MarathiMati.com - Android App on Google Play Store

१२ जुलै दिनविशेष

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | १२ जुलै २०१३

१२ जुलै दिनविशेष(July 12 in History) ठळक घटना, घडामोडी, जन्म(वाढदिवस), मृत्यू(पुण्यतिथी, स्मृतीदिन) आणि जागतिक दिवस.

जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर : जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर (जुलै १२, १८६४ - जानेवारी ५, १९४३) हे अमेरिकेचे पहिले कृष्णवर्णीय शास्त्रज्ञ होते. गुलामगीरीच्या काळात जन्माला आलेले कार्व्हर यांना त्यांचे मालक मोझेस कार्व्हर यांनी मोठे केले व आपले नावही दिले. गुलामगीरी नष्ट झाल्यानंतर कृष्णवर्णीयांना शिक्षणाची दारे खुली झाली होती. चित्रकला, गायन व अनेक कलेत निपुण असलेल्या कार्व्हर यांना त्यांच्या आयुष्यात अनेक हितचिंतकांनी उच्च शिक्षण घेण्यास प्रोत्साहन दिले

जागतिक दिवस


  • स्वातंत्र्य दिन : किरिबाटी, साओ टोमे व प्रिन्सिप.

ठळक घटना, घडामोडी


  • ११९१ : तिसरी क्रुसेड - दोन वर्षांच्या वेढ्यानंतर एकरचा किल्ला पडला.
  • १५८० : ऑस्ट्रोग बायबलचे प्रकाशन.
  • १६९१ : ऑघ्रिमची लढाई - इंग्लंडच्या विल्यम दुसर्‍याने स्कॉटलंडच्या जेम्स सातव्याला हरवले.
  • १८१२ : १८१२चे युद्ध - अमेरिकेने कॅनडावर आक्रमण केले.
  • १८९२ : मॉँट ब्लांक पर्वतावरील सरोवर फुटले. खालील सेंट जर्व्हे गावात पूर. २०० ठार.
  • १९३२ : हेडली व्हेरिटीने एकाच डावात १० धावा देउन १० बळी घेतले व क्रिकेटमधील उच्चांक स्थापित केला.
  • १९३३ : अमेरिकन काँग्रेसने कामगारांसाठी न्यूनतम मोबदला ताशी ३३ सेंट ठरवला.
  • १९४३ : दुसरे महायुद्ध - प्रोखोरोव्ह्काची लढाई.
  • १९५० : रेने प्लेव्हेन फ्रांसच्या पंतप्रधानपदी.
  • १९६७ : नुवार्क, न्यु जर्सी शहरात वांशिक दंगली. २७ ठार.
  • १९७५ : साओ टोमे व प्रिन्सिपला पोर्तुगालपासून स्वातंत्र्य.
  • १९७९ : किरिबाटीला युनायटेड किंग्डमपासून स्वातंत्र्य.
  • १९९३ : जपानच्या होक्काइदो द्वीपावर रिश्टर मापनपद्धतीनुसार ७.८ तीव्रतेचा भूकंप. यामुळे तयार झालेल्या त्सुनामीने ओकुशिरी द्वीपावर २०२ बळी घेतले.
  • २००४ : पेद्रो संताना लोपेस पोर्तुगालच्या पंतप्रधानपदी.
  • २००५ : आल्बर्ट दुसरा मोनॅकोच्या राजेपदी.
  • २०१२ : नायजेरियातील ओकोबी शहराजवळ अपघात झालेल्या पेट्रोलवाहू ट्रकचा स्फोट. त्यातून गळत असलेले पेट्रोल गोळा करणारऱ्यांपैकी १२१ व्यक्ती ठार, शेकडो जखमी.

जन्म, वाढदिवस


  • १०० : जुलियस सीझर, रोमन सेनापती व राज्यकर्ता, सीझर (जुलै १२ किंवा जुलै १३).
  • १३९४ : अशिकागा योशिनोरी, जपानी शोगन.
  • १५९६ : मायकेल पहिला, रशियाचा झार.
  • १८५२ : हिपोलितो य्रिगोयेन, आर्जेन्टीनाचा राष्ट्राध्यक्ष.
  • १८५४ : जॉर्ज ईस्टमन, अमेरिकन संशोधक.
  • १८६४ : इतिहासाचार्य वि.का.राजवाडे, मराठी इतिहास संशोधक
  • १८६४ : जॉर्ज वॉशिंगटन कार्व्हर, अमेरिकन शास्त्रज्ञ.
  • १८७० : लुई दुसरा, मोनॅकोचा राजा.
  • १९२० : यशवंत विष्णू चंद्रचूड, भारताचे माजी सरन्यायाधीश.
  • १९३७ : लायोनेल जॉस्पिन, फ्रांसचा पंतप्रधान.
  • १९४३ : ब्रुस टेलर, न्यू झीलँडचा क्रिकेट खेळाडू.
  • १९४७ : पूचिया कृष्णमुर्ती, भारतीय क्रिकेट खेळाडू.
  • १९६५ : संजय मांजरेकर, भारतीय क्रिकेट खेळाडू.
  • १९६९ : ऍलन मुल्लाली, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.

मृत्यू, पुण्यतिथी, स्मृतीदिन


  • १४४१ : अशिकागा योशिनोरी, जपानी शोगन.
  • १७१२ : रिचर्ड क्रॉमवेल, इंग्लिश राज्यकर्ता.
  • १९४९ : डग्लस हाइड, आयर्लंडचा पहिला राष्ट्राध्यक्ष.
MarathiMati.com - Android App on Google Play Store