१७ फेब्रुवारी दिनविशेष

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | १७ फेब्रुवारी २०१८
१७ फेब्रुवारी दिनविशेष | February 17 in History
वासुदेव बळवंत फडके, छायाचित्र: मराठीमाती आर्काईव्ह

वासुदेव बळवंत फडके - (४ नोव्हेंबर १८४५ - १७ फेब्रुवारी १८८३) वासुदेव बळवंत फडके हे भारतीय क्रांतिकारक होते. त्यांना भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील आद्यक्रांतिकारक किंवा सशस्त्र क्रांतीचे जनक मानले जाते.

जागतिक दिवस


 • -

ठळक घटना/घडामोडी


 • १८०१: अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत दोन उमेदवार थॉमस जेफरसन व एरन बर यांना सारखी मते मिळाली. हाउस ऑफ रिप्रेझेन्टेटिव्ह्सनी जेफरसनला राष्ट्राध्यक्ष तर बरला उपाध्यक्ष केले.
 • १८६४: अमेरिकन यादवी युद्ध - दक्षिणेच्या सी.एस.एस. हनलीने उत्तरेचे यु.एस.एस. हुसाटॉनिक हे जहाज बुडवले.
 • १८६५: अमेरिकन गृहयुद्ध - दक्षिणेच्या सैन्याने कोलंबिया, दक्षिण कॅरोलिनातुन पळ काढला. जाताना शहरास आग लावली.
 • १८६७: सुएझ कालव्यातून पहिले जहाज पार झाले.
 • १९३३: अमेरिकेत दारूबंदी समाप्त.
 • १९५७: अमेरिकेत वॉरेंटन, मिसुरी येथील वृद्धाश्रमात आग. ७२ ठार.
 • १९५८: पोप पायस बाराव्याने असिसीच्या संत क्लेरला दूरदर्शक संचाचा रक्षक संत जाहीर केले.
 • १९५९: हवामानाचा अभ्यास करण्यासाठीचा पहिला उपग्रह व्हँगार्ड दोन प्रक्षेपित करण्यात आला.
 • १९६२: जर्मनीत हांबुर्ग येथे हिमवादळ. ३०० ठार.
 • १९६४: अमेरिकेचे सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला की अमेरिकन कॉँग्रेसचे सगळे मतदारसंघ सारख्या लोकसंख्येचेच पाहिजेत.
 • १९७४: रॉबर्ट के. प्रेस्टन या अमेरिकन सैनिकाने अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांच्या निवासस्थानात(व्हाइट हाउस) हेलिकॉप्टर उतरवले.
 • १९७९: चीन व व्हियेतनाममध्ये युद्ध सुरू.
 • १९९५: संयुक्त राष्ट्रांच्या मध्यस्थीनंतर पेरू व इक्वेडोरने युद्धसंधि केला.
 • १९९६: महासंगणक डीप ब्ल्यू बुद्धिबळात गॅरी कास्पारोव्हकडून पराभूत.
 • २००६: फिलिपाईन्सच्या दक्षिण लेयटे भागातील सेंट बर्नार्ड गावावर दरड कोसळून १,००पेक्षा अधिक व्यक्ती ठार.

जन्म/वाढदिवस


 • १८१७: विल्यम तिसरा, नेदरलँड्सचा राजा.
 • १८८८: ऑटोस्टर्न, परमाणू रचना व गुणधर्माचे अभ्यासक.

मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन


 • ३६४: जोव्हियन, रोमन सम्राट.
 • १८७१: विष्णूबुवा ब्रम्हचारी, हिंदू धर्माचे पहिले मिशनरी.
 • १८८३: वासुदेव बळवंत फ़डके, क्रांतिकारक.
 • १९१९: विल्फ्रिड लॉरिये, कॅनडाचा पंतप्रधान.
 • १९३४: आल्बर्ट पहिला, बेल्जियमचा राजा.