२४ फेब्रुवारी दिनविशेष

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | २४ फेब्रुवारी २०१८
२४ फेब्रुवारी दिनविशेष | February 24 in History
ललिता पवार, छायाचित्र: मराठीमाती आर्काईव्ह

ललिता पवार - (१८ एप्रिल १९१६ - २४ फेब्रुवारी १९९८) ह्या एक भारतीय सिने - अभिनेत्री होत्या. सुरुवातीच्या काळात मराठी चित्रपटसृष्टीमध्ये नायिकेच्या भूमिका करणाऱ्या ललिता पवार यांनी नेताजी पालकर, संत दामाजी, अमृत, गोरा कुंभार इत्यादी यशस्वी मराठी चित्रपटांमध्ये कामे केली होती.

जागतिक दिवस


 • केंद्रीय उत्पादनशुल्क दिन.

ठळक घटना/घडामोडी


 • १५८२: पोप ग्रेगोरी तेराव्याने ग्रेगरी दिनदर्शिका प्रदर्शित केली.
 • १७३९: कर्नालची लढाई - नादीरशहाचा मुघल सैन्यावर विजय.
 • १८२६: यांदाबूचा तह - म्यानमार व इंग्लिश सैन्यातील लढाई थांबली.
 • १८३१: डान्सिंग रॅबिट क्रीकचा करार - अमेरिकेतील चॉक्टाओ जमातीने मिसिसिपी नदीच्या पूर्वेकडील भाग अमेरिकेला दिला.
 • १८४५: फ्रांसचा राजा लुई - फिलिपने पदत्याग केला.
 • १८६८: अमेरिकेच्या अध्यक्ष अँड्रु जॉन्सनवर अमेरिकन काँग्रेसने महाभियोग सुरू केला. अंततः जॉन्सन निर्दोष ठरला.
 • १९१८: एस्टोनियाने रशिया पासून स्वातंत्र्य जाहीर केले.
 • १९३८: दु पॉँतने नायलॉनचा दात घासण्याचा ब्रश विकण्यास सुरूवात केली.
 • १९४२: व्हॉइस ऑफ अमेरिकाचे प्रसारण सुरू.
 • १९४५: ईजिप्तच्या पंतप्रधान अहमद मेहेर पाशाची संसदेत कामकाज चालू असताना हत्या.
 • १९४६: हुआन पेरॉन आर्जेन्टिनाच्या अध्यक्षपदी निवडून आला.
 • १९६८: व्हियेतनाम युद्ध-टेटचा हल्ला - दक्षिण व्हियेतनामने ह्युए शहर जिंकले.
 • १९७६: क्युबाने नवीन संविधान अंगिकारले.
 • १९८९: रुहोल्ला खोमेनीने सलमान रश्दीला ठार करण्याबद्दल ३०,००,००० अमेरिकन डॉलरचे बक्षीस जाहीर केले.
 • १९८९: युनायटेड एरलाइन्स फ्लाइट ८११ या विमानास हवेत असताना भगदाड पडले. ९ प्रवासी खाली फेकले गेले.
 • १९९९: चायना सदर्न एरलाइन्सचे टी.यु.१५४ प्रकारचे विमान चीनच्या वेन्झू विमानतळावर कोसळले. ६१ ठार.
 • २००६: फिलिपाईन्समध्ये लश्कर उठाव करणार असल्याची कुणकुण लागल्याने राष्ट्राध्यक्ष ग्लोरिया मॅकापगाल-अरोयोने देशात आणीबाणी लागू केली.

जन्म/वाढदिवस


 • ११०३: टोबा, जपानी सम्राट.
 • १३०४: इब्न बतुता, मोरोक्कोचा शोधक.
 • १४८३: बाबर.
 • १५००: चार्ल्स पाचवा, पवित्र रोमन सम्राट.
 • १५००: पोप क्लेमेंट आठवा.
 • १५५७: मथियास, पवित्र रोमन सम्राट.
 • १८८५: चेस्टर निमित्झ, अमेरिकन दर्यासारंग(ॲडमिरल).
 • १९३४: बेट्टिनो क्रॅक्सी, इटलीचा पंतप्रधान.
 • १९४२: जोसेफ लीबरमन, अमेरिकन राजकारणी.
 • १९४८: जे. जयललिता, तमिळनाडूची मुख्यमंत्री.
 • १९५५: स्टीव जॉब्स, ॲपल कम्प्युटर्सचा संस्थापक.

मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन


 • ६१६: एथेलबर्ट, इंग्लंडचा राजा.
 • १७७७: जोसेफ पहिला, पोर्तुगालचा राजा.
 • १७७९: पॉल डॅनियल लॉँगोलियस, जर्मन ज्ञानकोशकार.
 • १८१०: हेन्री कॅव्हेंडिश, इंग्लिश संशोधक.
 • १८१५: रॉबर्ट फ़ुलटोन, वाफेवर चालणारे जहाज व पाणबुडी संशोधक.
 • १९२५: ह्यालमार ब्रँटिंग, स्वीडनचा पंतप्रधान.
 • १९३६: लक्ष्मीबाई टिळक.
 • १९७५: निकोलाइ बुल्गॅनिन, सोवियेत संघाचा राष्ट्राध्यक्ष.
 • १९९८: ललिता पवार, भारतीय अभिनेत्री.