४ जून दिनविशेष

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | ४ जून २०१३

४ जून दिनविशेष(June 4 in History) ठळक घटना, घडामोडी, जन्म(वाढदिवस), मृत्यू(पुण्यतिथी, स्मृतीदिन) आणि जागतिक दिवस.

अशोक सराफ - (४ जून १९४७) मराठी चित्रपटसृष्टीत अभिनयाचा स्वतंत्र ठसा उमटविणारे अशोक सराफ हे एक लोकप्रिय मराठी अभिनेते आहेत.. लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या सोबत मराठी चित्रपटसृष्टीतील विनोदी चित्रपटांचा काळ गाजवणारे अशोक सराफ हे खरोखर मराठीतले सुपरस्टार होत. मराठी चित्रपटांसोबत त्यांनी अनेक हिंदी चित्रपटांतही विविध भूमिका केल्या असून दूरचित्रवाणीच्या छोट्या पडद्यावरील 'हम पांच' सारख्या मालिकेद्वारे त्यांचा अभिनय घराघरात पोचला.

जागतिक दिवस


 • १९४१ : राष्ट्र सेवादल दिवस.
 • हुतात्मा दिन.
 • विश्व निष्पाप बालक व आक्रमणपीडित दिन.
 • सेना दिन : फिनलंड.
 • स्वातंत्र्य दिन : टोंगा.

ठळक घटना/घडामोडी


 • १०३९ : हेन्री तिसरा पवित्र रोमन सम्राटपदी.
 • १७९२ : कॅप्टन जॉर्ज व्हॅनकूवरने प्युजेट साउंड हा अखात ग्रेट ब्रिटनच्या नावे जाहीर केला.
 • १७९४ : ब्रिटिश सैन्याने हैतीची राजधानी पोर्ट-औ-प्रिंस जिंकली.
 • १८०४ : आपल्या पत्नीच्या मृत्यूने व्यथित असलेल्या सार्डिनियाच्या राजा चार्ल्स इम्मॅन्युएल चौथ्याने पदत्याग केला. त्याचा भाऊ व्हिक्टर इम्मॅन्युएल राजेपदी.
 • १८६२ : अमेरिकन यादवी युद्ध - दक्षिणेच्या सैन्याने फोर्ट पिलोतून पळ काढला. उत्तरेने मेम्फिस, टेनेसीवर चाल केली.
 • १८७६ : न्यू यॉर्कहून निघालेली ट्रान्सकाँटिनेन्टल एक्सप्रेस ही रेल्वे गाडी ८३ तास ३९ मिनिटांच्या प्रवासानंतर सान फ्रांसिस्को येथे पोचली. अमेरिकेच्या दोन तीरांना जोडणारी ही रेल्वेची पहिली प्रवासी खेप होती.
 • १८७८ : ऑट्टोमन साम्राज्याने सायप्रस युनायटेड किंग्डमच्या हवाली केले.
 • १९१२ : मॅसेच्युसेट्स कामगारांचा लघुत्तम पगार ठरवणारे पहिले अमेरिक राज्य झाले.
 • १९२० : ट्रायानॉनचा तह.
 • १९२८ : तैवानच्या राष्ट्राध्यक्ष झ्हाँग झुओलिनची हत्या.
 • १९३९ : ज्यूंचे शिरकाण - युरोपमधून ९६३ ज्यूंना घेउन आलेल्या एस.एस. सेंट लुईस या बोटीला अमेरिकेने परवानगी नाकारली. यापूर्वी क्युबानेही हे प्रवासी स्वीकारण्यास नकार दिल्यामुळे ही बोट युरोपला परतली. यातील अनेक प्रवासी नाझींच्या छळसत्रात मृत्यू पावले.
 • १९४० : दुसरे महायुद्ध - जर्मन सैन्य पॅरिसमध्ये घुसले.
 • १९४२ : दुसरे महायुद्ध-मिडवेची लढाई सुरू.
 • १९४३ : आर्जेन्टिनामध्ये लश्करी उठाव, रमोन कॅस्टियोची हकालपट्टी.
 • १९४४ : अमेरिकेच्या हंटर किलर प्रकारच्या पाणबुड्यांनी जर्मनीची यु-५०५ ही पाणबुडी पकडली.
 • १९४४ : दुसरे महायुद्ध - दोस्त सैन्याने रोम जिंकले.
 • १९६७ : ब्रिटिश मिडलँड विमान कंपनीचे विमान कोसळले. ७२ ठार.
 • १९७० : टोंगाला युनायटेड किंग्डमपासून स्वातंत्र्य.
 • १९७९ : घानामध्ये लश्करी उठाव.
 • १९८९ : आयातोल्ला रुहोल्लाह खोमेनीच्या मृत्यूनंतर आयातोल्ला अली खामेनेई इराणच्या नेतेपदी.
 • १९९४ : वेस्ट इंडिजचा क्रिकेटपटु ब्रायन लारा याने आठ डावात सात शतके ठोकून नवा विक्रम प्रस्थापित केला.
 • २००१ : नेपाळचा शेवटचा राजा ग्यानेंद्र राज्यपदावर.

जन्म/वाढदिवस


 • १९४७ : अशोक सराफ, लोकप्रिय मराठी अभिनेते.
 • १९९० : जेत्सुन पेमा वांग्चुक, भूतानाची राणी.

मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन