७ फेब्रुवारी दिनविशेष

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | ७ फेब्रुवारी २०१८
७ फेब्रुवारी दिनविशेष | February 7 in History
रमाकांत आचरेकर, छायाचित्र: मराठीमाती आर्काईव्ह

रमाकांत आचरेकर - (१९३२ - हयात) हे मराठी क्रिकेट प्रशिक्षक आहेत. भारतीय फलंदाज सचिन तेंडुलकर याचे मार्गदर्शक म्हणून त्यांची विशेष ओळख आहे. फेब्रुवारी ७ २००३ रोजी महाराष्ट्र शासनातर्फे क्रीडामहर्षींचा गौरव करण्यासाठी दिला जाणारा श्री शिवछत्रपती जीवनगौरव पुरस्कार त्यांना जाहीर करण्यात आला.

जागतिक दिवस


 • स्वातंत्र्य दिन: ग्रेनेडा.

ठळक घटना/घडामोडी


 • ४५७: लिओ पहिला बायझेन्टाईन सम्राटपदी.
 • १५५०: ज्युलियस तिसरा पोपपदी.
 • १६१३: मिखाइल रोमानोव्ह रशियाच्या झारपदी.
 • १८४२: डेबर टॅबरची लढाई - इथियोपियाने सेमियेनच्या सैन्याला परतवले.
 • १८६३: एच.एम.एस. ऑर्फियुस हे जहाज न्यू झीलँडमध्ये ऑकलंडजवळ बुडाले. १८९ ठार.
 • १९०४: बाल्टिमोर मध्ये आग. ३० तासात १,५०० ईमारती भस्मसात.
 • १९४२: क्रोएशियातील बान्या लुका गावात नाझींनी ५५१ मुलांसह २,३०० नागरिकांना मारले.
 • १९४४: दुसरे महायुद्ध - इटलीतील ऍन्झियो गावातून नाझींनी दोस्त राष्ट्रांवर प्रतिहल्ला सुरू केला.
 • १९४८: पुण्यात नगरवाचन मंदिराची स्थापना झाली.
 • १९६२: अमेरिकेने क्युबाशी व्यापारी संबंध तोडले.
 • १९६७: अलाबामात माँटगोमरीतील हॉटेलला आग. २५ ठार.
 • १९७१: स्वित्झर्लंडमध्ये स्त्रियांनाही मतदानाचा अधिकार दिला गेला.
 • १९७४: ग्रेनेडाला युनायटेड किंग्डमपासून स्वातंत्र्य.
 • १९७७: सोवियेत संघाने सोयुझ २४ हे अंतराळयान प्रक्षेपित केले.
 • १९७९: प्लुटो नेपच्यून पेक्षा सूर्याच्या जवळ.
 • १९८६: हैतीच्या हुकुमशहा ज्याँ क्लॉड डुव्हालियरने देशातून पळ काढला.
 • १९८८: युगोस्लाव्हियाने डेव्हिस टेनिस कप जिंकला.
 • १९९१: हैतीत पहिल्यांदाच निवडलेल्या अध्यक्षाची सद्दी. ज्याँ-बर्ट्रांड अरिस्टिड राष्ट्राध्यक्षपदी.
 • १९९१: आय.आर.ए.ने युनायटेड किंग्डमच्या पंतप्रधानांच्या निवासस्थानावर (१०, डाउनिंग स्ट्रीट)वर हल्ला केला.
 • १९९२: युरोपीय संघाची रचना.
 • १९९५: इ.स. १९९३च्या वर्ल्ड ट्रेड सेंटरवरील हल्ल्याच्या सूत्रधार राम्झी युसुफला पाकिस्तानात इस्लामाबाद येथे अटक.
 • १९९८: जपानमध्ये नागानो शहरात १९९८ हिवाळी ऑलिंपिक सुरू.
 • १९९९: जॉर्डनचा राजा हुसेनच्या मृत्युनंतर युवराज अब्दुल्ला राजेपदी.
 • २००३: महाराष्ट्र शासनातर्फे क्रीडामहर्षींचा गौरव करण्यासाठी दिला जाणारा श्री शिवछत्रपती जीवनगौरव पुरस्कार सचिन तेंडुलकरचे मार्गदर्शक रमाकांत आचरेकर यांना जाहीर.

जन्म/वाढदिवस


 • १६९३: ऍना, रशियाची सम्राज्ञी.
 • १६९३: ऍना, रशियाची सम्राज्ञी.
 • १८१२: चार्ल्स डिकन्स, इंग्लिश लेखक.
 • १८५७: आल्फ्रेड लिटलटन, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
 • १८७७: गॉडफ्रे हॅरोल्ड हार्डी, इंग्लिश गणितज्ञ.
 • १९०६: ओलेग अँतोनोव्ह, रशियन विमानशास्त्रज्ञ.
 • १९०६: पुयी, चीनी सम्राट.
 • १९१४: रमोन मर्काडेर, लिओन ट्रॉट्स्कीचा मारेकरी.
 • १९२१: एथॉल रोवन, दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू.
 • १९३८: एस. रामचंद्रन पिल्ले, भारतीय कम्युनिस्ट पक्षातील नेता.
 • १९४०: टोनी तान केंग याम, सिंगापुरी राजकारणी व सिंगापूरच्या प्रजासत्ताकाचा ७वा राष्ट्राध्यक्ष.
 • १९७२: रायन कॅम्पबेल, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
 • मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन


  • १०४५: गो-सुझाकु, जपानी सम्राट.
  • १७९९: क्वियान्लॉँग, चीनी सम्राट.
  • १८३७: गुस्ताफ चौथा ऍडोल्फ, स्वीडनचा राजा.
  • १८७८: पोप पायस नववा.
  • १९९९: हुसेन, जॉर्डनचा राजा.
  • २००३: जीवनराव सावंत, ज्येष्ठ कामगार नेते.