पर्यावरणपूरक गणेशोत्सव | Eco-friendly Ganeshotsav

६ फेब्रुवारी दिनविशेष

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | ६ फेब्रुवारी २०१३

६ फेब्रुवारी दिनविशेष(February 6 in History) ठळक घटना, घडामोडी, जन्म(वाढदिवस), मृत्यू(पुण्यतिथी, स्मृतीदिन) आणि जागतिक दिवस.

अयोध्येचा राजा : हा ६ फेब्रुवारी इ.स. १९३२ रोजी प्रदर्शित झालेला मराठी भाषेतील बोलपट होता. हा मराठीत बनलेला पहिला बोलपट आहे. व्ही. शांताराम यांनी दिग्दर्शिलेल्या या चित्रपटाची निर्मिती प्रभात फिल्म कंपनीने केली. गोविंदराव टेंबे, दुर्गा खोटे, बाबूराव पेंढारकर, मास्टर विनायक यांनी या चित्रपटात प्रमुख भूमिका केल्या होत्या.

जागतिक दिवस


  • वैतंगी दिन : न्यू झीलँड.
  • बॉब मार्ली दिन : जमैका, इथियोपिया.

ठळक घटना/घडामोडी


  • १९३२ : दादासाहेब फाळके यांचा ’अयोध्येचा राजा (चित्रपट)’ हा पहिला मराठी बोलपट मुंबईच्या मॅजेस्टिक चित्रपटगृहात प्रदर्शित झाला.
  • २००१ : सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करण्यास आणि तंबाखूपासून बनविण्यात आलेल्या सर्व उत्पादनांची जाहिरात करण्य़ावर बंदी घालणार्‍या ‘तंबाखू उत्पादने’ विधेयकाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी.
  • २००१ : पश्चिम रेल्वेचे मुख्यालय असलेल्या चर्चगेटच्या इमारतीला शंभर वर्षे पूर्ण झाल्याबद्दल डाक विभागातर्फे टपाल तिकीट प्रसिद्ध.
  • २००३ : संत तुकाराम महाराज यांचे चित्र असलेल्या नाण्याचे प्रकाशन नवी दिल्ली येथील विज्ञान भवनात पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचा हस्ते करण्यात आले.

जन्म/वाढदिवस


  • १९१२ : एव्हा ब्राउन, ऍडोल्फ हिटलरची सोबतीण.

मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन


Book Home in Konkan