MarathiMati.com - Android App on Google Play Store

१४ जुलै दिनविशेष

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | १४ जुलै २०१३

१४ जुलै दिनविशेष(July 14 in History) ठळक घटना, घडामोडी, जन्म(वाढदिवस), मृत्यू(पुण्यतिथी, स्मृतीदिन) आणि जागतिक दिवस.

गोपाळ गणेश आगरकर - (१४ जुलै १८५६ - १७ जून १८९५) गोपाळ गणेश आगरकर हे मराठी पत्रकार, समाजसुधारक होते. आगरकर हे, बाळ गंगाधर टिळकांनी सुरू केलेल्या केसरी वृत्तपत्राचे पहिले संपादक (१८८०-१८८१) होते. आगरकर व टिळक यांनी १८८१ मध्ये इंग्रजीतून ‘मराठा’, तर मराठीतून ‘केसरी’ अशी दोन वृत्तपत्रे चालू केली. केसरीचे संपादकत्व आगरकरांनी स्वीकारले.

जागतिक दिवस


  • बॅस्टिल दिन : फ्रांस.

ठळक घटना, घडामोडी


  • १२२३ : लुई आठवा फ्रांसच्या राजेपदी.
  • १७८९ : पॅरिसमध्ये नागरिकांनी फ्रेंच राज्यसत्तेचे व दडपशाहीचे चिह्न असलेल्या बॅस्टिल तुरुंगावर हल्ला केला व आतील सात बंद्यांची मुक्तता केली. ही घटना म्हणजे फ्रेंच क्रांतीची मुहुर्तमेढ होती.
  • १७९१ : फ्रेंच क्रांतीपासून पळून इंग्लंडमध्ये आश्रय घेतलेल्या फ्रेंच रसायनशास्त्रज्ञ जोसेफ प्रिस्टलीची बर्मिंगहॅम शहरातून हकालपट्टी.
  • १९२५ : जर्मनीत नाझी पक्षाव्यतिरिक्त सगळ्या राजकीय पक्षांवर बंदी.
  • १९४३ : अमरिकेतील सेंट लुई शहरात जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हरचे स्मारक खुले.
  • १९५८ : इराकमध्ये राजेशाहीविरुद्ध उठाव. अब्दुल करीम कासम सत्तेवर.
  • १९६६ : अमेरिकेतील शिकागो शहरात रिचर्ड स्पेकने आठ परिचारिका-विद्यार्थिनींची हत्या केली.
  • १९६६ : ग्वाटेमाला सिटीतील मनोरुग्णालयात आग. २२५ ठार.
  • १९८४ : डेव्हिड लँग न्यू झीलँडच्या पंतप्रधानपदी.
  • २००० : फिजीतील उठावाचा सूत्रधार जॉर्ज स्पेटला अटक व देशद्रोहाचा आरोप.

जन्म, वाढदिवस


मृत्यू, पुण्यतिथी, स्मृतीदिन


  • १२२३ : फिलिप दुसरा, फ्रांसचा राजा.
  • १२७४ : संत बोनाव्हेंचर.
  • १८८१ : बिली द किड, अमेरिकन दरोडेखोर.
  • १८८७ : आल्फ्रेड क्रुप, जर्मन उद्योगपती.
  • १९०४ : पॉल क्रुगर, दक्षिण आफ्रिकेचा क्रांतीकारी.
  • २००२ : होआकिन बॅलाग्वेर, डॉमिनिकन प्रजासत्ताकचा राष्ट्राध्यक्ष.
  • २००८ : यशवंत विष्णू चंद्रचूड, भारताचे माजी सरन्यायाधीश.
MarathiMati.com - Android App on Google Play Store