१७ जुलै दिनविशेष

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | १७ जुलै २०१३

१७ जुलै दिनविशेष(July 17 in History) ठळक घटना, घडामोडी, जन्म(वाढदिवस), मृत्यू(पुण्यतिथी, स्मृतीदिन) आणि जागतिक दिवस.

अॅडम स्मिथ : (५ जून १७२३ - १७ जुलै १७९०) अॅडम स्मिथ हा स्कॉटलंडचा तत्वज्ञ होता. राजकीय अर्थशास्त्राचा पाया त्याने रचल्याचे माने जाते.

जागतिक दिवस


 • बाथ क्रांती दिन : इराक.
 • लुइस मुनोझ रिव्हेरा जन्मदिन : पोर्तो रिको.
 • संविधान दिन : दक्षिण कोरिया.

ठळक घटना/घडामोडी


 • १०४८ : दमासस दुसरा पोपपदी.
 • १२०३ : चौथी क्रुसेड - ख्रिश्चन सैन्याने कॉन्स्टेन्टिनोपल जिंकले.
 • १७६२ : कॅथेरिन दुसरी रशियाच्या झारपदी.
 • १७९१ : फ्रेंच क्रांती - शाँ दि मारची कत्तल. १,२०० ते १,५०० व्यक्तींची हत्या.
 • १८०२ : मराठी भाषेतील पहिला छापील मजकुर मोडी लिपीत. देवी रोगावरील लस टोचून घेण्याविषयीची जाहिरात.
 • १८१५ : नेपोलियन बोनापार्टने ब्रिटीश सैन्यासमोर शरणागती पत्करली.
 • १८९७ : अलास्काच्या क्लॉन्डाइक भागात सोने शोधण्यासाठी गेलेली काही माणसे मुबलक सोन्याची वार्ता घेउन परतली आणि क्लॉन्डाइक गोल्ड रशची सुरुवात झाली.
 • १९१७ : इंग्लंडचा राजा जॉर्ज पाचव्याने फतवा काढून जाहीर केले की त्याच्या वंशातील पुरूष मंडळी विंडसर हे आडनाव लावतील.
 • १९१८ : रशियाचा झार निकोलस दुसरा व त्याच्या कुटुंबाची हत्या.
 • १९३६ : स्पॅनिश गृहयुद्धाला तोंड फुटले.
 • १९४४ : अमेरिकेत पोर्ट शिकागो येथे दारुगोळ्याने भरलेल्या दोन जहाजांवर स्फोट. २३२ ठार.
 • १९४५ : दुसरे महायुद्ध - पॉट्सडॅम संमेलनास सुरुवात.
 • १९४७ : कोकण किनार्‍यावरील प्रवाशांची ने-आण करणार्‍या ‘रामदास’ या प्रचंड बोटीला जलसमाधी मिळून ६२५ मृत्युमुखी.
 • १९५४ : कॅलिफोर्नियात डिस्नेलँड खुले.
 • १९७५ : अमेरिकेचे अपोलो व रशियाचे सोयुझ ही दोन अंतराळयाने एकमेकांस जोडली गेली.
 • १९७६ : ईंडोनेशियाने पूर्व तिमोर बळकावले.
 • १९७६ : कॅनडातील मॉँट्रिआल शहरात एकविसावे ऑलिंपिक खेळ सुरू.
 • १९७९ : निकाराग्वाच्या राष्ट्राध्यक्ष जनरल अनास्तासियो सोमोझा देबेलने मायामी येथे पलायन केले.
 • १९८१ : अमेरिकेतील कॅन्सास सिटी, मिसुरी येथे हॉटेलचा एक भाग कोसळला. ११४ ठार.
 • १९८४ : लॉरें फाबियस फ्रांसच्या पंतप्रधानपदी.
 • १९९४ : फुटबॉल विश्वकप अंतिम सामन्यात ब्राझिलने इटलीला पेनल्टी शूट-आउटमध्ये हरवले.
 • १९९५ : अमेरिकेत उष्ण हवेची लाट. ४०० मृत्युमुखी.
 • १९९६ : ट्रान्स वर्ल्ड एरलाइन्स फ्लाइट ८०० हे बोईंग ७४७ प्रकारचे विमान न्यू यॉर्कजवळ समुद्रात कोसळले. २३० ठार.
 • १९९८ : रशियाच्या झार निकोलस दुसरा व त्याच्या कुटुंबीयांना सेंट पीटर्सबर्ग येथे पुनर्दफन.
 • १९९८ : पापुआ न्यू गिनीच्या किनाऱ्यावर त्सुनामी. १,५०० मृत्युमुखी, २,००० गायब.
 • २००४ : भारतातील कुंभकोणम शहरात शाळेला आग लागली. ९० विद्यार्थी ठार.
 • २००६ : ईंडोनेशिया जवळ समुद्रात रिश्टर मापनपद्धतीनुसार ७.२ तीव्रतेचा भूकंप. या नंतरच्या त्सुनामीत ८० व्यक्ती मृत्युमुखी.
 • २००६ : टॅम एरलाइन्सचे टॅम एरलाइन्स फ्लाइट ३०५४ हे विमान साओ पाउलो विमानतळावर उतरताना कोसळले. अंदाजे १९९ ठार.

जन्म/वाढदिवस


 • १४८७ : इस्माईल पहिला, पर्शियाचा शहा.
 • १८३१ : शियानफेंग, चीनी सम्राट.
 • १९१८ : कार्लोस मनुएल अराना ओसोरिया, ग्वाटेमालाचा राष्ट्राध्यक्ष.
 • १९२० : हुआन अँतोनियो समारांच, आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीचा अध्यक्ष.
 • १९४१ : बॉब टेलर, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
 • १९४९ : स्नायडर रिनी, सोलोमन द्वीपांचा राष्ट्राध्यक्ष.
 • १९५२ : डेव्हिड हॅसेलहॉफ, अमेरिकन अभिनेता.
 • १९५४ : एंजेला मर्केल, जर्मनीची चान्सेलर.
 • १९६३ : लेत्सी तिसरा, लेसोथोचा राजा.

मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन


 • ९२४ : मोठा एडवर्ड, इंग्लंडचा राजा.
 • १०८६ : कॅन्युट चौथा, डेन्मार्कचा राजा.
 • १७९० : अ‍ॅडम स्मिथ, आधुनिक अर्थशास्त्रज्ञ.
 • १९१८ : निकोलस दुसरा, रशियाचा झार (कुटुंबासह).
 • २००५ : सर एडवर्ड हीथ, युनायटेड किंग्डमचा पंतप्रधान.
 • २०१२ : मृणाल गोरे, सहाव्या लोकसभेच्या सदस्य, समाजवादी कार्यकर्त्या