MarathiMati.com - Android App on Google Play Store

३ जून दिनविशेष

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | ३ जून २०१३

३ जून दिनविशेष(June 3 in History) ठळक घटना, घडामोडी, जन्म(वाढदिवस), मृत्यू(पुण्यतिथी, स्मृतीदिन) आणि जागतिक दिवस.

बाबूराव पेंटर - (३ जून १८९० - १६ जानेवारी १९५४)बाबुराव पेंटर यांचा जन्म कोल्हापूर येथे झाला. त्यांचे मूळ नाव बाबुराव मेस्त्री असे होते. चित्रकला व शिल्पकला यांचे धडे त्यांना त्यांच्या वडिलांकडून मिळाले. सुरुवातीला ते तैलचित्रे काढत. गंधर्व नाटक कंपनीच्या रंगवलेल्या पडद्यांमुळे बाबूराव पेंटर यांची कलाक्षेत्रात एक वेगळी ओळख निर्माण झाली.

जागतिक दिवस


  • -

ठळक घटना, घडामोडी


  • ३५० : नेपोटियानसने रोममध्ये घुसून स्वतःला सम्राट घोषित केले.
  • १०९८ : पहिली क्रुसेड - आठ महिने चाललेल्या वेढ्यानंतर क्रुसेडरांनी अँटियोक शहर जिंकले.
  • १५३९ : एर्नान्दो दि सोतोने फ्लोरिडा स्पेनचा भाग असल्याचे जाहीर केले.
  • १६६५ : जेम्स स्टुअर्टने नेदरलँड्सच्या आरमाराला हरवले.
  • १८३१ : ‘भारतीय महिला विद्यापीठ’ या संस्थेची स्थापना. १९२० मध्ये ‘श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी विद्यापीठ’ (एस.एन.डी.टी.) असे नामांतर.
  • १८६४ : अमेरिकन यादवी युद्ध - कोल्ड हार्बरची लढाई.
  • १८८९ : कॅनेडियन पॅसिफिक रेल्वेने कॅनडाचे दोन्ही तीर जोडले.
  • १९३७ : ड्युक ऑफ विन्डसर व वॉली सिम्पसनचे लग्न.
  • १९४० : डंकर्कची लढाई - जर्मनीचा विजय. दोस्त सैन्याने पळ काढला.
  • १९४३ : झूट सुट दंगे - लॉस एंजेल्स नेव्हल रिझर्व आर्मरीतील ६० लोकांच्या टोळक्याने हिस्पॅनिक दिसणार्‍या लोकांना बडवून काढले.
  • १९६२ : एर फ्रांसचे बोईंग ७०७ प्रकारचे विमान पॅरिसहून निघताना कोसळले. १३० ठार.
  • १९६३ : नॉर्थवेस्ट एरलाइन्सचे डी.सी. ७ प्रकारचे विमान ब्रिटिश कोलंबियाच्या किनाऱ्याजवळ कोसळले. १०१ ठार.
  • १९६८ : अँडी वॉरहोल वर खूनी हल्ला.
  • १९६९ : व्हियेतनामजवळ ऑस्ट्रेलियाची विमानवाहू नौका एच.एम.ए.एस. मेलबॉर्न व अमेरिकेची विनाशिका यु.एस.एस. फ्रँक ई. एव्हान्सची टक्कर. एव्हान्सचे दोन तुकडे झाले.
  • १९७३ : सोवियेत संघाचेचे टी.यु. १४४ प्रकारचे विमान फ्रांसमध्ये गुसेनव्हिल जवळ कोसळले. १४ ठार.
  • १९७९ : मेक्सिकोच्या अखातात इहटॉक १ या खनिज तेलाच्या विहिरीला आग लागली. ६,००,००० टन तेल समुद्रात पसरले.
  • १९८४ : ऑपरेशन ब्ल्यु स्टारभारतीय सैन्याने आत घुसलेल्या अतिरक्यांना हुसकावण्यासाठी अमृतसरच्यासुवर्णमंदिरावर हल्ला चढवला.
  • १९८९ : थ्येनआनमन चौकात सात आठवडे तळ ठोकलेल्या प्रदर्शकांना घालवण्यासाठी चीनने लश्कर पाठवले.
  • १९९१ : जपानमधील माउंट उंझेन ज्वालामुखीचा उद्रेक. ४३ पत्रकार व संशोधकांचा मृत्यू.
  • १९९८ : जर्मनीमध्ये आय.सी.ई रेल्वेगाडी रुळांवरुन घसरली. १०१ ठार.
  • २००६ : सर्बिया आणि माँटेनिग्रोचे विघटन. माँटेनिग्रोला स्वातंत्र्य.

जन्म, वाढदिवस


मृत्यू, पुण्यतिथी, स्मृतीदिन


  • १९७७ : आर्चिबाल्ड विवियन हिल, नोबेल पारितोषिक विजेता ब्रिटिश जीवरसायनशास्त्रज्ञ.
  • २००० : डॉ. आर.एस. अय्यंगार, महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग ऍप्लिकेशन सेंटरचे संचालक.
  • २०१० : अजय सरपोतदार, मराठी चित्रपटनिर्माते, दिग्दर्शक.
MarathiMati.com - Android App on Google Play Store