२ फेब्रुवारी दिनविशेष

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | २ फेब्रुवारी २०१८
२ फेब्रुवारी दिनविशेष | February 2 in History
दिमित्री मेंडेलीव, छायाचित्र: विकिमिडिया

दिमित्री मेंडेलीव - (८ फेब्रुवारी १८३४ - २ फेब्रुवारी १९०७) हा रशियन रसायनशास्त्रज्ञ होता. त्याने पहिली मूलद्रव्यांची आवर्त सारणी तयार केली.

जागतिक दिवस


 • ग्राउंडहॉग दिन: अमेरिका

ठळक घटना/घडामोडी


 • ९६२: पोप जॉन बाराव्याने सुमारे ४० वर्षे रिक्त असलेल्या पवित्र रोमन सम्राट पदावर ऑट्टो पहिल्याला बसवले.
 • १०३२: पवित्र रोमन सम्राट कॉन्राड दुसरा बरगंडीचाही राजा झाला.
 • १११९: कॅलिक्सटस दुसरा पोप पदी.
 • १५३६: स्पेनच्या पेद्रो दि मेंदोझाने आर्जेन्टिनात बॉयनोस एर्स वसवले.
 • १५४२: इथियोपियात पोर्तुगालच्या सैन्याने बासेन्तेचा गड जिंकला.
 • १६५३: अमेरिकेत न्यूऍम्स्टरडॅम गावाची स्थापना. पुढे याचे नाव बदलुन न्यूयॉर्क ठेवण्यात आले.
 • १८४८: ग्वादालुपे हिदाल्गोचा तह - मेक्सिको व अमेरिकेची संधी.
 • १८७८: ग्रीसने तुर्कस्तान विरुद्ध युद्ध पुकारले.
 • १८८०: अमेरिकेत वाबाश, ईंडियाना येथे विजेवर चालणारा रस्त्यावरील दिवा सुरू.
 • १८९७: अमेरिकेत पेनसिल्व्हेनियाचा विधानसभा आगीच्या भक्ष्यस्थानी.
 • १९२५: कुत्र्यांनी ओढलेल्या गाड्या नोम, अलास्का येथे डिप्थेरियाची लस घेउन पोचल्या. या घटनेतुन प्रेरणा घेउन इडिटारॉड स्लेड रेस सुरू झाली.
 • १९३३: ऍडोल्फ हिटलरने जर्मनीची संसद बरखास्त केली.
 • १९४३: दुसरे महायुद्ध - स्टॅलिनग्राडच्या लढाईनंतर जर्मनीचे सैन्य सोवियेत संघाला शरण.
 • १९५७: सिंधु नदी वरच्या गुड्डु बंधार्‍याचे पाकिस्तानमध्ये भूमिपूजन.
 • १९६२: प्लुटो व नेपच्यून ग्रह ४०० वर्षांनी एका रेषेत.
 • १९८९: अफगाणिस्तानमधून शेवटचे सोवियेत सैनिक परतले.
 • १९९०: कृष्णवर्णीय नेते नेल्सन मंडेला यांची तुरुंगातून मुक्ततता झाली.
 • १९९८: फिलिपाईन्समध्ये सेबु पॅसिफिक एर चे डी.सी. ९ जातीचे विमान कोसळले. १०४ ठार.

जन्म/वाढदिवस


 • १२०८: जेम्स पहिला, अरागॉनचा राजा.
 • १४५५: जॉन, डेन्मार्कचा राजा.
 • १६४९: पोप बेनेडिक्ट तेरावा.
 • १८८२: जेम्स जॉईस, आयरिश लेखक.
 • १८८४: डॉ.श्रीधर केतकर, महाराष्ट्रीय ज्ञानकोशाचे संपादक, समाजशास्त्रज्ञ
 • १९०५: आयन रँड, अमेरिकन लेखक.
 • १९५४: जयंत अमरसिंघे, श्रीलंकेचा क्रिकेट खेळाडू.
 • १९६१: ज्योई बेंजामिन, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
 • १९६८: अमिनुल इस्लाम, बांगलादेशी क्रिकेट खेळाडू.
 • १९६९: इजाझ अहमद, ज्युनियर, पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू.
 • १९७७: शकिरा, प्रसिद्ध स्पॅनिश वंशाची कोलंबियन गायिका.

मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन


 • १२५०: एरिक अकरावा, स्वीडनचा राजा.
 • १३१४: संत नरहरी सोनार यांनी समाधी घेतली.
 • १४६१: ओवेन ट्युडोर, इंग्लंडच्या ट्युडोर वंशाचा राजा.
 • १७६९: पोप क्लेमेंट तेरावा.
 • १९०७: दिमित्री मेंडेलीव, मूलद्रव्यांच्या आवर्तसारणीचे जनक.
 • १९१७: महर्षी अण्णासाहेब पटवर्धन, लोकमान्य टिळकांचे स्नेही, विख्यात वैद्य.
 • १९७०: बर्ट्रान्ड रसेल, ब्रिटीश गणितज्ञ व तत्त्वज्ञानी.
 • १९८७: ऍलिस्टेर मॅकलेन, स्कॉटिश लेखक.
 • १९९५: फ्रेड पेरी, इंग्लिश टेनिस खेळाडू.
 • २००७: विजय अरोरा, हिंदी चित्रपट अभिनेता.