MarathiMati.com - Android App on Google Play Store

७ जानेवारी दिनविशेष

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | ७ जानेवारी २०१३

७ जानेवारी दिनविशेष(January 7 in History) ठळक घटना, घडामोडी, जन्म(वाढदिवस), मृत्यू(पुण्यतिथी, स्मृतीदिन) आणि जागतिक दिवस.

चंद्रकांत गोखले

चंद्रकांत गोखले - (जानेवारी ७, इ.स. १९२१, मिरज, सांगली संस्थान - जून २०, इ.स. २००८, पुणे, महाराष्ट्र) हे मराठी नाट्यअभिनेते व चित्रपट अभिनेते होते. यांनी वयाच्या नवव्या वर्षी ‘पुन्हा हिंदू’ या नावाच्या मराठी नाटकाद्वारे अभिनयक्षेत्रात पदार्पण केले. ७ दशकांहून अधिक काळाच्या कारकिर्दीत यांनी साठाहून अधिक मराठी नाटकांतून व साठाहून अधिक मराठी चित्रपटांतून अभिनय केला आहे. त्यांनी भूमिका केलेल्या नाटकांपैकी भावबंधन, राजसंन्यास, पुण्यप्रभाव, बेबंदशाही, राजे मास्तर, बॅरिस्टर, पुरुष ही प्रमुख नाटके होत. मराठीशिवाय त्यांनी काही हिंदी चित्रपटांमधूनदेखील भूमिका रंगवल्या.मराठी अभिनेत्री कमळाबाई गोखले या यांच्या आई होत्या. यांचे पुत्र विक्रम गोखले हेदेखील अभिनेते आहेत.

जागतिक दिवस


 • -

ठळक घटना/घडामोडी


 • १६१०: गॅलिलिओकडून गुरु ग्रहाचा शोध लागला.
 • १९३२: भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्रप्रसाद यांना कॉंग्रेस इक्टेटर म्हणून कैद करण्यात आली.
 • १९९२: विश्वनाथ आनंदला ग्रॅन्डमास्टर हा दर्जा प्राप्त झाला.

जन्म/वाढदिवस


 • १५०२: पोप ग्रेगोरी तेरावा
 • १७८९: आइल्हार्ड मिट्शेर्लिख: रसायनशास्त्रज्ञ. बेंझिन व मिथिल या रसायनांचा शोधक .
 • १८००: मिलार्ड फिलमोर, अमेरिकेचा तेरावा राष्ट्राध्यक्ष.
 • १८२७: सर सँडफोर्ड फ्लेमिंग, केनेडियन अभियंता.
 • १८५८: एलीझर बेन-येहुदा, हिब्रू भाषातज्ञ.
 • १९१०: फैझ अहमद फैझ, उर्दू कवी.
 • १९१२: चार्ल्स अ‍ॅडाम्स, न्यू यॉर्कचा व्यंगचित्रकार.
 • १९२०: सरोजिनी बाबर, लोकसाहित्याच्या अभ्यासक.
 • १९२१: चित्रपट अभिनेता चंद्रकांत गोखले.
 • १९२५: जोराल्ड डरेल - प्राणी व निसर्ग लेखक.
 • १९४५: रैला ओडिंगा, केन्याचा पंतप्रधान.
 • १९४८: शोभा डे, भारतीय लेखिका.
 • १९५०: जॉनी लिव्हर, भारतीय अभिनेता.
 • १९६४: निकोलस केज, अमेरिकन अभिनेता.
 • १९७९: बिपाशा बासू, भारतीय चित्रपट अभिनेत्री.

मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन


 • -

नुकतेच प्रकाशित नवीन लेखन

बाय - मराठी कथा | Bye - Marathi Katha

बाय

विभाग मराठी कथा

स्वभाव - मराठी कविता | Swabhav - Marathi Kavita

स्वभाव

विभाग मराठी कविता

आधार - मराठी कविता | Aadhar - Marathi Kavita

आधार

विभाग मराठी कविता

बायको - मराठी कविता | Baayko - Marathi Kavita

बायको

विभाग मराठी कविता

MarathiMati.com - Android App on Google Play Store