MarathiMati.com - Android App on Google Play Store

१८ जुलै दिनविशेष

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | १८ जुलै २०१३

१८ जुलै दिनविशेष(July 18 in History) ठळक घटना, घडामोडी, जन्म(वाढदिवस), मृत्यू(पुण्यतिथी, स्मृतीदिन) आणि जागतिक दिवस.

नेल्सन मंडेला : (१९१८ जुलै १८ - २०१३ डिसेंबर ५ ) १९९४ ते १९९९ पासून दक्षिण आफ्रिकेचे अध्यक्ष होते. दक्षिण आफ्रिकेच्या विरोधी वर्णद्वेषाचे किंवा वर्णभेदाचे धोरण क्रांतिकारक राजकारणी आणि परदुःख दूर करण्यासाठी झटणारे मनुष्य होते .

जागतिक दिवस


  • संविधान दिन : उरुग्वे.

ठळक घटना, घडामोडी


  • ३९० : अलियाची लढाई - गॉल सैन्याने रोमजवळ रोमन सैन्याचा पराभव केला व नंतर रोममध्ये घुसून शहराची नासाडी केली.
  • ६४ : रोममध्ये प्रचंड आग. जवळजवळ सगळे शहर भस्मसात. यादरम्यान सम्राट निरो लांब उभा राहुन आपले तुणतुणे वाजवत असल्याची कथा.
  • १२१६ : ऑनरियस तिसरा पोपपदी.
  • १५३६ : इंग्लंडमध्ये पोपची सद्दी संपल्याचा फतवा.
  • १८३० : उरुग्वेने आपले पहिले संविधान अंगिकारले.
  • १८६३ : अमेरिकन यादवी युद्ध-फोर्ट वॅग्नरची लढाई - श्यामवर्णीय सैनिकांचा युद्धात सर्वप्रथम सहभाग. ५४वी मॅसेच्युसेट्स रेजिमेंटच्या झेंड्याखाली फोर्ट वॅग्नरवरील हल्ला असफल, परंतु या लढाईत श्यामवर्णीय सैनिकांची बहादुरी व धडाडी अमेरिकन लोकांना दिसली.
  • १८५२ : इंग्लंडने निवडणुकांत गुप्त मतदान अंगिकारले.
  • १८७३ : ऑस्कार दुसरा नॉर्वेच्या राजेपदी.
  • १८९८ : मेरी क्युरी व पिएर क्युरीनी पोलोनियम या नवीन मूलतत्त्वाचा शोध लावला.
  • १९२५ : ऍडोल्फ हिटलरने माइन कॅम्फ हे आत्मकथेसदृश पुस्तक प्रकाशित केले.
  • १९४४ : जपानच्या पंतप्रधान हिदेकी तोजोने राजीनामा दिला.
  • १९६५ : सोवियेत संघाच्या झॉँड ३ या अंतराळयानाचे प्रक्षेपण.
  • १९६६ : अमेरिकेच्या जेमिनी १० या अंतराळयानाचे प्रक्षेपण.
  • १९६८ : इंटेल कंपनीची स्थापना.
  • १९६९ : अमेरिकेन सेनेटर एडवर्ड केनेडीच्या गाडीला अपघात. सहप्रवासी ठार. ही घटना केनेडीच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या महत्त्वाकांक्षेच्या पूर्तीतील प्रमुख अडसर होती.
  • १९७६ : ऑलिंपिक खेळात नादिया कोमानेसीने जिम्नॅस्टिक्स स्पर्धेत सर्वप्रथम १० पैकी १० गुण मिळवले.
  • १९७७ : व्हियेतनामला संयुक्त राष्ट्रांत प्रवेश.
  • १९८२ : प्लान दि सांचेझची कत्तल - ग्वाटेमालात २६८ खेड्यातील लोकांची हत्या.
  • १९८४ : सान इसिद्रोची कत्तल - कॅलिफोर्नियातील सान इसिद्रो गावातील मॅकडोनाल्ड रेस्टॉरंट मध्ये २१ लोकांची हत्या. खून्याला पोलिसांनी मारले.
  • १९९४ : बोयनोस एर्समध्ये इमारतीत स्फोट. ८५ ठार.
  • १९९५ : कॅरिबिअन समुद्रातील माँतसेरात द्वीपावरील सुफ्रीयेर ज्वालामुखीचा उद्रेक. राजधानी प्लिमथ उद्ध्वस्त.
  • १९९६ : कॅनडात साग्वेने नदीला प्रचंड पूर.
  • १९९८ : पापुआ न्यू गिनीत त्सुनामीसदृश समुद्री लाटेत ३,००० व्यक्ती मृत्युमुखी.
  • २००१ : अमेरिकेच्या बाल्टिमोर शहरातील बोगद्यात रेल्वे गाडी रुळांवरुन घसरली व पेटली. शहराचा मध्यवर्ती भाग बंद करावा लागला.
  • २०१३ : अमेरिकेच्या डेट्रॉइट शहराच्या महानगरपालिकेने २० अब्ज अमेरिकन डॉलर (१२ निखर्व रुपये) इतके कर्ज फेडण्याची क्षमता नसल्याचे जाहीर करुन दिवाळे जाहीर केले.

जन्म, वाढदिवस


  • १५५२ : रुडॉल्फ दुसरा, पवित्र रोमन सम्राट.
  • १८११ : विल्यम मेकपीस थॅकरे, इंग्लिश लेखक.
  • १८४८ : डब्ल्यु.जी. ग्रेस, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
  • १८९० : फ्रँक फोर्ड, ऑस्ट्रेलियाचा १५वा पंतप्रधान.
  • १९०९ : आंद्रेइ ग्रोमिको, सोवियेत संघाचा राष्ट्राध्यक्ष.
  • १९०९ : मोहम्मद दाउद खान, अफगाणिस्तानचा राष्ट्राध्यक्ष.
  • १९१८ : नेल्सन मंडेला, दक्षिण आफ्रिकेचा राष्ट्राध्यक्ष.
  • १९२१ : जॉन ग्लेन, अमेरिकन अंतराळवीर.
  • १९४९ : डेनिस लिली, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
  • १९५० : सर रिचर्ड ब्रॅन्सन, इंग्लिश उद्योगपती.
  • १९६७ : व्हिन डीझेल, अमेरिकन अभिनेता.
  • १९८२ : प्रियांका चोप्रा, भारतीय अभिनेत्री.

मृत्यू, पुण्यतिथी, स्मृतीदिन


  • १६२३ : पोप ग्रेगोरी पंधरावा.
  • १८६३ : रॉबर्ट गुल्ड शॉ, अमेरिकेच्या ५४वी मॅसेच्युसेट्स रेजिमेंटचा सेनापती.
  • १८७२ : बेनितो हुआरेझ, मेक्सिकोचा राष्ट्राध्यक्ष.
  • १८९२ : थॉमस कूक, इंग्लिश प्रवास-व्यवस्थापक.
  • १९९० : यून बॉसिऑन, दक्षिण कोरियाचा राष्ट्राध्यक्ष.
  • २०१२ : राजेश खन्ना, हिंदी चित्रपट अभिनेते.
MarathiMati.com - Android App on Google Play Store