२२ फेब्रुवारी दिनविशेष

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | २२ फेब्रुवारी २०१८
२२ फेब्रुवारी दिनविशेष | February 22 in History
कस्तुरबा गांधी, छायाचित्र: मराठीमाती आर्काईव्ह

कस्तुरबा गांधी - (११ एप्रिल १८६९ - २२ फेब्रुवारी, १९४४) या महात्मा गांधी यांच्या पत्नी होत्या. त्यांना प्रेमाने बा असे संबोधले जायचे.

जागतिक दिवस


 • आंतरराष्ट्रीय स्काउट दिवस.

ठळक घटना/घडामोडी


 • १२९०: इजिप्तचा फेरो राम्सेस दुसर्‍याचा राज्याभिषेक.
 • १२८१: मार्टिन चौथा पोप पदी.
 • १२८८: निकोलस चौथा पोप पदी.
 • १४९५: फ्रांसचा चार्ल्स आठव्याने नेपल्सचे राज्य बळकावले.
 • १७४४: तुलोनची लढाई सुरू.
 • १८१९: स्पेनने फ्लोरिडाचा प्रदेश अमेरिकेला ५०,००,००० अमेरिकन डॉलरच्या मोबदल्यात विकला.
 • १८४७: बोयना व्हिस्ताची लढाई - अमेरिकेच्या ५,००० सैनिकांनी मेक्सिकोच्या १५,००० सैनिकांना पळवून लावले.
 • १८५७: रत्नागिरीत `पतित पावन' मंदिरांची स्थापना झाली.
 • १८६५: टेनेसीने नवीन संविधान अंगिकारले व गुलामगिरी बेकायदा ठरवली.
 • १८८९: उत्तर डाकोटा, दक्षिण डाकोटा, मॉँटाना व वॉशिंग्टन अमेरिकेची राज्ये झाली.
 • १९३१: स्वा. सावरकर व भागोजी शेठ यांच्या पुढाकाराने अस्पृश्यादी सर्व जातींना मुक्त प्रवेश असणाऱ्या पतितपावन मंदिर व देवालयाची स्थापना.
 • १९४२: दुसरे महायुद्ध - फिलिपाईन्समध्ये पराभव अटळ दिसताना अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष फ्रँकलिन डिलानो रूझवेल्टने जनरल डग्लस मॅकआर्थरला माघार घ्यायचा हुकुम दिला.
 • १९४८: चेकोस्लोव्हेकियात क्रांति सुरू.
 • १९५४: पहिली कापड गिरणी मुंबईत सुरु.
 • १९७९: सेंट लुशियाला युनायटेड किंग्डमपासून स्वातंत्र्य.
 • १९८०: बर्फावरील चमत्कार - लेक प्लॅसिड येथे तेराव्या हिवाळी ऑलिंपिक खेळात अमेरिकेच्या आइस हॉकी संघाने बलाढ्य अश्या सोवियेत संघाला हरवले.
 • २००२: एम.एच.४७-ई जातीचे हेलिकॉप्टर फिलिपाईन्सजवळ समुद्रात कोसळले. १० ठार.

जन्म/वाढदिवस


 • १४०३: चार्ल्स सातवा, फ्रांसचा राजा.
 • १७३२: जॉर्ज वॉशिंग्टन, अमेरिकेचा पहिला राष्ट्राध्यक्ष.
 • १८५७: रॉबर्ट बेडेन-पॉवेल, बॉय स्काउट्सचा संस्थापक.
 • १८५७: हाइनरिक हर्ट्झ, जर्मन भौतिकशास्त्रज्ञ.
 • १८५९: जॉर्ज पामर, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
 • १८८९: ओलाव बेडेन-पॉवेल, गर्ल गाईड्सची संस्थापिका.
 • १९१७: जॅक रॉबर्टसन, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
 • १९१८: रॉबर्ट वाडलो, ८ फूट ११ ईंच (२७२ से.मी.) उंचीचा जगातील सगळ्यात उंच पुरूष.
 • १९२१: जीन-बेडेल बोकासा, मध्य आफ्रिकेच्या प्रजासत्ताकचा राष्ट्राध्यक्ष.
 • १९४१: हिपोलितो मेजिया, डोमिनिकन प्रजासत्ताकचा राष्ट्राध्यक्ष.
 • १९४४: रणजित फर्नान्डो, श्रीलंकेचा क्रिकेट खेळाडू.
 • १९६३: विजय सिंग, फिजीचा गोल्फ खेळाडू.
 • १९६३: डेव्हन माल्कम, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
 • १९८३: शॉन टेट, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.

मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन


 • १३७१: डेव्हिड दुसरा, स्कॉटलंडचा राजा.
 • १९२१: सलीम अल-मुबारक अल-सबाह, कुवैतचा अमीर.
 • १९४४: महात्मा गांधी यांच्या पत्नी कस्तुरबा गांधी.
 • २००९: डॉ.लक्ष्मण देशपांडे, मराठी लेखक, दिग्दर्शक व कलाकार.