२२ जून दिनविशेष

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | २२ जून २०१३

२२ जून दिनविशेष(June 22 in History) ठळक घटना, घडामोडी, जन्म(वाढदिवस), मृत्यू(पुण्यतिथी, स्मृतीदिन) आणि जागतिक दिवस.

ओशो रजनीश -

जागतिक दिवस


 • फाशीवाद विरोधी आंदोलन दिन : क्रोएशिया.
 • शिक्षक दिन : एल साल्वादोर.

ठळक घटना/घडामोडी


 • २१७ : ईजिप्तच्या टॉलेमी चौथ्याच्या सैन्याने अँटियोकस तिसऱ्याचा पराभव केला.
 • १६८ : लुसियस एमिलियस पॉलसच्या नेतृत्त्वाखाली रोमन सैन्याने मेसिडोनियाच्या पर्स्युसचा पराभव केला.
 • १३७७ : वयाच्या दहाव्या वर्षी दुसरा रिर्चड इंग्लंडच्या गादीवर बसला.
 • १५१७ : अपंगांना कृत्रिम हातपाय पुरवणारे आणि रक्तवाहिन्या शिवून रक्तस्त्राव थांबविण्याची कल्पना मांडणारे अ‍ॅब्रायस्ते पेरी यांचा जन्म.
 • १६३३ : पोपच्या दबावाखाली गॅलिलियोने कबूल केले की पृथ्वीच सूर्यमाला केन्द्रबिंदू आहे, सूर्य नव्हे.
 • १७५७ : प्लासीची लढाई. या लढाईत विजय मिळाल्याने भारतात इंग्रजी सत्तेचा पाया घातला गेला.
 • १७५८ : पॅसिफिकच्या किनाऱ्याचा प्रवासी जॉर्ज व्हॅकुव्हरचा जन्म. याच्या सन्मानार्थ कॅनडामध्ये व्हॅकुव्हर या शहराला त्याचे नाव देण्यात आले.
 • १७७२ : एखाद्या गुलामाने इंग्लंडमध्ये प्रवेश केला, तर त्याला स्वतंत्र नागरिक समजण्यात येऊ लागले.
 • १८१२ : नेपोलियन बोनापार्टने रशियावर चढाई केली.
 • १८९३ : युनायटेड किंग्डमच्या युद्धनौका एच.एस.एस. कॅम्परडाउनने एच.एम.एस. व्हिक्टोरियाला धडक दिली. व्हिक्टोरिया ३५८ खलाशी व अधिकाऱ्यांसह बुडाली.
 • १८९७ : चार्ल्स रँड याला दामोदर हरी चाफेकर यांनी पुण्यातील जुलमाचा प्रतिशोध म्हणून बंदुकीने गोळ्या घातल्या.
 • १८९८ : स्पॅनिश-अमेरिकन युद्ध - अमेरिकन सैनिक क्युबात उतरले.
 • १९११ : जॉर्ज पाचवा तथा पंचम जॉर्ज इंग्लंडच्या राजेपदी.
 • १९३७ : कॅमिल शॉटेम्प्स फ्रांसच्या पंतप्रधानपदी.
 • १९४० : सुभाषचंद्र बोस यांनी काँग्रेसबाहेर पडून 'फॉरर्वड ब्लॉक' या पक्षाची स्थापना केली. फ्रान्सने अधिकृत शरणागती पत्करुन हीटलरसमोर गुडघे टेकले.
 • १९४१ : जर्मनीने रशियावर चढाई केली.
 • १९६२ : एर फ्रांसचे बोईंग ७०७ जातीचे विमान वेस्ट ईंडीझमधील ग्वादालुपे बेटाजवळ कोसळले.
 • १९६३ : पॉल सहावा पोपपदी.
 • १९७६ : कॅनडाने मृत्यूदंडावर बंदी घातली.
 • १९७८ : प्लुटोचा उपग्रह चारोनचा शोध लागला.
 • १९८३ : तिसऱ्या क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारताने इंग्लंडचा उपांत्य फेरीत पराभव केला.
 • १९८३ : तिसऱ्या क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत वेस्ट ईंडीझने पाकिस्तानचा उपांत्य फेरीत पराभव केला.
 • १९८६ : मेक्सिकोच्या डियेगो माराडोनाने इंग्लंडविरुद्ध हँड ऑफ गॉड व गोल ऑफ द सेन्चुरी नावाने प्रख्यात झालेले गोल नोंदवून विजय मिळवला.
 • २००२ : इराणमध्ये भूकंप. २६१ ठार.

जन्म/वाढदिवस


मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन


 • १२७६ : पोप इनोसंट पाचवा.
 • १४२९ : गियात अल काशी, पर्शियन अंतराळतज्ञ व गणितज्ञ.
 • १९४० : ब्लाडिमार पी. कोपेन, रशियन हवामानशास्त्रज्ञ.
 • २००१ : डॉ. अरुण घोष, भारतीय अर्थतज्ञ.