१ जानेवारी दिनविशेष

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | १ जानेवारी २०१३
रघुनाथ अनंत माशेलकर | Raghunath Anant Mashelkar
छायाचित्र: हर्षद खंदारे

रघुनाथ अनंत माशेलकर - (१ जानेवारी १९४३ माशेल, गोवा) पद्मश्री, पद्मभूषण पुरस्कार विजेते रघुनाथ अनंत माशेलकर हे वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन महामंडळ (CSIR) या संघटनेचे माजी अध्यक्ष होते.

जागतिक दिवस


 • ख्रिस्ती वर्षारंभ दिन.

ठळक घटना/घडामोडी


 • १८६२: इंडियन पीनल कोड अस्तित्वात आले.
 • १९१९: गव्हर्नमेंट ऑफ इंडिया अ‍ॅक्ट अमंलात आला व देशात कायदेमंडळे स्थापन झाली.
 • १९३२: ना. भि. परुळेकर (नारायण भिकाजी परुळेकर) यांनी ‘सकाळ’ हे वृत्तपत्र सुरु केले.
 • २०१०: आत्मघातकी दहशतवाद्याने पाकिस्तानच्या लक्की मारवात गावात चालू असलेल्या व्हॉलीबॉल स्पर्धेच्या ठिकाणी कारबॉम्ब स्फोट केला. १०५ ठार, १०० जखमी.
 • २०१३: कोट दि आईव्होरच्या आबिजान शहरात नवीन वर्षाच्या स्वागतासाठी जमलेल्या गर्दीत चेंगराचेंगरी होउन ६० व्यक्ती ठार, २०० जखमी.

जन्म/वाढदिवस


 • १८९२: महादेव हरिभाई देसाई गांधीवादी कार्यकर्ते.
 • १८९४: सत्येंद्रनाथ बोस भारतीय भौतिकशास्त्रज्ञ.
 • १९०२: कमलाकांत वामन केळकर भारतीय भूवैज्ञानिक.
 • १९३६: राजा राजवाडे, साहित्यिक.
 • १९४३: रघुनाथ अनंत माशेलकर(रमेश माशेलकर), पद्मश्री, पद्मभूषण पुरस्कार विजेते.

मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन