२६ जानेवारी दिनविशेष

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | २६ जानेवारी २०१३

२६ जानेवारी भारतीय प्रजासत्ताक दिन | Republic Day India

भारतीय प्रजासत्ताक दिन - भारतीय प्रजासत्ताक दिवस हा भारताच्या प्रजासत्ताकात दरवर्षी जानेवारी २६ या दिवशी पाळला जाणारा राष्ट्रीय दिन आहे. भारताची राज्यघटना संविधान समितीने २६ नोव्हेंबर, इ.स. १९४९ रोजी स्वीकारली व ती २६ जानेवारी इ.स. १९५० रोजी अंमलात आली. जवाहरलाल नेहरूंनी २६ जानेवारी इ.स. १९३० रोजी लाहोर अधिवेशनात तिरंगा फडकावून पूर्ण स्वराज्याची घोषणा केली होती. त्याची आठवण म्हणून २६ जानेवारी हा दिवस राज्यघटना अंमला आणण्यासाठी निवडण्यात आला.

जागतिक दिवस


 • प्रजासत्ताक दिन: भारत
 • जागतिक सीमा शुल्क दिन
 • ऑस्ट्रेलिया दिन: ऑस्ट्रेलिया.
 • मुक्ति दिन: युगांडा.

ठळक घटना/घडामोडी


 • १९५०: सारनाथ येथील अशोक स्तंभावरील सिंह शीर्ष हे ‘राष्ट्रीय चिन्ह’ म्हणून स्वीकारण्यात आले.
 • राष्ट्रपती म्हणून डॉ. राजेंद्रप्रसाद यांनी कार्यभाग स्वीकारला.
 • १९५६: डॉ. राजेंद्रप्रसाद यांना ‘भारतरत्न’ हा किताब मिळाला.
 • १९९६: फ्रान्सने आण्विक चाचणी घेतली.
 • १९६५: भारताने हिंदी भाषाला शासकीय भाषा जाहीर केले.
 • १९४९: भारताच्या राज्यघटनेचा पहिला मसुदा मंजूर झाला.

जन्म/वाढदिवस


 • १९१५: राणी गायडिनलू, ईशान्य भारतातील वीरांगना. ‘राणी’ ही पदवी त्यांना नेहरूंनी दिली. त्यांच्या स्मरणार्थ स्त्री शक्ती पुरस्कार दिला जातो.
 • १९१९: खानमोहम्मद इब्राहीम, भारतीय क्रिकेट खेळाडू.
 • १९५७: शिवलाल यादव, भारतीय क्रिकेट खेळाडू.
 • १९५७: अशोक मल्होत्रा, भारतीय क्रिकेट खेळाडू.

मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन


 • १६३०: हेन्री ब्रिग्ज, लघुगणकसारिणी (लॉगॅरिदम टेबल्स) तयार करण्यात मोठा वाटा असणारा इंग्लिश गणितज्ञ.
 • १८८५: एडवर्ड डेव्ही, ब्रिटीश संशोधक, भौतिकशास्त्रज्ञ.