२ जानेवारी दिनविशेष

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | २ जानेवारी २०१३

फर्ग्युसन कॉलेज, पुणे

फर्ग्युसन कॉलेज, पुणे - फर्ग्युसन महाविद्यालय पुण्यातील जुने व प्रख्यात महाविद्यालय आहे. हे महाविद्यालय डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे असून याची स्थापना १८८५ साली झाली. या महाविद्यालयात शास्त्र व कला विभागाचे कनिष्ठ, व बॅचलरची पदवी देणारे वरिष्ठ महाविद्यालय आहे. सन २००३ मध्ये इंडिया टाइम्सने केलेल्या सर्वेक्षणानुसार या कला व शास्त्राच्या वरिष्ठ महाविद्यालयाची, भारतातील पहिल्या दहा महाविद्यालयांत गणना होते. लोकमान्य टिळक व समाजसुधारक गोपाळ गणेश आगरकर यांच्या पुढाकाराने या महाविद्यालयाची स्थापना झाली. एकापेक्षा अधिक भारताच्या पंतप्रधानांनी जिथे आपले शिक्षण पूर्ण केले, असे हे भारतातील एकमेव महाविद्यालय आहे.

जागतिक दिवस


 • धुम्रपान विरोधी दिन

ठळक घटना/घडामोडी


 • १७५७: ब्रिटीश ईस्ट ईंडीया कंपनीने कोलकाता काबीज केले.
 • १८८५: पुणे येथे फर्ग्युसन कॉलेज सुरु.
 • १९४२: दुसरे महायुद्ध - जपानने फिलिपाईन्सची राजधानी मनिला जिंकली.
 • १९४६: आल्बेनियाच्या राजा झॉगने राज्यत्याग केला.
 • १९५५: पनामाच्या राष्ट्राध्यक्ष होजे अँतोनियो रेमोनची हत्या.
 • १९५९: सोवियेत संघाने लुना १ या अंतराळयानाचे चंद्राकडे प्रक्षेपण केले.
 • १९७१: इब्रॉक्सच्या दुसर्‍या दुर्घटनेत ६६ प्रेक्षक ठार.
 • १९७४: अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष रिचर्ड निक्सनने अमेरिकेतील पेट्रोलचा वापर कमी करण्यासाठी तेथील महामार्गांवरील गतिमर्यादा कमी करून ताशी ५५ मैल (८९ किमी) केली.
 • १९९९: अमेरिकेच्या मध्य भगातील हिमवादळात मिलवॉकीमध्ये १४ इंच तर शिकागोमध्ये १९ इंच हिम पडला. शिकागोत तापमान -१३ °F (-२५ °C) इतके खाली गेले. ६८ मृत्यू.
 • २००१: एदुआर्दो दुहाल्दे आर्जेन्टिनाच्या राष्ट्राध्यक्षपदी.
 • २००६: अमेरिकेच्या वेस्ट व्हर्जिनिया राज्यातील सेगो येथील कोळशाच्या खाणीत अपघात होउन १२ कामगार ठार तर एक गंभीररीत्या जखमी.

जन्म/वाढदिवस


 • १६४२: महमद चौथा, ऑट्टोमन सुलतान.
 • १९१०: श्रीरंगम श्रीनिवासराव, तेलुगू कवी.
 • १९४२: डेनिस हॅस्टर्ट, अमेरिकन राजकारणी.
 • १९५९: किर्ती आझाद, भारतीय क्रिकेट खेळाडू.
 • १९६०: रमण लांबा, भारतीय क्रिकेट खेळाडू.
 • १९६४: रुमेश रत्नायके, श्रीलंकेचा क्रिकेट खेळाडू.
 • १९७०: अँथनी स्टुअर्ट, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
 • १९७३: जॉन बेनॉ, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.

मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन


 • १९११: जी डेव्हिडसन, विख्यात खनिज शास्त्रज्ञ व शिल्पकार.
 • १९४४: महर्षी विठ्ठल रामजी शिंदे, मराठी समाजसुधारक, धर्मसुधारक.
 • १९४६: ज्यो डार्लिंग, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
 • १९९५: सियाद बारे, सोमालियाचा राष्ट्राध्यक्ष.