६ जुलै दिनविशेष

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | ६ जुलै २०१३

६ जुलै दिनविशेष(July 6 in History) ठळक घटना, घडामोडी, जन्म(वाढदिवस), मृत्यू(पुण्यतिथी, स्मृतीदिन) आणि जागतिक दिवस.

धीरजलाल हिराचंद अंबानी : ( २८ डिसेंबर १९३२ - ६ जुलै २००२) उर्फ धीरूभाई हिराचंद अंबानी हे गुजराती, भारतीय उद्योजक होते. व्यावसायिक हुशारीने गरिबीतून वर येऊन त्यांनी आपल्या चुलतभावासोबत रिलायन्स उद्योग समूह स्थापला. इ.स. १९७७ साली सार्वजनिक घोषित केलेली रिलायन्स कंपनी विस्तारत जाऊन इ.स. २००७ साली अंबाणी कुटुंबीयांची मालमत्ता ६० अब्ज डॉलर, म्हणजे वॉल्टन कुटुंबीयांपाठोपाठ दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत कुटुंब ठरण्याइतपत हा उद्योग वाढला.

जागतिक दिवस


 • -

ठळक घटना/घडामोडी


 • १२५३ : मिंडॉगास लिथुएनियाच्या राजेपदी.
 • १३४८ : युरोपमधील प्लेगच्या प्रादुर्भावानंतर पोप क्लेमेंट सहाव्याने पोपचा फतवा काढून ज्यू व्यक्तींना अभय दिले.
 • १४८३ : रिचर्ड तिसरा इंग्लंडच्या राजेपदी.
 • १४८४ : पोर्तुगालच्या शोधक दियोगो काओ कॉँगो नदीच्या मुखाशी पोचला.
 • १५३५ : राजा हेन्री आठव्याच्या इंग्लिश चर्चचे रोमन कॅथोलिक चर्चपासून विभाजन करण्याच्या निर्णयाशी सहमत न झाल्यामुळे सर थॉमस मोरला मृत्यूदंड.
 • १५६० : इंग्लंड व स्कॉटलंडमध्या एडिनबर्गचा तह.
 • १५७३ : कोर्दोबा, आर्जेन्टीना शहराची स्थापना.
 • १६३० : तीस वर्षाचे युद्ध - स्वीडिश सैनिक पोमरेनियात उतरले.
 • १७७७ : अमेरिकन क्रांती-टिकोंडेरोगाची लढाई - ब्रिटीश सैन्याने अमेरिकन सैन्याला फोर्ट टिकोंडेरोगा या किल्ल्यातून पळ काढण्यास भाग पाडले.
 • १७८५ : अमेरिकेने डॉलरला चलन म्हणून मान्यता दिली. हे चलन पूर्णतः दशमान पद्धतीवर आधारित होते.
 • १८८७ : अमेरिकन सैन्याने हवाईचा राजा डेव्हिड कालाकौआला संगीनीचे संविधान मान्य करण्यास भाग पाडले.
 • १८९२ : दादाभाई नौरोजींची ब्रिटीश संसदेचे सर्वप्रथम भारतीय सभासद म्हणून निवड.
 • १९०५ : आल्फ्रेड डीकिन दुसर्‍यांदा ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानपदी.
 • १९०८ : रॉबर्ट पियरीची उत्तर ध्रुवावर जाण्यासाठीची मोहीम निघाली.
 • १९३९ : ज्यूंचे शिरकाण - जर्मनीतील ज्यू व्यक्तींचे उरलेसुरले उद्योगधंदे बंद करण्यात आले.
 • १९४४ : हार्टफर्ड, कनेक्टिकट येथे सर्कशीच्या तंबूला आग. १६८ ठार, ७०० जखमी.
 • १९६४ : मलावीला युनायटेड किंग्डमपासून स्वातंत्र्य.
 • १९६६ : मलावी प्रजासत्ताक झाले.
 • १९६७ : नायजेरियाने बियाफ्रावर आक्रमण केले.
 • १९७५ : कोमोरोसला फ्रांसपासून स्वातंत्र्य.
 • १९८८ : उत्तर समुद्रात खनिज तेल काढणार्‍या पायपर आल्फा या जहाजवर स्फोट. १६७ ठार.
 • २००३ : कॉर्सिकातील निवडणूकात नागरिकांनी फ्रांसपासून स्वातंत्र्य नाकारले.
 • २००६ : भारत व तिबेटमधील नथु ला खिंड व्यापारास खुली.

जन्म/वाढदिवस


 • १७९६ : निकोलस पहिला, रशियाचा झार.
 • १८०९ : अँड्र्यू सँडहॅम, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
 • १८३७ : डॉ. रामकृष्ण गोपाळ भांडारकर, थोर प्राच्यविद्या संशोधक, संस्कृत पंडित भाषाशास्त्रज्ञ, इतिहास संशोधक.
 • १८८१ : थोर साधुपुरुष गुलाबराव महाराजांचा अमरावतीजवळ लोणी या गावी जन्म.
 • १८९७ : व्यंकटेश दिगंबर माडगूळकर, मराठी कथाकार आणि कादंबरीकार.
 • १९०१ : हिंद महासभेचे नेते व जैन संघाचे पहिले अध्यक्ष डॉ. शामाप्रसाद मुखर्जी यांचा जन्म.
 • १९०५ : लक्ष्मीबाई केळकर, भारतीय समाजसेविका, राष्ट्रसेविका समितीच्या संस्थापिका.
 • १९२१ : नॅन्सी रेगन, अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष रोनाल्ड रेगनची पत्नी.
 • १९२३ : वोयचेक जेरुझेल्स्की, पोलंडचा राष्ट्राध्यक्ष.
 • १९३५ : दलाई लामा, चौदावा अवतार.
 • १९३७ : टोनी लुईस, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
 • १९३९ : मन सूद, भारतीय क्रिकेट खेळाडू.
 • १९४४ : आचार्य प्रफ़ुल्ल चंद्र रॉय स्मृतिदिन.
 • १९४६ : जॉर्ज डब्ल्यू. बुश, अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष.
 • १९४६ : सिल्व्हेस्टर स्टॅलोन, अमेरिकन अभिनेता.
 • १९५८ : मार्क बेन्सन, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
 • १९७७ : मखाया न्तिनी, दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू.

मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन


 • ११८९ : हेन्री दुसरा, इंग्लंडचा राजा.
 • १२४९ : अलेक्झांडर दुसरा, स्कॉटलंडचा राजा.
 • १५५३ : एडवर्ड सहावा, इंग्लंडचा राजा.
 • १७६२ : पीटर तिसरा, रशियाचा झार.
 • १८३५ : जॉन मार्शल,अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाचा मुख्य न्यायाधीश.
 • १८५४ : गेऑर्ग झिमॉन ओम, जर्मन भौतिकशास्त्रज्ञ.
 • १९०१ : क्लॉडविग झु होहेनलोहे-शिलिंगफर्स्ट, जर्मनीचा चान्सेलर.
 • १९८६ : जगजीवनराम, भारतीय राजकारणी.
 • २००२ : धीरूभाई अंबानी, भारतीय उद्योगपती.
 • २००४ : थॉमस क्लेस्टिल, ऑस्ट्रियाचा राष्ट्राध्यक्ष.