाची लढाई - इथियोपियाच्या सैन्याने इटलीला हरवले.
 • १८९६: आंत्वान हेन्री बेकरेलने किरणोत्सर्गाचा शोध लावला.
 • १९०७: टाटा आर्यन अ‍ॅन्ड स्टील कंपनीची स्थापना.
 • १९१२: आल्बर्ट बेरी हा विमानातून पॅराशूटच्या सहाय्याने उडी मारणारा सर्वप्रथम व्यक्ति ठरला.
 • १९१८: जर्मन पाणबुडीने रॅथलिन बेटाजवळ इंग्लंडचे एच.एस.एस. कॅल्गारियन हे जहाज बुडवले.
 • १९१९: रॉलट अ‍ॅक्ट निषेधार्थ महात्मा गांधी यांनी सत्याग्रहाला रारंभ केला.
 • १९३२: चार्ल्स लिंडबर्गचा मुलगा चार्ल्स ऑगस्टस लिंडबर्ग तिसरा याचे अपहरण झाले.
 • १९३६: हूवर धरणाचे बांधकाम समाप्त.
 • १९४१: बल्गेरियाने जर्मनी व इटलीशी संधी केली.
 • १९४६: बँक ऑफ इंग्लंडचे राष्ट्रीयकरण.
 • १९४९: इंडोनेशियाने जावा बेटावरील योग्यकर्ता प्रांत बळकावला.
 • १९५३: जोसेफ स्टालिनला पक्षाघाताचा झटका.
 • १९५४: अमेरिकेने बिकिनी बेटावर अणूबॉम्बचा स्फोट घडवला. आसपासच्या भागात प्रचंड प्रमाणात किरणोत्सर्ग फैलावले.
 • १९५८: कोयना जलविद्युत प्रकल्पाच्या उभारणीस सुरुवात.
 • १९६१: अमेरिकेत शांति दलाची स्थापना.
 • १९६१: युगांडात निवडणुका.
 • १९६२: अमेरिकन एरलाइन्स फ्लाइट १ हे विमान न्यूयॉर्कजवळ कोसळले.
 • १९७१: पाकिस्तानच्या अध्यक्ष याह्या खानने नॅशनल असेम्ब्ली (संसद) ची बैठक अनिश्चित काळासाठी तहकूब केली.
 • १९७८: स्वित्झर्लंडमधील चार्ली चॅप्लिनची शवपेटिका चोरीला गेली.
 • २००४: मोहम्मद बह्र अल-उलुम इराकच्या राष्ट्राध्यक्षपदी.
 • २००६: तार्या हेलोनेन फिनलंडच्या राष्ट्राध्यक्षपदी.

जन्म/वाढदिवस


 • १८१०: फ्रेडरिक चॉपिन, पोलिश संगीतकार.
 • १८८८: इवार्ट ऍस्टील, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
 • १९१०: डेव्हिड निवेन, इंग्लिश अभिनेता.
 • १९१८: होआव गुलार्ट, ब्राझिलचा राष्ट्राध्यक्ष.
 • १९२२: यित्झाक राबिन, इस्रायेलचा पंतप्रधान.
 • १९३०: कोइंबताराव गोपीनाथ, भारतीय क्रिकेट खेळाडू.
 • १९४२: रिचर्ड मायर्स, अमेरिकन सेनापती.
 • १९५०: शहीद इस्रार, पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू
 • १९५३: बंदुला वर्णपुरा, श्रीलंकेचा क्रिकेट खेळाडू.
 • १९५८: वेन बी. फिलिप्स, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
 • १९६१: सज्जाद अकबर, पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू.
 • १९६८: सलिल अंकोला, भारतीय क्रिकेट खेळाडू.
 • १९६८: संजीवा वीरासिंघे, श्रीलंकेचा क्रिकेट खेळाडू.
 • १९६९: आझम खान , पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू.
 • १९७१: झहूर इलाही, पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू.
 • १९७१: अनिसुर रहमान, बांगलादेशचा क्रिकेट खेळाडू.
 • १९८०: शहीद आफ्रिदी, पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू.
 • १९८१: तिलन तुषारा, श्रीलंकेचा क्रिकेट खेळाडू.

मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन


 • ११३१: स्टीवन दुसरा, हंगेरीचा राजा.
 • १७९२: लिओपोल्ड दुसरा, पवित्र रोमन सम्राट.
 • १९९१: एडविन लँड, अमेरिकन संशोधक.
 • १९९४: वसंतराव दादा पाटील, महाराष्ट्राचे शिल्पकार.
 • २००३: गौरी देशपांडे, मराठी लेखिका.