५ फेब्रुवारी दिनविशेष

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | ५ फेब्रुवारी २०१८
५ फेब्रुवारी दिनविशेष | February 5 in History
अभिषेक बच्चन, छायाचित्र: मराठीमाती आर्काईव्ह

अभिषेक बच्चन - (५ फेब्रुवारी १९७६) हा भारतामधील एक आघाडीचा सिने-अभिनेता व निर्माता आहे. बॉलिवूड सुपरस्टार अमिताभ बच्चन व जया बच्चन ह्यांचा मुलगा असलेल्या अभिषेकने २००० सालच्या रेफ्युजी ह्या चित्रपटामधून आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरूवात केली.

जागतिक दिवस


 • मौखिक आरोग्य दिवस

ठळक घटना/घडामोडी


 • १२९४: देवगिरीच्या यादव साम्राज्याचा अस्त झाला.
 • १६६४: शिवरायांनी आपले ठाण रायगडावर मातोश्री जिजाबाईच्या सहवासात मांडले.
 • १९२२: चौरीचौरा पोलिस ठाण्यावर सत्याग्रहीनी हल्लाकरुन जाळपोळ केली.
 • १९२२: रीडर्स डायजेस्टचा पहिला अंक प्रसिद्ध.
 • १९५८: टायबी नावाचा हायड्रोजन बॉम्ब अमेरिकेच्या वायुसेनेने हरवला. हा बॉम्ब अमेरिकेने कायमचे हरवलेल्या चार आण्विक हत्यारांपैकी एक आहे.
 • १९६४: पुणे विद्यापिठाने वॄत्तपत्रविद्या अभ्यासक्रम सुरु करण्याचा निर्णय घेतला.
 • १९९६: मुंबई येथील चौथ्या आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सवात 'सोना माटी' या भारतीय लघुपटाने सुवर्णपदक पटकावले.
 • २००३: अंतराळवीर कल्पना चावला यांचे नाव भारताने २००२ मध्ये सोडलेल्या पीएसएलव्ही सी-४ या हवामानविषयक उपग्रहाला देण्यात आल्याची पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची घोषणा.
 • २०००: रशियाच्या सैन्याने चेच्न्यातील ग्रोझ्नी शहराजवळ ६० नागरिकांना ठार मारले.
 • २००४: पुण्याच्या स्वाती घाटेने वूमन ग्रँडमास्टर किताबाचा तिसरा व शेवटचा नॉर्म संपादन केला.
 • २००४: इंग्लंडच्या मोरेकांबेच्या खाडीत अचानक मोठी भरती येउन ३५ शिंपले वेचणारे अडकले. त्यातील २३ मृत्युमुखी पडले.
 • २००८: अमेरिकेच्या दक्षिण भागात टोरनॅडोंचा उत्पात. ५७ ठार.

जन्म/वाढदिवस


 • ९७६: सांजो, जपानी सम्राट.
 • १७८८: रॉबर्ट पील, युनायटेड किंग्डमचा पंतप्रधान.
 • १८८९: अर्नेस्ट टिल्डेस्ली, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
 • १९००: अडलाई स्टीवन्सन, अमेरिकन राजकारणी.
 • १९३६: बाबा महाराज सातारकर (नीळकंठ ज्ञानेक्ष्वर गोरे), महाराष्ट्रातील सुप्रसिध्द कीर्तनकार आणि प्रवचनकार.
 • १९४५: शालट रामपलान.
 • १९७६: अभिषेक बच्चन, भारतीय चित्रपट अभिनेता.

मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन


 • १९२०: विष्णुबुवा जोग, वारकरी संप्रदायाचे कार्य पुढे नेणारे.
 • १९१७: जबर अल-मुबारक अल-सबाह दुसरा, कुवैतचा अमीर.
 • २०००: वैद्य माधवशास्त्री जोशी, महाराष्ट्र आयुर्वेद महासंमेलनाचे माजी अध्यक्ष.
 • २००३: गणेश गद्रे, ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत.