जानेवारी महिन्यातील दिनविशेष

जानेवारी महिन्यातील दिनविशेष | January Month in History

जानेवारी महिन्यातील दिनविशेष - [January Month in History] जानेवारी महिन्यातील ठळक घटना/घडामोडी, जन्म/वाढदिवस, मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन आणि जागतिक दिवस यांची माहिती.

रघुनाथ अनंत माशेलकर | Raghunath Anant Mashelkar

१ जानेवारी दिनविशेष

जानेवारी

रघुनाथ अनंत माशेलकर - (१ जानेवारी १९४३) पद्मश्री, पद्मभूषण पुरस्कार विजेते रघुनाथ अनंत माशेलकर हे वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन महामंडळ (CSIR) या संघटनेचे माजी अध्यक्ष होते.

अधिक वाचा

फर्ग्युसन कॉलेज, पुणे | Fergusson College, Pune

२ जानेवारी दिनविशेष

जानेवारी

फर्ग्युसन महाविद्यालय पुण्यातील जुने व प्रख्यात महाविद्यालय आहे. हे महाविद्यालय डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे असून याची स्थापना १८८५ साली झाली. या महाविद्यालयात शास्त्र व कला विभागाचे कनिष्ठ, व बॅचलरची पदवी देणारे वरिष्ठ महाविद्यालय आहे.

अधिक वाचा

सावित्रीबाई फुले | Savitribai Phule

३ जानेवारी दिनविशेष

जानेवारी

सावित्रीबाई फुले - (३ जानेवारी १८३१ - १० मार्च १८९७) या मराठी शिक्षणप्रसारक, समाजसुधारक महिला होत्या. महाराष्ट्रातील स्त्रीशिक्षणाच्या आरंभिक टप्प्यात त्यांचे पती ज्योतिराव फुले यांच्यासह त्यांनी महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली.

अधिक वाचा

राहुल देव बर्मन (आर. डी. बर्मन) | R. D. Burman

४ जानेवारी दिनविशेष

जानेवारी

राहुल देव बर्मन - (२७ जून १९३९ - ४ जानेवारी १९९४) आर. डी. बर्मन हे एक भारतीय संगीत दिग्दर्शक होते. आर.डी. बर्मन यांना बॉलिवूडमधील सर्वश्रेष्ठ संगीतकारांपैकी एक मानले जाते.

अधिक वाचा

रामचंद्र नरहर चितळकर(सी.रामचंद्र) | C. Ramachandra

५ जानेवारी दिनविशेष

जानेवारी

रामचंद्र नरहर चितळकर - (१२ जानेवारी १९१८ – ५ जानेवारी १९८२) हिंदी चित्रपटसृष्टीतील विख्यात संगीतदिग्दर्शक व पार्श्वगायक होते. यांनी संगीतबद्घ केलेली काही हिंदी चित्रपटगीते उत्कृष्ट व अविस्मरणीय ठरली.

अधिक वाचा