MarathiMati.com - Android App on Google Play Store

३० जानेवारी दिनविशेष

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | ३० जानेवारी २०१३

महात्मा गांधी | Mahatma Gandhi

मोहनदास करमचंद गांधी - (ऑक्टोबर २, १८६९ - जानेवारी ३०, १९४८) हे भारताच्या स्वातंत्र्य संग्रामातील प्रमुख नेते आणि तत्त्वज्ञ होते. महात्मा गांधी या नावाने ते ओळखले जातात. अहिंसात्मक असहकार आंदोलनांनी गांधीजीनी भारताला स्वातंत्र्य मिळवून दिले. अहिंसात्मक मार्गांनी स्वातंत्र्य मिळवण्यासाठी त्यानी संपूर्ण जगाला प्रेरित केले. रवींद्रनाथ टागोर यांनी सर्वप्रथम त्यांना महात्मा ही उपाधी दिली. महात्मा या संस्कृत भाषेतील शब्दाचा अर्थ आहे 'महान आत्मा'. भारतातील लोक त्यांना प्रेमाने बापू म्हणत आणि त्यांना स्वतंत्र भारताचे राष्ट्रपिता मानले जाते. नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी इ.स. १९४४ मध्ये त्यांना प्रथम राष्ट्रपिता असे संबोधले. ते सत्याग्रहाचे जनक होते. त्यांची जयंती भारतात गांधी जयंती म्हणून तर जगभरात आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन म्हणून साजरी केली जाते.

जागतिक दिवस


  • शहीद दिन: भारत.

ठळक घटना/घडामोडी


  • १६४९: इंग्लंडचा राजा चार्ल्स पहिल्याचा शिरच्छेद.
  • १६६१: ऑलिव्हर क्रॉमवेल, ज्याच्या राजवटीत चार्ल्स पहिल्याचा शिरच्छेद झाला, त्याचा स्वतःचा शिरच्छेद केला गेला. क्रॉमवेल २ वर्षांपूर्वीच मृत्यु पावला होता.
  • १८३५: रिचर्ड लॉरेन्स नावाच्या माथेफिरू माणसाने अमेरिकेचा अध्यक्ष अँड्र्यू जॅक्सनचा खून करण्याचा प्रयत्न केला. लॉरेन्सची दोन्ही पिस्तुले ऐनवेळी बिघडली. चिडलेल्या जॅक्सनने लॉरेन्सला काठीने मारून पळवून लावले.
  • १८४७: कॅलिफोर्नियातील येर्बा बॉयना गावाचे सान फ्रांसिस्को म्हणून पुनर्नामकरण.
  • १९११: जॅक्सन खून प्रकरणी स्वातंत्र्यवीर सावरकर यांना जन्मठेपेची शिक्षा.
  • १९१३: इंग्लंडच्या संसदेने आयरिश होमरूलचा ठराव नामंजूर केला.
  • १९३३: ऍडॉल्फ हिटलर जर्मनीच्या चान्सेलर(अध्यक्षपदी).
  • १९४८: नथुराम गोडसेने महात्मा गांधींचा पिस्तुलाने खून केला.
  • १९४८: पाचवे हिवाळी ऑलिम्पिक खेळ सेंट मॉरिट्झ, स्वित्झरलंड येथे सुरू.
  • १९७२: पाकिस्तानने ब्रिटीश राष्ट्रकुलातून अंग काढून घेतले.
  • १९७९: टोक्योहून निघालेले व्हारिग एरलाइन्सचे बोईंग ७०७-३२३सी जातीचे विमान नाहीसे झाले.
  • १९८९: अमेरिकेने अफगाणिस्तानमधील आपला राजदूतावास बंद केला.
  • १९९४: पीटर लोको बुद्धिबळातील सगळ्यात लहान ग्रँडमास्टर झाला.
  • २००२: भारतातील गरीब मुलांवर जवळजवळ ५७ हजार प्लॅस्टिक सर्जरी करणारे अनिवासी भारतीय डॉक्टर शरदकुमार दीक्षित यांना एनआरआय ऑफ द इयर २००१ हा पुरस्कार जाहीर.

जन्म/वाढदिवस


  • १३३: मार्कस सेव्हेरस डिडियस ज्युलियानस, रोमन सम्राट.
  • १८५३: लेलँड होन, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
  • १९१०: चिदंबरम् सुब्रमण्यम्, भारतीय राजकारणी.
  • १९१३: डिकी फुलर, वेस्ट ईंडीझचा क्रिकेट खेळाडू.
  • १९२९: ह्यु टेफिल्ड, दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू.
  • १९४१: रिचर्ड चेनी, अमेरिकेचा उपराष्ट्राध्यक्ष.
  • १९४२: डेव्हिड ब्राउन, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
  • १९६१: रणजित मदुरासिंघे, श्रीलंकेचा क्रिकेट खेळाडू.

मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन


  • १६४९: चार्ल्स पहिला, इंग्लंडचा राजा.
  • १९४८: महात्मा गांधी.
  • १९४८: ऑर्व्हिल राइट, अमेरिकन विमानतंत्रज्ञ.
  • १९९६: गोविंदराव पटवर्धन, हार्मोनियम व ऑर्गन वादक.
  • २०००: आचार्य जनार्दन हरी चिंचाळकर, मानववंशशास्त्रज्ञ व सामाजिक कार्यकर्ते.
  • २००१: प्रा. वसंत कानेटकर, ज्येष्ठ नाटककार.
  • २००४: रमेश अणावकर, प्रसिद्ध गीतकार.

नुकतेच प्रकाशित नवीन लेखन

बाय - मराठी कथा | Bye - Marathi Katha

बाय

विभाग मराठी कथा

स्वभाव - मराठी कविता | Swabhav - Marathi Kavita

स्वभाव

विभाग मराठी कविता

आधार - मराठी कविता | Aadhar - Marathi Kavita

आधार

विभाग मराठी कविता

बायको - मराठी कविता | Baayko - Marathi Kavita

बायको

विभाग मराठी कविता

MarathiMati.com - Android App on Google Play Store