MarathiMati.com - Android App on Google Play Store

१६ जानेवारी दिनविशेष

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | १६ जानेवारी २०१३

१६ जानेवारी दिनविशेष(January 16 in History) ठळक घटना, घडामोडी, जन्म(वाढदिवस), मृत्यू(पुण्यतिथी, स्मृतीदिन) आणि जागतिक दिवस.

बाबूराव पेंटर

बाबूराव पेंटर - (३ जून, १८९० - १६ जानेवारी १९५४) बाबूराव पेंटर यांचा जन्म कोल्हापूर येथे झाला. त्यांचे मूळ नाव बाबूराव कृष्णराव मेस्त्री असे होते. चित्रकला व शिल्पकला यांचे धडे त्यांना त्यांच्या वडिलांकडून मिळाले. सुरुवातीला ते तैलचित्रे काढत. गंधर्व नाटक कंपनीच्या रंगवलेल्या पडद्यांमुळे बाबूराव पेंटर यांची कलाक्षेत्रात एक वेगळी ओळख निर्माण झाली.

जागतिक दिवस


 • मार्टिन लुथर किंग दिन : अमेरिका.
 • शिक्षक दिन : थायलंड.

ठळक घटना, घडामोडी


 • १६८१ : संभाजी राजेंचा छत्रपती म्हणून राज्यभिषेक झाला.
 • १९४१ : नेताजी सुभाषचंद्राचे देशाबाहेर प्रयाण झाले.
 • १९९५ : आयएनएस विद्युत या संपूर्ण देशी बनावटीच्या क्षेपणास्त्र नौकेचे गोवा येथे जलावतरण.
 • १९९६ : भारतीय कापड गिरणी कामगार नेता दत्ता सामंतची हत्या.
 • १९१९ : अमेरिकेचे संविधान सुधारून संपूर्ण राष्ट्रात दारूबंदी जाहीर करण्यात आली.
 • १९५५ : नॅशनल डिफेन्स अकॅडमी इमारतीचे मुंबई राज्याचे मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांच्या हस्ते उदघाट्न.
 • २००८ : टाटा मोटर्सच्या, ‘नॅनो’ या एक लाख रुपये किंमतीच्या ‘पीपल्स कार’चे अनावरण

जन्म, वाढदिवस


मृत्यू, पुण्यतिथी, स्मृतीदिन


 • १९०१ : सुप्रसिध्द अर्थशास्त्रज्ञ व न्यायमुर्ती महादेव रानडे
 • १९३८ : बंगाली कादंबरीकार शरदचंद्र चटर्जी
 • १९८८ : अर्थशास्त्रज्ञ लक्ष्मीकांत झा
 • १९५४ : धुण्याचा सोडा शोधणार्‍या निकोलस लेब्लॅक
 • १९३८ : शरत् चंद्र चतर्जी, बांगला साहित्यिक, स्वातंत्र्यसैनिक.
 • १९५४ : बाबूराव पेंटर, भारतीय चित्रपटनिर्माता, चित्रकार, शिल्पकार.
 • २००१ : पंडितराव बोरस्ते, भारतीय क्रीडा संघटक, शिवछत्रपती पुरस्कार विजेता.
 • २००३ : रामविलास जगन्नाथ राठी, भारतीय उद्योगपती.
 • २००५ : श्रीकृष्ण हरी मेहेंदळे, मराठी संगीतकार. पेटीवाले मेहेंदळे म्हणून ख्याती.
MarathiMati.com - Android App on Google Play Store