MarathiMati.com - Android App on Google Play Store

५ जुलै दिनविशेष

द्वारे | प्रकाशक संपादक मंडळ | ५ जुलै २०१३

५ जुलै दिनविशेष(July 5 in History) ठळक घटना, घडामोडी, जन्म(वाढदिवस), मृत्यू(पुण्यतिथी, स्मृतीदिन) आणि जागतिक दिवस.

आंध्र प्रदेश उच्च न्यायालय : ( ५ जुलै १९५४ ) आंध्र प्रदेश उच्च न्यायालय भारताच्या आंध्र प्रदेश राज्यातील सर्वोच्च न्यायालय आहे. न्यायालयाला आंध्र राज्य कायदा, १९५३ अंतर्गत ५ जुलाई, १९५४ रोजी मान्यता दिली.

जागतिक दिवस


  • स्वातंत्र्य दिन : अल्जीरिया, केप व्हर्दे, व्हेनेझुएला.

ठळक घटना, घडामोडी


  • १६८७ : सर आयझॅक न्यूटनने फिलोसॉफि नॅचरालिस प्रिन्सिपिया मॅथेमॅटिका हे अतिमहत्त्वाचे पुस्तक प्रकाशित केले.
  • १७७० : चेस्माची लढाई.
  • १८११ : व्हेनेझुएलाला स्पेनपासून स्वातंत्र्य.
  • १८३० : फ्रांसने अल्जीरियावर आक्रमण केले.
  • १८६५ : वाहनांच्या वेगावर नियंत्रण घालणारा पहिला कायदा इंग्लंडमध्ये लागू.
  • १८८४ : कामेरून जर्मनीच्या आधिपत्याखाली.
  • १९०५ : लॉर्ड कर्झन याने बंगालची फाळणी केली.
  • १९४० : दुसरे महायुद्ध - युनायटेड किंग्डम व विची फ्रांसनी राजनैतिक संबंध तोडले.
  • १९४१ : दुसरे महायुद्ध - जर्मनीच्या सैन्याने नीपर नदी पर्यंत धडक मारली.
  • १९४३ : दुसरे महायुद्ध - कुर्स्कची लढाई.
  • १९४५ : दुसरे महायुद्ध - फिलिपाईन्सची जपानपासून सुटका.
  • १९४६ : बिकिनी हा वस्त्रप्रकार प्रथमतः वापरात.
  • १९५० : कोरियन युद्ध - अमेरिका व उत्तर कोरियाच्या सैन्यात चकमक.
  • १९५० : इस्रायेलच्या क्नेसेटने जगातील कोणत्याही ज्यू व्यक्तीला इस्रायेलमध्ये राहण्याचा हक्क दिला.
  • १९५१ : विल्यम शॉकलीने जंक्शन ट्रांझिस्टरचा शोध लावला.
  • १९५४ : आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाला मान्यता.
  • १९६२ : अल्जीरियाला फ्रांसपासून स्वातंत्र्य.
  • १९७० : एर कॅनडा फ्लाइट ६२१ हे डी.सी.८ प्रकारचे विमान टोरोंटो विमानतळाजवळ कोसळले. १०८ ठार.
  • १९७५ : आर्थर अ‍ॅश विम्बलडन टेनिस स्पर्धा जिंकणारा प्रथम श्यामवर्णीय व्यक्ती झाला.
  • १९७५ : केप व्हर्देला पोर्तुगालपासून स्वातंत्र्य.
  • १९७७ : पाकिस्तानमध्ये लश्करी उठाव. झुल्फिकारअली भुट्टो तुरुंगात.
  • १९९८ : जपानने मंगळाकडे अंतराळयान प्रक्षेपित केले.
  • २००४ : इंडोनेशियात प्रथमतः राष्ट्राध्यक्षपदासाठी निवडणुका.
  • २००६ : उत्तर कोरियाने प्रतिबंधांना न जुमानता नोडाँग-२, स्कड व तेपोडाँग-२ ही क्षेपणास्त्रे प्रक्षेपित केली

जन्म, वाढदिवस


  • १८५३ : सेसिल र्‍होड्स, दक्षिण आफ्रिकेचा राजकारणी.
  • १८८२ : हजरत इनायत खान, शास्त्रीय गायक.
  • १८८६ : विलेम ड्रीस, नेदरलँड्सचा पंतप्रधान.
  • १९११ : जॉर्जेस पॉम्पिदु, फ्रांसचा राष्ट्राध्यक्ष.
  • १९१६ : आर्चिक वेंकटेश गोपाळकृष्ण, कवि, वक्ते. धारवाड मध्ये.
  • १९२९ : टोनी लॉक, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
  • १९२८ : पिएर मॉरोय, फ्रांसचा पंतप्रधान.
  • १९४६ : राम विलास पासवान, केंद्रीय मंत्री.
  • १९५४ : जॉन राइट, न्यू झीलँडचा क्रिकेट खेळाडू.

मृत्यू, पुण्यतिथी, स्मृतीदिन


  • १६६६ : आल्बर्ट सहावा, बव्हारियाचा राजा.
  • १९४५ : जॉन कर्टीन, ऑस्ट्रेलियाचा १४वा पंतप्रधान.
  • २००४ : ह्यू शियरर, जमैकाचा पंतप्रधान.
MarathiMati.com - Android App on Google Play Store