१ जुलै दिनविशेष

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | १ जुलै २०१३

१ जुलै दिनविशेष(July 1 in History) ठळक घटना, घडामोडी, जन्म(वाढदिवस), मृत्यू(पुण्यतिथी, स्मृतीदिन) आणि जागतिक दिवस.

कल्पना चावला - (१ जुलै १९६१ - १ फेब्रुवारी २००३) ही भारतीय वंशाची अमेरिकन अंतराळवीर होती. कल्‍पना ही भारतीय वंशाची अंतराळात जाणारी प्रथम महिला होती. कल्पना सुनिल चावला यांचा जन्म कर्नाल, हरयाणा ...

जागतिक दिवस


 • महाराष्ट्र कृषी दिन.
 • कॅनडा दिन : कॅनडा.
 • प्रजासत्ताक दिन : घाना.
 • केटी कोटी (मुक्ती दिन) : सुरिनाम.

ठळक घटना/घडामोडी


 • १९६१ : महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाची स्थापना.
 • १९५५ : पूर्वीच्या इंपीरिअयल बॅंकेची आता स्टेट बॅंक ऑफ इंडिया नावाने स्थापना झाली.
 • २००२ : बाश्किरियन एरलाइन्स फ्लाइट २९३७ हे तुपोलेव्ह टीयु-१५४ प्रकारचे विमान आणि डीएचएल कंपनीचे बोईंग ७५७ प्रकारचे विमान जर्मनीतील ऊबेरलिंगेन गावावर आकाशात एकमेकांस आदळली. ७१ ठार.
 • २००६ : चीन मध्ये किंगहाइ-तिबेट रेल्वेचे उद्घाटन.

जन्म/वाढदिवस


 • १४८१ : क्रिस्चियन दुसरा, डेन्मार्कचा राजा.
 • १५३४ : फ्रेडरिक दुसरा, डेन्मार्कचा राजा.
 • १६४६ : गॉट्फ्रीड लाइबनिझ, जर्मन गणितज्ञ.
 • १७४२ : जॉर्ज क्रिस्तॉफ लिश्टेनबर्ग, जर्मन भौतिकशास्त्रज्ञ.
 • १७८८ : ज्याँ-व्हिक्टर पाँसेले, फ्रेंच गणितज्ञ.
 • १९०६ : एस्टे लॉडर, अमेरिकन उद्योगपती.
 • १९१३ : वसंतराव नाईक, हरितक्रांतीचे आणि रोजगार हमी योजनेचे जनक, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री.
 • १९२१ : सेरेत्से खामा, बोत्स्वानाचा पहिला राष्ट्राध्यक्ष.
 • १९३८ : पंडित हरिप्रसाद चौरासिया, आंतरराष्ट्रीय कीर्तीचे बासरीवादक.
 • १९४७ : शरद यादव खासदार
 • १९४९ : व्यंकय्या नायडू भाजपा नेते
 • १९५१ : फ्रेड श्नायडर, अमेरिकन संगीतकार.
 • १९६० : सुदेश भोसले, गायक
 • १९६० : गिरीश पंचवाडकर, गायक
 • १९६१ : कल्पना चावला, अंतराळवीर
 • १९६१ : डायना, वेल्सची राजकुमारी.

मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन


 • १९०९ : थोर क्रांतीकारक मदनलाल धिंग्रा यांनी इंग्रज अधिकारी कर्झन वायली याचा वध केला.
 • १९७१ : सर विल्यम लॉरेन्स ब्रॅग, ऑस्ट्रेलियन-ब्रिटिश भौतिकशास्त्रज्ञ व नोबेल पारितोषिक विजेता.
 • १९९४ : राजाभाऊ नातू, मराठी रंगभूमीवरील नेपथ्यकार.