२९ जून दिनविशेष

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | २९ जून २०१३

२९ जून दिनविशेष(June 29 in History) ठळक घटना, घडामोडी, जन्म(वाढदिवस), मृत्यू(पुण्यतिथी, स्मृतीदिन) आणि जागतिक दिवस.

२९ जून दिनविशेष | June 29 in History

श्रीपाद कृष्ण कोल्हटकर - (२९ जून १८७१ - १ जून १९३४). मराठी नाटककार, विनोदकार व वाङ्‍मयसमीक्षक. जन्म विदर्भातील बुलढाण्यास. अकोला, पुणे आणि मुंबई येथे बी.ए., एल्एल्. बी. पर्यंतचे शिक्षण. व्यवसाय वकिलीचा. त्यांनी आपल्या वाङ्‍मयसेवेचा आरंभ संगीत विक्रमशशिकला नाटकावरील टीकालेखाने (१८९३) केला. संगीत वीरतनय (१८९६) हे त्यांचे पहिले नाटक.

जागतिक दिवस


 • स्वातंत्र्य दिन : सेशेल्स.
 • सैनिक दिन : नेदरलँड्स.

ठळक घटना/घडामोडी


 • १६१३ : विल्यम शेक्सपियरच्या नाटकांचे पहिले प्रयोग जेथे झाले ते ग्लोब थियेटर आगीत भस्मसात.
 • ११९४ : स्व्हेर नॉर्वेच्या राजेपदी.
 • १८५० : कॅनडात व्हॅनकुवर द्वीपावर कोळसा सापडला.
 • १८८० : ताहिती फ्रांसची वसाहत झाले.
 • १९१४ : सायबेरियात जिना गुसेव्हाने रास्पुतिनचा खून करण्याचा प्रयत्न केला.
 • १९२२ : पहिल्या महायुद्धातील शौर्याच्या कृतज्ञतेदाखल फ्रांसने कॅनडाला व्हिमी रीज येथे १ वर्ग कि.मी. जागा तहहयात दिली
 • १९२६ : आर्थर मेइघेन कॅनडाच्या पंतप्रधानपदी.
 • १९५६ : अमेरिकेत देशभर हमरस्ते तयार करण्यासाठी केंद्रीय मदत देण्यासाठी कायदा मंजुर.
 • १९७६ : सेशेल्सला युनायटेड किंग्डमपासून स्वातंत्र्य.
 • १९८६ : आर्जेन्टिनाने १९८६चा फुटबॉल विश्वकप जिंकला.
 • १९९५ : दक्षिण कोरियाची राजधानी सोलमध्ये दुकानाची ईमारत कोसळली. ५०१ ठार, ९३७ जखमी.

जन्म/वाढदिवस


 • १८७१ : श्रीपाद कृष्ण कोल्हटकर, प्रसिध्द नाटककर, साहित्यिक व विनोदी लेखक.
 • १९३४ : कमलाकर सारंग, मराठी अभिनेता, दिग्दर्शक, निर्माता.
 • १३९७ : जॉन दुसरा,अरागॉनचा राजा.
 • १५९६ : गो-मिझुनू, जपानी सम्राट.
 • १८६१ : विल्यम मेयो, अमेरिकन डॉक्टर व मेयो क्लिनिकचा स्थापक.
 • १८६८ : जॉर्ज एलेरी हेल, अमेरिकन अंतरिक्षशास्त्रज्ञ.
 • १९३९ : ऍलन कॉनोली, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
 • १९४५ : चंद्रिका कुमारतुंगा, श्रीलंकेची राष्ट्राध्यक्ष.
 • १९४६ : अर्नेस्टो पेरेझ बॅलादारेस, पनामाचा राष्ट्राध्यक्ष.
 • १९५६ : पेद्रो संताना लोपेस, पोर्तुगालचा पंतप्रधान.
 • १९६५ : पॉल जार्व्हिस, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.

मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन


 • १८७३ : मायकेल मधुसूदन दत्त, बंगाली कवी.
 • २००० : कॅप्टन वासुदेव श्रीपाद बेलवलकर, मराठी ऐतिहासीक कादंबरीकार.
 • ६९ : संत पीटर.
 • १२५२ : एबेल, डेन्मार्कचा राजा.
 • १८७५ : फर्डिनांड पहिला, ऑस्ट्रियाचा राजा.
 • १८९५ : थॉमस हेन्री हक्सले, ब्रिटीश जीवशास्त्रज्ञ.
 • १९९२ : मोहम्मद बुदियाफ, अल्जीरियाचा राष्ट्राध्यक्ष.
 • २००३ : कॅथेरिन हेपबर्न अमेरिकन अभिनेत्री.