११ जानेवारी दिनविशेष

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | ११ जानेवारी २०१३

११ जानेवारी दिनविशेष(January 11 in History) ठळक घटना, घडामोडी, जन्म(वाढदिवस), मृत्यू(पुण्यतिथी, स्मृतीदिन) आणि जागतिक दिवस.

लाल बहादूर शास्त्री

लालबहादूर शास्त्री - (२ ऑक्टोबर, इ.स. १९०४ - ११ जानेवारी, इ.स. १९६६) हे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील स्वातंत्र्यसैनिक व भारतीय प्रजासत्ताकाचे दुसरे पंतप्रधान होते. ९ जून, इ.स. १९६४ रोजी यांनी पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतली. यांच्या कार्यकाळात इ.स. १९६५सालचे दुसरे भारत-पाकिस्तान युद्ध घडले. सोव्हियेत संघाच्या मध्यस्थीने पाकिस्तानबरोबर युद्धबंदीचा ताश्कंद करार करण्यासाठी ताश्कंद (तत्कालीन सोव्हियेत संघात, वर्तमान उझबेकिस्तानात) येथे दौऱ्यावर असताना ११ जानेवारी, इ.स. १९६६ रोजी यांचा हृदयविकाराचे दोन झटके येऊन मृत्यू झाला.

जागतिक दिवस


 • प्रजासत्ताक दिन : आल्बेनिया.
 • एकता दिन : नेपाळ.
 • स्वतंत्रता संघर्ष दिन : मोरोक्को.

ठळक घटना/घडामोडी


 • १९१६ : नेल्सन मंडेला यांना इंदिरा गांधी शांतता पुरस्कार देण्यात आला.
 • १९२२ : मधुमेहाच्या रुग्णावर प्रथमतः इन्सुलिनचा प्रयोग केला गेला.

जन्म/वाढदिवस


 • १८९८ : ‘ज्ञानपीठ’ पुरस्कार विजेते, मराठीतील विख्यात साहित्यिक वि.स. खांडेकर (विष्णु सखाराम खांडेकर).
 • १८५८ : श्रीधर पाठक, हिंदी साहित्यिक.
 • १९४४ : शिबु सोरेन, भारतीय राजकारणी.
 • १९५४ : बोनी कपूर, हिंदी चित्रपट दिग्दर्शक.
 • १९७३ : राहुल द्रविड, भारतीय क्रिकेट खेळाडू.
 • १३२२ : कोम्यो, जपानी सम्राट.
 • १३५९ : गो:एन्यु, जपानी सम्राट.
 • १७५५ : अलेक्झांडर हॅमिल्टन, अमेरिकेचा पहिला खजिनदार.
 • १८०७ : एझ्रा कॉर्नेल, अमेरिकन उद्योगपती, कॉर्नेल युनिव्हर्सिटीचा संस्थापक.
 • १८१५ : जॉन ए. मॅकडोनाल्ड, कॅनडाचा पहिला पंतप्रधान.
 • १८५९ : जॉर्ज नथानियेल कर्झन, ब्रिटीश राजकारणी भारतातील इंग्लंडचा व्हाइसरॉय.
 • १८६२ : फ्रँक सग, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
 • १९०३ : जॅक सीडल, दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू.
 • १९०६ : आल्बर्ट हॉफमन, स्वित्झर्लंडचा रसायनशास्त्रज्ञ.
 • १९११ : झेन्को सुझुकी, जपानी पंतप्रधान.
 • १९२७ : जॉनी हेस, न्यू झीलँडचा क्रिकेट खेळाडू.
 • १९३४ : ज्याँ क्रेटिएन, कॅनडाचा विसावा पंतप्रधान.
 • १९७१ : सजीव डिसिल्वा, श्रीलंकेचा क्रिकेट खेळाडू.

मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन