Download MarathiMati.com's New Android App from Google Play

१५ जानेवारी दिनविशेष

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | १५ जानेवारी २०१३

१५ जानेवारी दिनविशेष(January 15 in History) ठळक घटना, घडामोडी, जन्म(वाढदिवस), मृत्यू(पुण्यतिथी, स्मृतीदिन) आणि जागतिक दिवस.

खाशाबा जाधव

खाशाबा जाधव - (जानेवारी १५, इ.स. १९२६ - ऑगस्ट १४, इ.स. १९८४) हे ऑलिंपिकपदकविजेते मराठी, भारतीय कुस्तीगीर होते. इ.स. १९५२ सालातल्या ऑलिंपिकमध्ये त्यांनी जिंकलेले फ्रीस्टाइल कुस्तीतले कांस्यपदक हे भारतासाठी स्वातंत्र्योत्तर काळातले पहिले वैयक्तिक पदक होते. जाधवांनी इ.स. १९४८ सालातील लंडन उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धांमध्ये फ्लायवेट वजनगटातील कुस्तीत सहावा क्रमांक मिळवला. इ.स. १९५२ सालातील हेलसिंकी उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धांमध्ये ५२ किलोग्रॅम वजनगटात फ्रीस्टाइल प्रकारांतर्गत कांस्यपदक जिंकले.

जागतिक दिवस


  • लष्कर दिन
  • जॉन चिलेम्ब्वे दिन : मलावी.
  • कोरियन लिपी दिन : उत्तर कोरिया.

ठळक घटना/घडामोडी


  • १७६१ : पानिपतचे तिसरे युध्द संपले
  • १९१९ : छत्रपती शाहू महाराजांनी स्पृश-अस्पृशांना एकत्रित शिक्षण व्यवस्था सुरु केली.
  • १९९६ : भारतातील रेल्वेयुगाच्या प्रारंभापासून ब्रिटिश परंपरा, संस्कृतीचा डौल मिरवणाऱ्या बोरीबंदर (व्हिक्टोरिया टर्मिनस) या स्थानकाचे नाव छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस असे करण्यात आले.
  • १९९९ : ज्येष्ठ गायिका ज्योत्स्ना भोळे यांना राज्य सरकारच्या वतीने गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान.

जन्म/वाढदिवस


मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन


Download MarathiMati.com's New Android App from Google Play